गोवा : राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा दुरळा उडत असतानाच तिकडे गोव्यात संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत रणशिंग फुंकले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी आगामी गोवा विधानसभेची निवडणूक (Goa Eelections 2022) एकत्र लढणार आहे, त्यासाठी संजय राऊत आणि प्रफुल्ल पटेल यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्यावेळी संजय राऊतांनी (Sanjay raut) गोव्यात लढण्याचा प्लॅन काय असेल आणि उमेदवार कधी जाहीर करणार? याबाबत माहिती दिली आहे. तसेच काँग्रेसला (Congress) वाटत असेल ते स्वबळावर सरकार बनवू शकते, तर त्यांना आमच्या शुभेच्छा. गोव्यात आम्ही जेवढ्या जागा लढवू त्यातल्या जास्तीत जास्त जागा निवडूण आणू, त्यामुळे गोव्यात आमच्याशिवाय सरकार बनणार नाही, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. पण पूर्ण जागा लढवण्यापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी पळवाट काढत आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
गोव्यातला माहोल काय सांगतो?
जो महोल गोव्यात आज बनला आहे, त्यावरून एक राजकारणातला एक शब्द आठवतो, तो म्हणजे आयाराम गयाराम हा शब्द पहिल्यांद हरयाणात जरी पहिल्यांदा लागू झाला असला, तरी आता गोव्यातही तो लागू होतो अशी कोपरखळी संजय राऊतांनी मारली आहे. गोव्यात आज एक नेते एका पार्टीत तर उद्या दुसऱ्या पार्टीत, असे घाणेरडे राजकारण गोव्यात सुरू, असल्याने गोव्याची जनता या सर्व पक्षांना वैतागली आहे. त्यामुळे महाराष्टातील सरकारचा प्रयोग गोव्यातही यशस्वी होईल असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला आहे. तसेच गोव्यच्या जनतेने आम्हाला एकदा संधी द्यावी असे आवाहनही राऊतांनी केले आहे.
जागावाटप उद्या जाहीर करणार
शिवसेना कुठून किती जागावर लढणार आणि राष्ट्रवादी गोव्यात कुठून किती जागावर लढणार याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. याबाबतची यादी उद्या जाहीर करण्यात येईल असे संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी पूर्ण जागा लढवणार नसल्याचे आधीच संजय राऊतांनी स्पष्ट केल्याने किती जागा ही युती लढवणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
उत्पल पर्रीकर एकटे लढल्यास आमचा पाठिंबा
उत्पल पर्रीकरांना तिकीट मागितल्यावर उत्पल पर्रीकरांनी गोव्यातील जनतेला आणि भाजपला एक प्रश्न विचारला, की ज्या जागेवरून स्वर्गीय मनोहर पर्रीकर लढले त्या जागेवरून आता गुन्हेगारी पार्श्वभूमि असणार उमेदवार निवडणूक लढवणार का? मनोहर पर्रीकरांचे गोव्याचे विकासात महत्वाचे योगदान आहे. गोव्यात भाजपची ताकदही त्यांनी वाढवली आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाला तिकीट मिळावे ही जनभावना आहे. उत्पल पर्रीकर वेगळे लढणार असतील तर त्यांना सर्वपक्षीयांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन आम्ही केले आहे, असेही राऊत म्हणाले.