Exit Poll Results 2022 LIVE Streaming : उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल थोड्याच वेळात, अपडेटस कुठं पाहणार?

| Updated on: Mar 07, 2022 | 5:20 PM

Assembly Elections Exit Poll Results 2022 LIVE Streaming Today: उत्तर प्रदेशातील सातव्या टप्प्याचं मतदान पार पडल्यानंतर टीव्ही 9 नेटवर्क आणि पोलस्ट्रॅटकडून पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांनी कौल कुणाला दिलाय या संदर्भातील एक्झिट पोल (Exit Poll) जाहीर करण्यात येणार आहे.

Exit Poll Results 2022 LIVE Streaming : उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल थोड्याच वेळात, अपडेटस कुठं पाहणार?
एक्झिट पोलचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पाहणार
Image Credit source: Tv9 Marathi
Follow us on

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची (Assembly Election 2022) रणधुमाळी सध्या अंतिम टप्प्यात पोहोचलीय. पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांतील मतदान पार पडलं आहे. उत्तर प्रदेशमधील सातव्या टप्प्याचं मतदान थोड्याच वेळात संपणार आहे. उत्तर प्रदेशातील सातव्या टप्प्याचं मतदान पार पडल्यानंतर टीव्ही 9 नेटवर्क आणि पोलस्ट्रॅटकडून पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांनी कौल कुणाला दिलाय या संदर्भातील एक्झिट पोल (Exit Poll) जाहीर करण्यात येणार आहे. तुम्ही टीव्ही 9 मराठी वर एक्झिट पोलच्या अपडेटस् पाहू शकता. टीव्ही 9 मराठीची वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्झिट पोलचे अपडेट पाहता येतील. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यातील निवडणुकांचे एक्झिट पोल 7 मार्चला (Exit Poll date) उत्तर प्रदेशातील सातव्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जारी होतील.

एक्झिट पोलचे अपडेट कुठं पाहणार?

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यातील मतदार काँग्रेस, भाजप आणि समाजवादी पार्टी या पैकी कोणत्या पक्षाला कौल देणार याचा कल एक्झिट पोलमधून पाहायला मिळेल. पाच राज्यातील सत्ता कोणत्या पक्षांकडे जाणार याचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात येणार आहे. एक्झिट पोलचे सर्व अपडेट टीव्ही 9 मराठीवर आज सायंकाळी साडे सहानंतर पाहायला मिळतील. टीव्ही 9 मराठीची वेबसाईट  www.tv9marathi.com वेबसाईटवर पाहायला मिळतील. टीव्ही 9 मराठीच्या सोशल मीडिया प्लॅट फॉर्मवर देखील अपडेट पाहायला मिळतील.

मतदान कसं पार पडलं

पाच राज्यांपैकी सर्वात मोठे राज्य म्हणून उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी 7 टप्पे करण्यात आले होते. 10 फेब्रुवारी , 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी , 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 03 मार्च रोजी मतदान पार पडलं आहे. आज 07 मार्चला सातव्या टप्प्यातील मतदान  अंतिम टप्प्यात आहे. सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल जाहीर होतील. गोवा आणि उत्तराखंड राज्यातील मतदान 14 फेब्रुवारी रोजी एका टप्प्यात पार पडलं. पंजाब राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 20 फेब्रुवारीला मतदान पार पडलं. मणिपूर राज्यात 27 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी मतदान पार पडलं आहे.

10 मार्चला निकाल

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर, गोवा या राज्यांच्या निवडणुकांचे निकाल 10 मार्चला जाहीर होणार आहेत. त्यापूर्वी 7 मार्चला सायंकाळी 6.30 नंतर एक्झिट पोल पाहता येणार आहे.

इतर बातम्या:

दोन्ही कर्जमाफी योजनांमधून सुटलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? : पटोलेंचा अधिवेशनात सवाल

Sanjay Raut : शिवसेना भवनात संजय राऊतांची पुन्हा पत्रकार परिषद, वेळही ठरली, टार्गेटवर कोण?