मुंबई : शिवसेनेच्या पाच राज्यातील निवडणुका लढण्याबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विचारलं असता, पाच राज्यात शिवसेनेचा सरपंचही नाही. अशी टीका त्यांनी केली होती, सावंतांच्या याच वक्तव्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे, कधी काळी गोव्यात भाजपचाही सरपंचही नव्हता, सरपंच काय पंचही नव्हता, गोमंतक पक्ष फोडून ते निवडून येऊ लागले असे म्हणत राऊतांनी प्रमोद सावंत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. दादरा-नगरहवेतीलही आमचा सरपंच नव्हाता तरी आम्ही जिंकलो, सरपंच असल्याचा नसल्याचा विधानसभेत काही फरक पडत नाही, आम्ही आधी विधानसभा जिंकू, मग सरपंच आपोआप होतील असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
सावंत परीकरांपेक्षा मोठे नाहीत
प्रमोद सावंत यांनी भाजपच्या 20 पेक्षा जास्त जागा निवडूण येतील असे, वक्तव केले होते त्यावरही राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रमोद सावंत यांना एवढा आत्मविश्वास असेल तर आमच्या शुभेच्छा आहेत, एकबळावर सत्तेत येईल असे सावंत यांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे, गोव्यात परीकर असतानाही ते 13 जागांवर थांबले होते, प्रमोद सावंत मनोहर परीकरांपेक्षा मोठे नाहीत, अशी कोपरखिळी राऊतांनी मारलीय.
गोव्यात शिवसेनेचा प्लॅन काय?
पाच राज्यांच्या निवडणुकीत शिवसेना उतरणार का? आणि शिवसेनेची रणनिती काय असणार? असे राऊतांनी विचारले असता, निवडणुकांबाबतची राणनिती काय असणार हे आत्ताच सांगणार नाही, मात्र गोव्यात काँग्रेससोबत लढण्याबाबत आमचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत, असेही राऊत यावेळी म्हणाले आहेत. आम्ही आमच्या मार्गाने जाऊ, कुणाला एकटे लढून निवडूण यायचे असेल तर येतील असेही राऊत म्हणाले. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पाच राज्यातील निवडणूक नियमावली जाहीर केली आहे, त्यावर बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधानांनी सभा घेऊ नये, त्यांनी इतरांना एक आदर्श घालून द्यावा अशी प्रतिक्रिया दिली आहे, बंगालच्या सभांमध्ये काय झालं हे आपण सर्वांनी पाहिले आहे, त्यामुळे पंतप्रधानांनी याचा विचार करावा, असे म्हणत संजय राऊतांनी पंतप्रधानांना डिवचले आहेत. कोरोनाच्या काळात या निवडणुका पार पडत आहेत, निवडणूक आयोगाने यासाठी घालून दिलेली नियमवली सर्वांना सारखी असावी ती एका राजकीय पक्षाच्या सोयीची नसावी, निवडणूक आयोगावर आमचा विश्वास आहे, असाही टोला राऊतांनी लगावला आहे.