मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसची आचारसंहिता भंगची तक्रार, कशासाठी घेतला आक्षेप

| Updated on: Apr 18, 2024 | 4:48 PM

Lok Sabha Election 2024: काँग्रेसने 'राम मंदिर झालं आता राष्ट्र मंदिर बनवूया' ही दिलेली जाहिरात धार्मिक प्रलोभण दाखवणारी असल्याचे म्हटले आहे. जाहिरातीच्या माध्यमातून मुरलीधर मोहोळ यांनी धार्मिक प्रलोभन दाखवल्याचा काँग्रेसकडून आरोप करण्यात आला आहे.

मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसची आचारसंहिता भंगची तक्रार, कशासाठी घेतला आक्षेप
Follow us on

पुणे लोकसभेसाठी तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि वंचित आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांच्यात ही लढत होणार आहे. तिन्ही उमेदवारांनी आपला प्रचार सुरु केला आहे. दोन दिवसांपूर्वी प्रचार करताना वसंत मोरे आणि रवींद्र धंगेकर यांनी एकत्र मिसळपावचा स्वाद घेतला होतो. तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पुण्याच्या राजकीय संस्कृतीचे चांगले दर्शन त्यावेळी घडवले. परंतु प्रचारासाठी केले जाणारे दावे, आरोप-प्रत्यारोप आणि जाहिरातींवर दुसरे प्रतिस्पर्धी उमेदवार लक्ष ठेऊन आहेत. आता काँग्रेसकडून भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात आचारसंहिता भंगची तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार एका जाहिरातीसंदर्भात दिली आहे. ‘राम मंदिर झालं आता राष्ट्र मंदिर बनवूया’ अशी मोहोळ यांनी जाहिरात दिली होती. त्याला काँग्रेसकडून आक्षेप घेतला आहे.

काँग्रेसचा काय आहे म्हणणे

काँग्रेसने ‘राम मंदिर झालं आता राष्ट्र मंदिर बनवूया’ ही दिलेली जाहिरात धार्मिक प्रलोभण दाखवणारी असल्याचे म्हटले आहे. जाहिरातीच्या माध्यमातून मुरलीधर मोहोळ यांनी धार्मिक प्रलोभन दाखवल्याचा काँग्रेसकडून आरोप करण्यात आला आहे. यामुळे पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसकडून आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी वर्तमानपत्रातून ही जाहिरात दिली होती. या जाहिरातीवरून काँग्रेसने आक्षेप घेत आचारसंहिता भंगाची केली तक्रार दाखल

हे सुद्धा वाचा

काँग्रेस नेते मोहन जोशी म्हणतात…

माजी आमदार आणि काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी सांगितले की, भाजपने राम मंदिराला निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनवला. काँग्रेस यासंदर्भात यापूर्वी सांगीतला होते. आता ते सिद्ध झाले आहे. राम मंदिरच्या माध्यमातून धार्मिक प्रलोभन भाजपकडून दाखवले जात आहे. भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आचार संहिता भंगची तक्रार दिली आहे.