उत्तरप्रदेश : विधानसभा निवडणुकी (UP Assembly Election ) संदर्भात भाजपच्या कोअर कमिटीची (BJP Core Team Meeting) बैठक सुरू आहे. ही बैठक तब्बल 14 तासांपासून सुरू आहे, तसेच या बैठकीला गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) उपस्थित असल्यामुळे नेमकं बैठकीत काय होईल याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. या बैठकीत सहयोगी दलासोबत सीट संदर्भात चर्चा झाल्याचे समजते. विशेष म्हणजे बैठकीत गृहमंत्री अमित शहांनी निषाद पार्टीचे संजय निषाद आणि अपना दल की अनुप्रिया पटेल यांच्याशी सीट संदर्भात चर्चा केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार गुरूवारच्या अंतिम बैठकीनंतर कोणत्या विधानसभा क्षेत्रात कोणाला सीट मिळेल हे लवकरचं स्पष्ट होईल.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आयोध्यामधून विधानसभा निवडणूक लढवण्यावर बैठकीत चर्चा झाली आहे. परंतु भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर निर्णय घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे केंद्रीय निवडणूक बैठकीला पंतप्रधान नरेंद्र सुध्दा उपस्थित राहणार आहेत. आतापर्यंत सद्याचे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर लोकसभेतून पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एकदाही विधानसभा निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळं आयोध्यामधून ते निवडणुक लढवतील का यावर जोरदार चर्चा सुरू आहे.
तब्बत 14 तास सुरू असलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पहिल्या तीन टप्प्यांसाठी 172 उमेदवारांची नावं फायनल झाल्याचं समजतंय. दिल्लीत झालेल्या बैठकीत 300 जागांच्या नावावर चर्चा झाली होती, परंतु सुरू असलेल्या बैठकीत निव्वळ 172 जागांवर शिक्कामोर्तब झाला आहे. आता ज्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे, त्यांची नावं गुरुवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीसमोर ठेवण्यात येणार आहेत.
केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत ज्या उमेदवारांच्या नावांना मान्यता देण्यात येईल, त्यांची नावं लवकरचं जाहीर केली जातील. गृहमंत्री अमित शहा, भाजपचे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रभारी-धर्मेंद्र प्रधान, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, प्रदेश सरचिटणीस सुनील बन्सल, राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष यांच्या उपस्थित मंगळवारी तब्बल 10 तास बैठक चालली. त्यानंतर बुधवारी सकाळी 11 वाजता सुरू झालेली बैठक दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू होती. नुकतेच कोरोना पॉझिटिव्ह आलेले जेपी नड्डा यांनी सुध्दा बैठकीत सहभाग नोंदवला आहे.
भाजपच्या सहयोगी दल आणि अपना यांच्यासोबत बैठकीत चर्चा झाल्याने त्यांनाही अधिक सीट मिळतील अशी चर्चा सुरू आहे. मित्र पक्षांना अधिक जागा मिळाव्यात यासाठी अनुप्रिया पटेल यांनी भाजपच्या मुख्यालयाला भेट दिली होती. मागच्या विधानसभा निवडणुच्यावेळी भाजपने अपना दल पक्षाला 11 सीट दिल्या होत्या. त्यापैकी 9 जागांवरती अनुप्रिया पटेल यांचे उमेदवार विजयी झाले होते. यावेळी अपना दल पहिल्यापेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या: