Marathi News Elections 5 State election program announced by Election Commission what are the rules Read detailed
5 State Elections Date 2022 : 5 राज्यात निवडणुका कशा पार पडणार? 10 महत्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर
5 राज्यातल्या निवडणुकांचे बिगूल वाजले आहे, त्यात उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरचा समावेश आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
Follow us on
देशातल्या मिनी लोकसभा समजल्या जाणाऱ्या 5 राज्यातल्या निवडणुकांचे बिगूल वाजले आहे, त्यात उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरचा समावेश आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे, निवडणूक कार्यक्रम कसा पार पडणार? कोरोना काळात निवडणुका होत असल्याने नियमावली काय असणार? याबाबत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे
सर्व राज्यांच्या निवडणुका ७ टप्प्यात होणार, 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्याचे मतदान, 10 मार्चला निकाल लागणार, उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूर राज्यात एकूण 690 मतदारंघात निवडणूक होणार, त्यासाठी 1620 मतदान केंद्र उभारणार
कोरोना प्रार्दुभाव आणि नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे नवी नियमावली असणार, मतदान केंद्रावर मास्क आणि सॅनिटायझरची सोय असणार
निवडणूक प्रक्रियेत सगळे अधिकारी कर्मचारी लसीकरण झालेले असणार, निवडणूक कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस देणार
रॅली, पदयात्रा, रोडशो, बाईक रॅली, 15 जानेवारीपर्यंत बंदी, 15 जानेवारीपर्यंत प्रचारसभाही घेण्यावर बंदी, 15 जानेवारीनंतर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार, तसेच विजय मिरवणुकांवरही बंदी
18 कोटीपेक्षा अधिक मतदार करणार, यावेळी 24.9 लाख तरुण पहिल्यांदा मतदान करणार, 11.4 लाख महिला पहिल्यांदा मतदान करणार
उमेदवारी अर्ज ऑनलाइन पध्दतीने भरले जाणार, 5 राज्यात आचारसंहिता लागू
80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि कोरोना रुग्णांना पोस्टल मतदान करता येणार
सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाने आधीच पुरेशा प्रमाणात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची व्यवस्था केली आहे.
राजकीय पक्षांना त्यांच्या वेबसाईटवर उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी अपलोड करणं बंधनकारक. तसंच उमेदवार निवडीचे कारणही द्यावे लागणार
ऍपच्या माध्यमातून मतदारांना आपला उमेदवार आणि त्याची माहिती जाणून घेता येणार