लोकसभा निवडणूक 2024 नंतर आज देशात दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. हरियाणा आणि जम्मू-काश्मीर ही ती दोन राज्य आहेत. हरियाणात विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. मागच्या 10 वर्षांपासून हरियाणामध्ये भाजपाची सत्ता आहे. हरियाणामध्ये काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पार्टीशिवाय जेजेपीही निवडणुकीच्या रिंगणात आहे. विविध एक्झिट पोलच्या चाचण्यांनी हरियाणात काँग्रेसच सरकार येणार असल्याचे संकेत दिले आहेत. आता एक्झिट पोलचे अंदाज अचूक ठरतात की, सगळ्यांचे अंदाज चुकणार ते पुढच्या काही तासात स्पष्ट होईलच.
आर्टिकल 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. जम्मू-काश्मीर विधानसभेच्या एकूण 90 जागांसाठी तीन टप्प्यात मतदान झालं. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेसची युती होती. परंतु महबूबा मुक्ती यांची पीडीपी आणि भाजप स्वबळावर रिंगणात उतरले होते. एक्झिट पोलच्या आकड्यानुसार नॅशनल कॉन्फ्रन्स-काँग्रेस युतीला काश्मीरमध्ये आणि भाजपाला जम्मूमध्ये जास्त जागा मिळू शकतात. आता निकाल काय लागतात ते थोड्यावेळात स्पष्ट होईलच. काश्मीरच्या निकालाकडे सगळ्या देशाच लक्ष आहे.
अभिनेता एजाज खान पुन्हा अडचणीत, ड्रग्स प्रकरणात कस्टम विभागाने एजाज खानच्या कार्यालयात धाड टाकून त्याच्या ऑफिसबॉयला अटक केली.
35 लाखांच्या एमडीएम ड्रग्स प्रकरणात कस्टम कडून सूरज गौडला अटक करण्यात आली. सूरज गौड एजाज खानच्या अंधेरीतील कार्यालयात काम करतो.
युरोपियन देशातून तस्करी केलेले हे ड्रग्स एजाज खानच्या अंधेरीतील कार्यालयात पोहोचवण्यात आले होते. त्यावेळी कस्टमने कारवाई केली.
अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण व रुग्णालयाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. आज सकाळी 11 वाजता ऑनलाइन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.
हरियाणामध्ये काँग्रेसला फटका बसलाय. सलग तिसऱ्यांदा त्यांना विरोधी बाकावर बसाव लागेल असं चित्र आहे. पण विनेश फोगाटने मात्र निवडणूक जिंकली आहे. निवडणूक जिंकल्यानंतर तिने तिच्या भावना व्यक्त केल्या तसच बृजभूषण शरण सिंह सुद्धा बोलले आहेत. वाचा सविस्तर…
हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल सगळ्यांनाच धक्का देणारे आहेत. एक्झिट पोलचे आकडे सपशेल चुकल्याच दिसत आहे. हरियाणात भाजपा जवळपास 50 जागांवर आघाडीवर आहे. सत्ताविरोधी लाट भाजपाने कशी रोखली? ते या 3 फॅक्टरमधून समजून घ्या. वाचा सविस्तर…
जम्मू-काश्मीरचा पुढचा मुख्यमंत्री कोण? हे फारुक अब्दुल्लाह यांनी जाहीर केलय. जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता येणार हे दिसू लागताच फारुक अब्दुल्लाह आर्टिकल 370 च्या मुद्यावरुन नको ते बरळले आहेत. वाचा सविस्तर…
कुस्तीच्या रिंगमधून विनेश फोगाट राजकारणाच्या मैदानात उतरल्या आहेत. हरियाणात जुलानामधून त्या काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवत होत्या. विनेश फोगाट यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय. वाचा सविस्तर…
जम्मू-काश्मीरमधील भाजपाचा आतापर्यंतचा परफॉर्मन्स चांगला. प्रचंड मतदान झालं. पाकिस्तानचा प्रपोगंडा संपुष्टात आला. निष्पक्ष निवडणुका होतात हे दाखवून दिलं. ही निवडणूक म्हणजे पाकिस्तानला चपराक आहे. 370 हटवल्यानंतर रक्ताच्या नद्या वाहतील असं म्हणायचे, रक्ताच्या नद्या सोडा, लोक लोकशाही प्रक्रियेत सहभागी झाले. जम्मू-काश्मीरमध्ये लोकाशाही लोकनियुक्त सरकार सत्तेवर येणार आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्सकडे 47 जागांची तर भाजपा 29 जागांवर आघाडीवर आहे. पीडीपी 4 आणि इतरांकडे 8 जागांची आघाडी आहे.
