Gujarat Assembly Election 2022 Result: राहुल गांधी गुजरातमध्ये का गेले नाही? यशोमती ठाकूर यांनी दिलं उत्तर

| Updated on: Dec 08, 2022 | 12:19 PM

Gujarat Assembly Election 2022 Result: 'पण इतिहास भारत जोडोचं...' यशोमती ठाकूर म्हणाल्या....

Gujarat Assembly Election 2022 Result: राहुल गांधी गुजरातमध्ये का गेले नाही? यशोमती ठाकूर यांनी दिलं उत्तर
yashomati thakur
Image Credit source: instagram
Follow us on

नागपूर: गुजरात विधानसभा निवडणूक 2022 ची मतमोजणी सुरु आहे. गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार हे स्पष्ट दिसतय. 27 वर्षानंतरही गुजरातमध्ये भाजपाला हरवणं काँग्रेसला जमलेलं नाही. इतक्या वर्षाच्या सत्तेनंतर प्रस्थापित सरकारविरोधात लाट असली पाहिजे. पण इथे उलट चित्र दिसतय. भाजपा मागच्या काही निवडणुकांपेक्षा विक्रमी मताधिक्क्याने विजयी होईल असं दिसतय.

काँग्रेसवर चहूबाजूंनी टीका

सध्याचे जे कल आहेत, त्यानुसार भाजपा 151 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 21 आणि आम आदमी पार्टी 6 जागांवर आघाडीवर आहे. गुजरातचे हे निकाल येत असताना, काँग्रेस पक्षावर टीका सुरु आहे. त्यांना गुजरातमध्ये 27 वर्षानंतरही भाजपाला सत्तेबाहेर करणं शक्य झालेलं नाही.

भारत जोडो यात्रेवर प्रश्नचिन्ह

गुजरातमधील या दारुण पराभवानंतर काँग्रेसवर चहूबाजूंनी टीका सुरु झाली आहे. गुजरात आणि हिमाचल विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरु असताना, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु होती. आता सर्वसामान्य आणि विरोधकांकडून यावर प्रश्न विचारला जातोय.

गुजरातमध्ये निवडणूक असताना राहुल गांधी यांनी तिथे जाऊन का प्रचार केला नाही? ते दक्षिणेकडच्या राज्यात का फिरत होते? असे प्रश्न विचारले जातायत. त्यावर काँग्रेस नेत्या, आमदार यशोमती ठाकूर यांनी उत्तर दिलं आहे.


यशोमती ठाकूर यांनी उत्तर दिलं

“गुजरात मध्ये धनशक्ती, सत्तेचा अमर्याद वापर झाला आहे. अशा प्रवृत्तीचा विरोध करायचा असेल तर लोकांमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही, काँग्रेस ते काम करतंय. निवडणूक निकालांवर पक्ष आत्मचिंतन करेलच, पण इतिहास भारत जोडोचं योग्य मुल्यांकन करेल. भारत जोडो यात्रा काँग्रेसची विचारधारा मजबूत करत आहे. या यात्रेचा उद्देश्य देश वाचवणं आहे, कुण्या राज्याची सत्ता मिळवणं नाही. हुकूमशाही प्रवृत्तीचा पाडाव करायचा असेल तर विचारांचा किल्ला अधिक मजबूत करावा लागेल” असं त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.