पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्या मुलाच्या उमेदवारीबाबत भाजपनं (BJP Goa) अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. असं असतानाही देखील मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर हे पणजीमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात व्यस्त असून त्यांनी आपलं प्रचारकार्य जोरात सुरु ठेवलेलं आहे. त्यामुळे भाजपनं उमेदवारी दिलेली नसतानाही उत्पल पर्रीकर हे नेमकं काय करु पाहत आहेत, अशा चर्चांना ऊत आलेला आहे. अशातच महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे भाजप निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया उत्पल पर्रीकर यांच्या उमेदवारीवरुन दिली आहे. उत्पल यांच्या उमेदवारीबाबत जेव्हा पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्यांनी उत्पल यांनी उमेदवारी दिली जाणार की नाही, यासोबत भाजपचा उमेदवारी देण्यासाठीची नेमकी पात्रता काय आहे, हे देखील स्पष्ट करुन टाकलं. आगामी गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालंय.
पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मनोहर पर्रीकरांचा मुलगा आहे, म्हणून उत्पल यांना उमेदवारी दिली पाहिजे, असं म्हणणं पूर्णपणे चूक असल्याचं म्हटलं. पर्रीकरांचा मुलगा आहे, म्हणून त्यांना उमेदवारी दिली जाणार नाहीच, असंही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना स्पष्ट केलंय. टीव्ही 9 मराठीनं आपल्या युट्युब चॅनेलवर देवेंद्र फडणवीस यांची ही संपूर्ण पत्रकार परिषदेचा व्हिडीओ जारी केला असून या व्हिडीओमध्ये 16 व्या मिनिटाला देवेंद्र फडणवीस यांना उत्पल पर्रीकरांच्या प्रश्नावर सविस्तर उत्तर दिलं आहे.
Now no looking back…..?
— Utpal Parrikar ?? (@uparrikar) January 5, 2022
उत्पल पर्रीकर यांनी नुकतीत अमित शहा सर यांची भेट घेतली होती. या भेटीत काय झालं, ते मला माहीत नाही. त्याची माहिती घेतल्यानंतर मी माझं मत व्यक्त करेन. मनोहरभाईंनी गोव्यात भाजप रुपवली. त्यांचं गोव्यातील काम हे मोठंच आहे. पण पर्रीकरांचा मुलगा आहे. म्हणून उत्पल यांना तिकीट दिलं जाऊ शकत नाही. उमेदवारी कर्तृत्व पाहून दिली जाते. उमेदवारी देण्याचा विषय हा काही माझ्या एकट्याच्या हातातला नाही आहे. आमचं जे पार्लमेन्ट्री बोर्ड आहे, ते याबाबत निर्णय घेईल.
Dabolim Vidhan Sabha #Goa #GoaElections #BJP #BJP4Goa pic.twitter.com/XhvM6jeQPQ
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 12, 2022
दरम्यान, भाजपला सोडचिट्ठी देणाऱ्या आमदारांविषयीदेखील फडणवीस यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की,
एखाद दुसरा अपवाद वगळला तर भाजपमधून जे बाहेर जात आहेत, त्यांना भाजप आपल्याला उमेदवारी देणार नाही, याची खात्री असेल. आपल्याबाबत एन्टीइनकमबन्सी आहे. त्यामुळे ते पक्ष सोडून जात आहेत.
संबंधित बातम्या :
गोव्यातील पैशाचा पाऊस कुणाचा? आप आणि टीएमसीच्या पैशांचा धनी कोण? संजय राऊतांचा सवाल