हरियाणामध्ये आता काँग्रेस 36 आणि भाजपा 49 जागांवर आघाडीवर आहे. जेजेपी आप खातही उघडू शकलेले नाहीत. इतरांकडे 5 जागा आहेत.
हरियाणाच्या या 28 जागांवर गेम बदलू शकतो. उमेदवारांच्या आघाडीमधील अंतर 5 हजार मतांपेक्षा कमी आहे. यात पंचकूला, अटेली, दादरी, थानेसर, सोहना, बरौदा, अंबाला सिटी, फतेहाबाद, अंबाला कैंट, सिरसा, होडल और महेंद्रगढ या जागा आहेत.
मतमोजणीच्या फेऱ्या सुरु आहेत. भूपेंद्र हुड्डा यांच्या घराबाहेर 2 विजय रथ सजवण्यात आले आहेत. काँग्रेसच्या विजयानंतर या रथामधून विजय यात्रेची तयारी आहे.
हरियाणाच्या जुलानामधून काँग्रेस उमेदवार विनेश फोगाट विजयी झाल्याची बातमी आहे. भाजपाने कॅप्टन योगेश बैरागी, यांना उमेदवारी दिली होती. भाजपाने जुलानामध्ये एक दलित चेहरा दिला होता. इंडियन नॅशनल दलने सुरेंद्र लाठर, आम आदमी पार्टीकडून कविता देवीसह एकूण 12 उमेदवार रिंगणात होते.
जम्मू-काश्मीरमध्ये एनसी-काँग्रेस 49 जागांवर भाजपा 28, इतर 8 आणि पीडीपी 3 जागांवर आघाडीवर आहे. म्हणजे काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडीकडे बहुमतापेक्षा जास्त जागा आहेत.
हरियाणामध्ये आता काँग्रेस 35, भाजपा 49 जागांवर आघाडीवर आहे. जेजेपी, आपला खातही उघडता आलेलं नाहीय. इतर 6 जागांवर आघाडीवर आहेत.
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन काँग्रेसने निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण केलय. काँग्रेस नेत्या कुमारी सैलजा यांनी सकाळच्या आणि दुपारच्या निकालात बदल का? असा प्रश्न विचारलाय. निकाल कुठे अडकले आहेत? असं त्या म्हणाल्या.
हरयाणा विधानसभा निवडणुकीत विरेंद्र सेहवागने तोशाममध्ये प्रचार केला होता. सेहवागने काँग्रेस उमेदवार अनिरुद्ध चौधरींसाठी प्रचार केला होता. या मतदारसंघात सध्या भाजपाच्या श्रुती चौधरी आघाडीवर आहेत. श्रुतीला आतापर्यंत 38591 मत मिळाली आहेत.
14 व्या फेरी अखेर विनेश फोगाट जुलानामधून 5557 मतांनी आघाडीवर आहे. आता फक्त एकच राऊंड बाकी आहे. भाजपाने कॅप्टन योगेश बैरागी, यांना उमेदवारी दिलीय. भाजपाने जुलानामध्ये एक दलित चेहरा दिला आहे. इंडियन नॅशनल दलने सुरेंद्र लाठर, आम आदमी पार्टीकडून कविता देवीसह एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत.
“टीव्हीवर मतमोजणीच्या ज्या फेऱ्या दाखवल्या जात आहेत आणि प्रत्यक्षात जितकी मतमोजणी झालीय, त्यात विसंगती आहे. निवडणूक आयोगाचे डेटा अजून मागे आहे. अकरा फेऱ्यांची मतमोजणी झालीय. पण ते अजून चार ते पाच फेऱ्या दाखवत आहेत” असं काँग्रेसचे नेते पवन खेरा म्हणाले.
