हरियाणा विधानसभा निवडणुकीत कुस्तीपटू विनेश फोगाटने बाजी मारली आहे. विनेशने भाजपा उमेदवार योगेश बैरागीला धूळ चारली. विनेशने जुलाना विधानसभा मतदारसंघातून 6,015 मतांनी विजय मिळवला. विजयानंतर विनेशने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी काँग्रेस पार्टीचा विश्वास कायम ठेवीन’ असं विनेश म्हणाली. काँग्रेस पिछाडीवर असल्याच्या प्रश्नावर ‘अजून प्रतिक्षा करा’ असं उत्तर दिलं. रिजल्ट येऊ दे असं विनेश म्हणाली. “मी पण आधी पिछाडीवर होते. रिजल्ट आल्यानंतर काँग्रेसच सरकार बनेल” असं विनेश म्हणाली. भाजापाचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी देखील वक्तव्य केलय. त्यांना कुस्ती संघटनेच्या पदावरुन हटवण्यासाठी बजरंग पुनिया आणि विनेश फोगाटने मोठ आंदोलन केलं होतं.
विधानसभा निवडणूक निकालासाठी बृजभूषण शरण सिंह यांनी हरियाणाच्या जनतेचे आभार मानले. विनेशच नाव न घेता ते म्हणाले की, “पैलवान जिंकलेत हे हरयाणाच्या निकालावरुन दिसून येतय. ते नायक नाही खलनायक आहेत” विनेशच्या विजयाच्या प्रश्नावर बृजभूषण म्हणाले की, ‘बर झालं ती जिंकली, पण काँग्रेसचा सत्यानाश झाला’
विनेश फोगाटची प्रतिक्रिया काय?
विनेश फोगाट हरियाणाच्या जुलाना येथून 6015 मतांनी जिंकली. तिला 65 हजार 80 वोट मिळाले. बैरागी यांना 59 हजार 65 वोट मिळाले. राजकारणात सक्रीय राहण्याच्या मुद्यावर विनेश म्हणाली की, “राजकारणात आलीय तर सक्रीय रहाव लागेल. लोकांनी प्रेम दिलय. त्यांच्यासाठी काम करावं लागेल. फिल्डवर उतरुन लोकांसाठी काम करीन. शक्य आहे तितकं खेळासाठी करीन. मी एका फिल्डपर्यंत मर्यादीत राहणार नाही”
अरविंद केजरीवालांचा काँग्रेसला टोमणा
हरियाणाच्या निकालावर आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काँग्रेसला टोमणा मारला. “कधीही अतिआत्मविश्वास असू नये हा या निवडणूक निकालाचा धडा आहे. कुठलीही निवडूक हलक्यात घेऊ नये. प्रत्येक जागा कठीण असते” असं अरविंद केजरीवाल म्हणाले.