चेन्नई: डीएमकेचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी आज राजभवनात तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल बनावरीलाल पुरोहित यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत 33 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पद आणि गोपनीयतेची शपथ घेणाऱ्यांमध्ये 19 माजी मंत्री आणि 15 नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. स्टॅलिन यांच्या मंत्रिमंडळात दोन महिलांचाही समावेश आहे. स्टॅलिन यांनी पहिल्यांदाच तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. (DMK Chief MK Stalin Takes Oath as Tamil Nadu Chief Minister for First Time)
आमदारांना मंत्री बनविण्याच्या आणि त्यांच्या खात्यांच्या वाटपाच्या शिफारशींना राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मंजुरी दिली. विशेष म्हणजे स्टॅलिन यांचे चिरंजीव उधयनिधी यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. डीएमकेने मित्रपक्षांसोबत निवडणूक लढवून प्रचंड विजय मिळवला आहे.
स्टॅलिन यांच्याकडे कोणती खाती?
स्टॅलिन यांच्याकडे महत्त्वाची खाती राहणार आहेत. त्यांच्याकडे गृह, जनरल अॅडमिनिस्ट्रेशन, स्पेशल इनिशिएटीव्ह, स्पेशल प्रोग्राम इम्पिलमेन्टेशन अँड वेल्फेअर ऑफ डिफरंटली, एबल्ड पर्सन आदी विभाग असणार आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण खातं चेन्नईचे माजी महापौर एम. ए. सुब्रमण्यन यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. जलसंधारण विभाग डीएमकेचे महासचिव एस. दुरिमुरुगन यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. उधयनिधींचे निकटवर्तीय अनबिल महेश पोयमोजी यांच्याकडे शालेय शिक्षण विभाग देण्यात आला आहे.
डेल्टा क्षेत्रातून कोणताही मंत्री नाही
राज्यातील डेल्टा क्षेत्रातून कोणताही मंत्री नियुक्त करण्यात आलेला नाही. बुधवारी स्टॅलिन यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि सरकार स्थापन्याचा दावा केला होता. स्टॅलिन यांनी तामिळनाडू विधानसभेच्या 234 जागांपैकी 133 जागा जिंकल्या आहेत. त्यांनी काँग्रेससह काही राजकीय पक्षांशी आघाडी केली होती.
लहान भावाकडून अभिनंदन
डीएमकेमधून हकालपट्टी करण्यात आलेले नेते एम. के. अलागिरी यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल लहान बंधू स्टॅलिन यांचं अभिनंदन केलं. नव्या कारकिर्दीसाठी त्यांनी स्टॅलिन यांना शुभेच्छा दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. (DMK Chief MK Stalin Takes Oath as Tamil Nadu Chief Minister for First Time)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 7 May 2021 https://t.co/yBiOabRh7e #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 7, 2021
संबंधित बातम्या:
हद्द झाली! डीएमके सत्तेत आल्याने महिलेने जीभ कापून नवस फेडला; रुग्णालयात दाखल
2021 Vidhan Sabha Election Results LIVE : नंंदीग्राममधून ममता दीदींचा पराभव, सुवेंदू अधिकारी विजयी
(DMK Chief MK Stalin Takes Oath as Tamil Nadu Chief Minister for First Time)