सातारा लोकसभा मतदारसंघ निकाल : सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी बाजी मारली. इथे त्यांनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा पराभव केला. उदयनराजेंना 5 लाख 79 हजार 26 मतं, तर नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार498 मतं मिळाली. उदयनराजे भोसले यांनी मागील 2014 च्या निवडणुकीत जवळपास साडेतीन लाख मतांनी विजय मिळवला होता. मात्र यंदा त्यांची आघाडी जवळपास 2 लाख मतांनी घटली आहे. 2014 मध्ये उदयनराजे भोसले 3 लाख 66 हजार 594 मतांनी विजयी झाले होते. यंदा उदयनराजेंना इतकं लीड घेता आलं नाही. 2019 च्या निवडणुकीत राजेंना 1,26,528 मतांनी विजय मिळवता आला.
लोकसभा निवडणुकीसाठी सातारा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं. या निवडणुकीत या मतदारसंघात 60.33 टक्के मतदानाची नोंद झाली. यावेळी येथे 2014 च्या तुलनेत 3.33 टक्क्यांनी मतदान वाढले. या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले आणि भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली.
सातारा लोकसभा निवडणूक अंतिम निकाल 2019
1) आनंद थोरावडे-6963
2) श्री.छ. उदयनराजे भोसले-579026 (राष्ट्रवादी)
3) नरेंद्र पाटील-452498 (शिवसेना)
4) दिलीप जगताप-5055
5) सहदेव ऐवळे-40673
6) अभिजित बिचुकले-2412
7) पंजाबराव पाटील-5141
8) शैलेंद्र वीर-5846
9) सागर भिसे-8593
10) नोटा-9227
एकूण मतदान- 11,17,757
उदयनराजे भोसले 1,26,528 मतांनी विजयी
पक्ष | उमेदवार | निकाल |
---|---|---|
भाजप/शिवसेना | नरेंद्र पाटील (शिवसेना) | पराभूत |
काँग्रेस/ राष्ट्रवादी | उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी) | विजयी |
अपक्ष/इतर | सहदेव एवळे (VBA) | पराभूत |