#WATCH | On Haryana, J&K election trends, Congress leader Pawan Khera says, “There is a mismatch in the actual number of rounds counted and the number of rounds being shown on the television through the Election Commission data. The EC data is lagging behind, they are still… pic.twitter.com/LROgMXa9VC
— ANI (@ANI) October 8, 2024
हरियाणात काँटे की टक्कर सुरु आहे. भाजपा 48 आणि काँग्रेस 36 जागांवर आघाडीवर आहे. INLD 2 आणि इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत. आप आणि जेजेपी खातही उघडू शकलेले नाहीत.
बिजबेहरा येथून निवडणूक लढणाऱ्या पीडीपीच्या प्रमुख महबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा पिछाडीवर आहे. तेच दोन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणारे ओमर अब्दुल्ला आघाडीवर आहेत.
हरियाणात अटी-तटीचा सामना सुरु आहे. पहिल्या तासाभरात काँग्रेसने मोठी आघाडी घेतली होती. बहुमतापेक्षा जास्त जागा त्यांच्याकडे होत्या. पण आता चित्र पालटलं आहे. आता भाजपाने बहुमताचा आकडा गाठलाय. पारडं कुठल्या बाजूला झुकेल हे सांगता येत नाही अशी स्थिती आहे. भाजपा 47 तर काँग्रेस 36 जागांवर आघाडीवर आहे.
मोदींचा कुत्रिम मुखवटा पूर्णपणे उतरला आहे. काँग्रेसच्या टॉनिकचा प्रभाव महाराष्ट्रात दिसेल. हरियाणात काँग्रेसचच सरकार येणार. संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास
हरियाणामध्ये चित्र पूर्णपणे पालटल आहे. काँग्रेसला धक्का बसणार असं दिसतय. काँग्रेस आता 34 जागांवर आघाडीवर आहे. भाजपा 48 म्हणजे भाजपाने बहुमताचा आकडा गाठलाय.
हरियाणात मतमोजणी रंगतदार बनली आहे. पहिल्या तासाभरात काँग्रेसने मोठी आघाडी घेतली होती. बहुमतापेक्षा जास्त जागा मिळणार असं दिसत होतं. पण अचानक चित्र पालटलं आहे. भाजपा आता काँग्रेसच्या पुढे निघून गेली आहे. भाजपा 38 तर काँग्रेस 31 जागांवर आघाडीवर आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या 90 जागा आहेत. त्यात नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस तब्बल 50 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. भाजपा 27, पीडीपी 3 आणि इतर 9 जागांवर आघाडीवर आहेत.
मुख्यमंत्री नायब सिंह सैनी लाडवा विधानसभा क्षेत्रातून आघाडीवर
जुलानामधून विनेश फोगाट आघाडीवर
अंबाला कँटमधून अनिव विज पुढे
कैथलमधून आदित्य सुरजेवाला आघाडीवर
रानियामधून अर्जुन चौटाला आघाडीवर
गढी सांपला-किलोईमधून भूपेंद्र सिंह हुड्डा पुढे
तोशाममधून श्रुती चौधरी आघाडीवर
हरियाणाच्या इंदरवालमधून अपक्ष उमेदवार जीएम सरूरी आघाडीवर.
जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस 48 जागांवर आघाडीवर आहे. भाजपाला 30 जागांची आघाडी मिळाली आहे. पीडीपी 4 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर आहेत.
हरियाणामध्ये सर्वच्या सर्व 90 जागांचे कल हाती आले आहेत. हरियाणात काँग्रेस 65 तर भाजपा 21 जागांवर आघाडीवर आहे. इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत. हरियाणात भाजपा एकतर्फी विजय मिळवणार असं चित्र दिसतय.
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला गंदरबाल विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. हरियाणामधून मुख्यमंत्री नायाब सैनी पुढे आहेत. अंबाला कँटमधून अनिल विज पुढे आहेत.
हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन्ही राज्यात मतमोजणी सुरु आहे. या दोन्ही ठिकाणी काँग्रेसच सरकार येण्याची चिन्ह आहेत. विजयाच्या शक्यतेमुळे काँग्रेस कार्यकर्ते उत्साहात आहेत. दिल्लीत काँग्रेस कार्यालयाबाहेर मिठाई वाटप सुरु झालय. हरियाणात प्राथमिक कलांमध्ये काँग्रेसला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत.
Congress workers distribute laddoos at AICC Headquarters in Delhi, as counting for #HaryanaElections and #JammuKashmirAssemblyElection gets underway. pic.twitter.com/vbW1h9kxWN
— ANI (@ANI) October 8, 2024
हरियाणामध्ये परिवर्तनाची लाट आहे. काँग्रेसची प्रचंड बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. काँग्रेस 63, भाजपा फक्त 16 जागांवर आघाडीवर आहे. 90 पैकी 85 जागांचे कल आले आहेत.
जम्मू-काश्मीरच्या जनतेने नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीला कौल दिला आहे. NC-काँग्रेस जवळपास 45 जागांवर आघाडीवर आहे. भाजपा 25 जागांवर आघाडीवर आहे.
“प्राथमिक कल मला सांगू नका. मागच्यावेळी प्राथमिक कल आले तेव्हा मी आघाडीवर होतो. पण नंतर पिछाडीवर गेलो. लंच झाल्यानंतर आपण बोलू” असं नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख ओमर अब्दुल्ला म्हणाले. ते बडगाम आणि बंदरगालमधून विधानसभा निवडणूक लढवत आहेत.
प्रसिद्ध महिला कुस्तीपटू विनेश फोगाट जुलानामधून आघाडीवर आहेत. त्या काँग्रेस उमेदवार आहेत. जाट मतदारांचा प्राबल्य असलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात शेतकऱ्यांची नाराजी होती.
हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. प्राथमिक कल आहेत त्यामध्ये, काँग्रेसच तुफान आलय. काँग्रेस 40 पेक्षा जास्त आणि भाजपा 16 जागांवर आघाडीवर आहे. इतर 4 जागांवर आघाडीवर आहे. 10 वर्षानंतर हरियाणामध्ये सत्ता पालट होणार असं चित्र दिसतय.
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या 90 जागांसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. प्राथमिक कल आहेत त्यानुसार, काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेसला 34 जागांवर आघाडी मिळाली आहे. भाजपा 19, पीडीपी 1 आणि इतर 2 जागांवर आघाडीवर आहेत.
हरियाणामध्ये पोस्टल मतमोजणीला सुरूवात झाली असून पहिला कल हाती आला आहे. काँग्रेस 5 तर भाजप 1 जागांवर आघाडीवर दिसत आहे.
Haryana Elections Result 2024 : हरियाणामध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे अवघ्या काही क्षणातच पहिला कल हाती येणार आहे.
निकाल जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नवी दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जात आहे.
#WATCH | Delhi: Ahead of the counting of votes, Congress workers gather outside the party headquarters and raise slogans in support of the party. #HaryanaElections #JammuKashmirAssemblyElection pic.twitter.com/CJ3VnGQgk6
— ANI (@ANI) October 8, 2024
निकाल जाहिर होण्याआधी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांचं मोठं वक्तव्य… भाजपची एकतर्फी सरकार येणार…
जम्मू-काश्मीरमध्ये शेवटच्या निवडणुका 2014 मध्ये झाल्या होत्या. म्हणून यावेळची निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची असणार आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने लढत आहेत. तर भाजप एकट्याने निवडणूक लढवत आहे.
जम्मू काश्मीर भाजपचे अध्यक्ष आणि नौशेराचे उमेदवार रवींद्र रैना यांनी निकालापूर्वी हवन केलं आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून हाती येणार आहेत.
#WATCH | J&K BJP President and candidate from Nowshera Assembly, Ravinder Raina performs Hawan ahead of the counting of votes for the J&K Assembly elections.
Vote counting for #JammuAndKashmirElection2024 to begin at 8 am. pic.twitter.com/2IHBGO1R6x
— ANI (@ANI) October 8, 2024