चंदीगड: रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारून युक्रेनवर हल्ला सुरू केला आहे. त्यामुळे युक्रेनचे पंतप्रधान वोलोदिमीर जेलेन्सकी (Ukrainian President Volodymyr Zelensky)अचानक चर्चेत आले आहेत. एक कॉमेडियन ते पंतप्रधान पदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. काही अंशी तिच पुनरावृत्ती पंजाबमध्येही (Punjab Assembly Election 2022) घडताना दिसत आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची सत्ता येत असल्याचं सुरुवातीच्या कलावरून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आपचे नेते भगवंत मान (bhagwant mann) हे पंजाबचे मुख्यमंत्री होणार असल्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हेच कल कायम राहिल्यास भगवंत मान हेच पंजाबचे मुख्यमंत्री असतील. भगवंत मानही राजकारणात येण्यापूर्वी जेलेन्स्की यांच्याप्रमाणे सिनेसृष्टीत होते. तेही फिल्मी दुनियेत कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे जसा जेलेन्स्की यांचा कॉमेडियन ते पंतप्रधान असा प्रवास घडला, तसाच कॉमेडियन ते मुख्यमंत्री असा मान यांचा प्रवास होणार असल्याची शक्यता आहे.
पंजाब विधानसभा निवडणुकांचे कल हाती आले आहेत. त्यानुसार पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला 91, काँग्रेसला 17, अकाली दलाला 6, भाजपला दोन आणि इतरांना एक जागा मिळताना दिसत आहे.
वोलोदिमीर जेलेन्स्की यांचे वडील ऑलेक्जेंडर जेलेंस्की प्रोफेसर आणि आई रायमा जेलेंस्का पेशाने इंजीनियर होत्या. सुरुवातीला शिक्षण पूर्ण केल्यानंतर वोलोदिमीर जेलेंस्की यांना इजराइल मध्ये अभ्यास करण्याकरता स्कॉलरशिप मिळाली. परंतु वडिलांची परवानगी न मिळाल्या कारणामुळे वोलोदिमीर यांनी कीव येथून आपले शिक्षण पूर्ण केले. 2000 मध्ये कीव नेशनल इकोनॉमिक यूनिवर्सिटीद्वारे लॉची डिग्री प्राप्त करून आपले पदवीचं शिक्षण घेतलं.
1997 मध्ये वोलोदिमीर यांनी काही अभिनेत्यासोबत एकत्र येऊन ‘क्वार्टल 95’ नावाचा एक कॉमेडी ग्रुप बनवला. लोकांनी वोलोदिमीर यांच्या कामाला खूप पसंती दिली. ज्याचा परिणाम इतका झाला की , 2003 मध्ये त्यांनी आपले कार्यक्रम सुरू केले. स्वतः च्याच एका कार्यक्रमातून प्रेरित होऊन भविष्यात राजकारण क्षेत्रामध्ये पाऊल ठेवण्याचे त्यांनी ठरवले. अशाप्रकारे त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. 2018 मध्ये वोलोदिमीर यांनी राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण केले. वोलोदिमीर यांनी ‘सर्वेंट ऑफ द पीपल पार्टी’ बनवली.या पक्षातून त्यांनी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवली. निवडणुकीत 73 % वोट मिळवून त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आणि देशाचे पंतप्रधानपद भूषविले.
इस इंक़लाब के लिए पंजाब के लोगों को बहुत-बहुत बधाई। pic.twitter.com/BIJqv8OnGa
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 10, 2022
पंजाबच्या संगरुर जिल्ह्यातील सतोज हे भगवंत मान यांचं जन्म गाव. जुगनू हे त्यांचं टोपण नाव आहे. त्यांनी संगरुरच्या एसयूएस महाविद्यालयातील बीकॉम केलं. मात्र, त्यांना नोकरी किंवा उद्योग व्यवसाय करायचा नव्हता. काही तरी वेगळं करण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला कॉमेडी शो सुरू केले. कॉमेडी शोमधून जोक्स ऐकवून लोकांना मनमुराद हसवण्याचं काम त्यांनी सुरू केलं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
पंजाब पिपल्स पार्टीतून त्यांनी राजकीय जीवनास सुरुवात केली. 2012मध्ये त्यांनी लहरा येथून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. 2014मध्ये आपने त्यांना संगरुर लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं. यावेळी मात्र ते 2 लाख मतांनी विजयी झाले. मधल्या काळात कुटुंबाला वेळ देता येत नसल्याने पत्नीशी वारंवार वाद व्हायचे. त्यामुळे त्यांनी पत्नीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
2017मध्ये त्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्या विरोधात निवडणूक लढवली. जलालाबादमधून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या मान यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर 2019मध्ये त्यांनी संगरुरमधून लोकसभेची निवडणूक लढवून विजय मिळवला होता.
2017मध्ये त्यांना आपने पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. 2018मध्ये ड्रग्सचे आरोप आणि मानहानीच्या प्रकरणात आपच्या नेत्यांनी बिक्रम सिंग मजिठीया यांची माफी मागितली. त्यानंतर मान यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण केजरीवाल यांनी समजावल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला होता.
संबंधित बातम्या:
Elections Result | शिवसेना जिथे गेली तिथे डिपॉझिट जप्त, रावसाहेब दानवेंकडून शिवसेनेच्या मर्मावर बोट