पुद्दुचेरी: केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीतील निवडणूक प्रचार रविवारी संपला आहे. या तिन्ही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात उद्या मंगळवारी मतदान होणार आहे. तर, केरळ, आसाममध्ये उद्याच तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यामुळे या तीन राज्यांमध्ये कुणाची सत्ता येणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. (assembly Elections 2021: Campaigning concludes in most states; stage set for polling)
तामिळनाडूत यंदा भाजपने अण्णा द्रमुकशी आघाडी युती केली आहे. या निवडणुकीत भाजपने तमिळ संस्कृती आणि तिच्या गौरवशाली इतिहासावर जोर दिला आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री जयललिता आणि एम. करुणानिधी यांचं निधन झाल्याने तमिळ जनतेला या दोन्ही नेत्यांची निवडणुकीत कमतरता जाणवत आहे. मात्र, अभिनेते कमल हसन यांनी त्यांचा पक्ष या निवडणुकीत उतरवला असून त्यांनीही प्रचारात जोर धरला होता. तेवढाच काय दिलासा तमिळ जनतेला मिळाला होता. कमल हसन हे कोयम्बतूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून लढत आहेत.
हॅट्रीक की परिवर्तन
आसाममध्ये प्रचाराचा पारा चांगलाच चढला होता. गांधी कुटुंबाने पश्चिम बंगालपेक्षा आसाममध्येच जास्त लक्ष दिलं होतं. त्यामुळे बंगालची निवडणूक काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आसामच्या रणसंग्रामात एकूण 337 उमेदवार उभे आहेत. त्यांचं भविष्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे. उद्या 6 एप्रिल रोजी आसाम आणि तामिळनाडूत मतदान होत आहे. त्यामुळे अण्णाद्रमुक उद्या हॅट्रीक साधणार की राज्यात सत्तांतर होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
बंगालमध्ये काय होणार?
पश्चिम बंगालमध्ये 294 जागांसाठी आठ टप्प्यात मतदान होत आहे. बंगालमध्ये उद्या तिसऱ्या टप्प्यासाठी 31 जागांवर मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनीही प्रचाराचं रान उठवून दिलं आहे. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या एकट्याच प्रचार करताना दिसत आहेत. तिसऱ्या टप्प्यानंतर अभिनेत्री जया बच्चन बंगालमध्ये येऊन तृणमूलचा प्रचार करणार आहेत. त्यामुळे बंगालमध्ये काय होणार याचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पुद्दुचेरी कुणाची?
पुद्दुचेरीमध्येही एका टप्प्यात मतदान होणार आहे. पुद्दुचेरीत 6 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी निकाल लागणार आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 15 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर एआयएडीएमकेला 4, एआयएनआरसीला 8, डीएमकेला 2 आणि इतरला 1 जागा मिळाली होती. पुद्दुचेरीमध्ये काँग्रेस आणि डीएमकेमध्ये युती आहे. तर एआयएडीएमके आणि एआयएनआरसी विरोधी पक्ष आहेत. पुद्दुचेरीत आता 30 विधानसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. पुद्दुचेरी हे एक केंद्र शासित राज्य आहे. पुद्दुचेरीमध्ये विधानसभेच्या एकूण 30 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेस 21 जागांवर लढली होती आणि 15 जागा जिंकल्याही होत्या. ऑल इंडिया एनआर काँग्रेसने 30 जागांवर निवडणूक लढून फक्त 8जागा जिंकल्या होत्या. इथे बहुमतासाठी 16 जागा पाहिजे. (assembly Elections 2021: Campaigning concludes in most states; stage set for polling)
केरळकडे लक्ष
केरळमध्ये 140 जागांसाठी एका टप्प्यात मतदान होणार आहे. केरळात 6 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. केरळमध्ये विधानसभेच्या एकूण 140 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 71 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. गेल्या निवडणुकीत म्हणजेच 2016 च्या निवडणुकीत एलडीएफने 83 जागांवर विजय मिळवला होता तर यूडीएफने 47 जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे भाजपची मात्र पुरती धुळधाण झाली होती. 98 जागांपैकी फक्त एका जागेवर भाजपचा विजय झाला होता. त्यामुळे यावेळीही पुन्हा एलडीएफ येणार की यूडीएफ बाजी मारणार याची उत्सुकता लागली आहे. (assembly Elections 2021: Campaigning concludes in most states; stage set for polling)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 5 April 2021 https://t.co/sRrOXb7hgs #Superfast100News | #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 5, 2021
संबंधित बातम्या:
Assam Assembly Election 2021 date : आसाम विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला, मतदान आणि निकाल कधी?
‘मिशन बंगाल’: ‘वाघीण’ सरस ठरणार की ‘कमळ’ फुलणार; वाचा पश्चिम बंगालचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट!
रण तामिळनाडूचे! बिगूल वाजला; पण सत्ता कुणाला मिळणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट
(assembly Elections 2021: Campaigning concludes in most states; stage set for polling)