जामनगर: गुजरात विधानसभा निवडणूक 2022 ची मतमोजणी सुरु आहे. गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार हे स्पष्ट दिसतय. 27 वर्षानंतरही गुजरातमध्ये भाजपाला हरवणं काँग्रेसला जमलेलं नाही. इतक्या वर्षाच्या सत्तेनंतर प्रस्थापित सरकारविरोधात लाट असली पाहिजे. पण इथे उलट चित्र दिसतय. भाजपा मागच्या काही निवडणुकांपेक्षा विक्रमी मताधिक्क्याने विजयी होईल असं दिसतय.
जामनगर उत्तरमध्ये काय स्थिती?
सध्याचे जे कल आहेत, त्यानुसार भाजपा 155 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 19 आणि आम आदमी पार्टी 5 जागांवर आघाडीवर आहे. गुजरातच्या या निवडणुकीत काही हाय प्रोफाइल लढतींकडे विशेष लक्ष आहे. यात जामनगर उत्तरची एक निवडणूक आहे.
रिवाबाच्या मतदारसंघाचा निकाल काय?
इथून भाजपाने प्रसिद्ध क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजाला उमेदवारी दिली होती. रिवाबाच्या प्रचारासाठी स्वत: रवींद्र जाडेजा मैदानात उतरला होता. जामनगरच्या गल्लीबोळात फिरुन त्यांनी प्रचार केला. आज निकालाचा दिवस होता. जामनगरच्या मतमोजणीकडे सर्वांचच लक्ष होतं.
असा जामनगर उत्तरचा निकाल
जामनगर उत्तरमधून रवींद्र जाडेजाची बायको रिवाबा जाडेजा विजयी झाली आहे. तिला 55,341 मतं मिळाली. त्यांनी आप आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा परभव केला. आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला केवळ 24,008 मते मिळाली. रिवाबाने मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. जामनगर उत्तरमध्ये काँग्रेस, आप आणि भाजपा असा तिहेरी सामना होता. काँग्रेसने इथून बिपेंद्रसिंह जडेजा यांना तिकीट दिलं होतं.