पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) भाजपकडून आज उमेदवारांची पहिली यादी (BJP Candidate List) जाहीर करण्यात आलीय. भाजपने एकूण 34 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, भाजपनं आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर आता भाजपमध्ये मोठी बंडाळी पाहायला मिळतेय. कारण, गोव्यातील भाजपचे तीन बडे नेते उमेदवारी न मिळाल्यानंतर आता अपक्ष म्हणून दंड थोपटणार असल्याचं कळतंय.
भाजपने गोव्यात 34 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केलीय. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे मोठे नेते लक्ष्मीकांत पार्सेकर हे अपक्ष निवडणूक लढणार असल्याची माहिती मिळतेय. ते मांद्रे विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष म्हणून दंड थोपटणार आहेत. मांद्रेत विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. या जागेवर लक्ष्मीकांत पार्सेकरही इच्छुक होते. तर सांगे मतदारसंघातून सावित्री कवळेकर या अपक्ष निवडणूक लढणार आहेत. सावित्री कवळेकर या उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या पत्नी आहेत. भाजपनं चंद्रकांत कवळेकरांना केपे मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे.
गोवा भाजपमध्ये अजून एक बंड पाहायला मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सावर्डे विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक प्रभुपाऊस्कर अपक्ष निवडणूक लढणार आहेत. भाजपने उमेदवारी नाकारल्यानं त्यांनी हा निर्णय घेतलाय. भाजपने सावर्डे मतदारसंघात गणेश गावकर यांना उमेदवारी दिली आहे.
>> साखळी – प्रमोद सावंत
>> मांद्रे – दयानंद सोपटे
>> पेडणे – प्रवीण आर्लेकर
>> थिवी – नीलकंठ हळर्णकर
>> म्हापसा – ज्योशुआ डिसोझा
>> शिवोली – दयानंद मांद्रेकर
>> साळगाव – जयेश साळगावकर
>> पर्वरी – रोहन खंवटे
>> हळदोणा – ग्लेन टिकलो
>> पणजी – बाबूश मोन्सेरात
>> ताळगाव जेनिफर मोन्सेरात
>> सांत आंद्रे – फ्रान्सिस्को सिल्व्हेरा
>> मये – प्रेमेंद्र शेट
>> पर्ये – दिव्या विश्वजीत राणे
>> वाळपई – विश्वजीत प्रतापसिंग राणे
>> प्रियोळ – गोविंद गावडे
>> फोंडा – रवी नाईक
>> मडकई – सुभाष भिंगी
>> शिरोडा – सुभाष शिरोडकर
>> मुरगाव – मिलिंद नाईक
>> वास्को – कृष्णा साळकर
>> दाबोळी – मॉविन गुदिन्हो
>> नुवे – दत्ता विष्णू बोरकर
>> फातोर्डा – दामोदर नाईक
>> मडगाव – मनोहर उर्फ बाबू आजगावकर
>> बेणावली – दामोदर बांदोडकर
>> नावेली – उल्हास तुवेकर
>> कुंकळ्ळी – क्लाफासियो डायस
>> वेली – साविओ रॉड्रिग्ज
>> केपे – चंद्रकांत कवळेकर
>> कुडचडे – निलेश काब्राल
>> सावर्डे – गणेश गावकर
>> सांगे – सुभाष फळदेसाई
>> काणकोण – रमेश तवडकर
The Central Election Committee of the BJP has decided the following names for the ensuing General Elections to the Legislative Assembly of Goa. pic.twitter.com/YjDbnTzsU4
— BJP (@BJP4India) January 20, 2022
भाजप उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वी गोवा भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आपवर जोरदार निशाणा साधला. मगोपने तृणमूल काँग्रेससोबत केलेल्या युतीमुळे गोव्यात प्रचंड नाराजी आहे. नाराज नेत्यांनीही मगोप सोडून अन्य पक्षांची वाट धरल्याचं चित्र आहे, असं फडणवीस म्हणाले. तर ‘दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्पनेतील योजनांमुळेच घराघरात पाणी पोहोचलं आहे. यात आपचं कोणतही श्रेय नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आपने गोव्यात येऊन कितीही आश्वासनं दिली तरी गोमंतकीय जनतेला त्यांचं सत्य माहित आहे’, अशा शब्दात फडणवीसांनी आपवर निशाणा साधला.
इतर बातम्या :