Goa Assembly Elections 2022 : भाजपला टक्कर देण्यासाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर, कोण कुठून लढणार? वाचा एका क्लिकवर

| Updated on: Jan 21, 2022 | 12:40 PM

गोवा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शिवसेनेने आज नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आरएसएसमधून भाजपमध्ये आलेले शैलेंद्र वेलिंगकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे.

Goa Assembly Elections 2022 : भाजपला टक्कर देण्यासाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर, कोण कुठून लढणार? वाचा एका क्लिकवर
Sanjay Raut
Follow us on

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शिवसेनेने आज नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आरएसएसमधून भाजपमध्ये आलेले शैलेंद्र वेलिंगकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर यांना शिवसेना पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. शिवसेना गोव्यात 12 जागांवर लढणार आहे. त्यापैकी शिवसेनेने आज 9 जागांवरील उमेदवारांची यादी घोषित केली आहे. तसेच उद्यापर्यंत तीन जागांची घोषणा करणार असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. त्या त्या मतदारसंघातील सामान्य चेहरे आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. आज 9 जागांची यादी जाहीर करत आहोत.
गोव्यातील जनता शिवसेनेला संधी देईल अशी खात्री आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेचे प्रमुख नेते प्रचाराला येतील. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचाराला येतील. विधानसभेत शिवसेनेचे आमदार जातील, असं राऊत म्हणाले.

शिवसेनेचे उमेदवार

पेडणे- सुभाष केरकर
माफसा- जितेश कामत
शिवली- भीमसेन परेरा
हळदोणे- गोविंद गोवेकर
पणजी शैलेंद्र वेलिंगकर
परये- गुरुदास गावकर
वास्को- मारुती शिरगावकर
केपे- अॅलेक्सी फर्नांडिस

शैलेंद्र वेलिंगकर यांचा शिवसेनेत प्रवेश

दरम्यान, उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी आरएसएसचे शैलेंद्र वेलिंगकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यावर गोव्यातील उपराज्य प्रमुख पदाची जबाबदारी देत देण्यात येत असल्याची घोषणा राऊत यांनी केली. शैलेंद्र आल्याने गोव्यातील संघटनेचा विस्तार आणि व्याप्ती वाढेल असा दावा राऊत यांनी केला आहे.

गोव्याचं राजकारण आशादायी नाही

गोव्याच्या राजकारणात शिवसेना हा काही नवीन पक्ष नाही. निवडणुकीत यश मिळालं नसलं तरी गोव्यात शिवसेना दमदारपणे काम करत आहे. 2017मध्ये आम्ही निवडणूक लढवल्या होत्या. यावेळी गोव्याचं राजकारण आणि वातावरण आशादायी नाही. वातावरण गढूळ झालं आहे. अनेक पक्ष नव्याने उतरले आहेत. उमेदवार याद्या जाहीर होत आहेत. कोण कुणाकडून लढत आहे हे सुद्धा स्पष्ट होत नाही. हिंदी भाषिक पट्ट्यात आयाराम गयाराम हा शब्द प्रचलित आहे. गोव्यात मात्र आलेमाव गेलेमाव हा शब्द रुढ झाला. कधी कोण आले कधी कोण बंड करेल हे सांगता येत नाही. तरीही शिवसेना लढत आहे. गोव्यातील राजकारण पाच ते दहा लोकांच्या हातात आहे, असं राऊत म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

Goa Assembly Election 2022 | गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती जवळपास निश्चित -tv9

तर उत्पल पर्रिकरांच्या नाराजीचा गोव्याच्या राजकारणावर परिणाम होईल; जितेंद्र आव्हाडांचा इशारा

Goa Assembly Elections 2022 : उत्पल पर्रीकरांवरून राऊतांनी पुन्हा डिवचले, फडणवीस समजूत काढण्यात पटाईत आहेत पण…