लोकसभा निवडणुकीचा निकाला हळूहळू आता स्पष्ट होत आहे. अनेक मतदारसंघातील निकाल जाहीर झाला आहे. आता मतमोजणी शेवटच्या टप्प्यात आहे. भाजपला देशात मोठा झटका लागला आहे. गेल्या १० वर्षातील सर्वात कमी जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. यंदा भाजपने एनडीएला ४०० जागांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण ३०० जागाच मिळताना दिसत आहे. त्यातच महाराष्ट्रात देखील महाविकासआघाडीला मोठं यश मिळाले आहे. महायुती पेक्षा अधिक जागा जिंकण्यात महाविकासआघाडीला यश मिळाले आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील भाजपचा धुव्वा उडाला आहे.
नाशिक ,दिंडोरी ,धुळे, नंदुरबार ,नगर, शिर्डी या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झालाय. 8 पैकी 6 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांचा दावा फोल ठरला आहे. सुजय विखे, भारती पवार, सुभाष भामरे, हेमंत गोडसे, सदाशिव लोखंडे, हिना गावित या विद्यमान खासदारांचा पराभव झाला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात मविआची मुसंडी पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच मंत्री गिरीश महाजन तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक बोलावल्याची माहिती आहे. निकालावर कुठलीही प्रतिक्रिया न देता मंत्री गिरीश महाजन तातडीने जळगावातून मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे. पत्रकारांनी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता कुठलीही प्रतिक्रिया न देता मंत्री गिरीश महाजन तातडीने मुंबईकडे निघून गेले. जळगाव विमानतळावरून विमानाने गिरीश महाजन मुंबईकडे रवाना झाल्याचे सूत्रांची माहिती आहे.
राज्यात महाविकासआघाडीला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. महाविकासआघाडीला २९ जागा आघाडीवर आहेत. तर महायुती १८ जागांवर आघाडीवर आहे.
भाजप १०
शिवसेना ७
राष्ट्रवादी १
काँग्रेस १३
ठाकरे गट ०९
राष्ट्रवादी ०७