बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान आज पार पडलं आहे. या निवडणुकीसाठी आज एकाच टप्प्यात 224 जागांसाठीचं मतदान पार पडलं. त्यानंतर आता येत्या 13 मे ला मतमोजणी केली जाणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेची आकडेवारी आता समोर येत आहे. TV9 भारतवर्ष-POLSTRAT च्या एक्झिट पोलनुसार कर्नाटकमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागांवर निवडून येण्याची शक्यता आहे. पण तरीही बहुमतापासून काही अंतर लांब असणार आहे. कुणालाच बहुमत मिळणार नाही, अशी आकडेवारी सध्या समोर येताना दिसत आहे. त्यामुळे कर्नाटकात नेमकी कुणाची सत्ता येणार याबाबत आत्ताच अंदाज बांधणं कठीण आहे.
काँग्रेस – 99-109
भाजप – 88-98
जेडीएस- 21-26
इतर – 0-4
काँग्रेस – 100-112
भाजप – 83-95
जेडीएस- 21-29
इतर – 02-06
आजतक-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, मध्य कर्नाटकात काँग्रेसच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. मध्य कर्नाटकात विधानसभेच्या एकूण 23 जागा आहेत. यापैकी 12 जागांवर काँग्रेस विजयी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. तर भाजपला 10 जागांवर समाधान मानावं लागेल, असं दिसतंय. याशिवाय एक अपक्ष येथून निवडून येण्याची शक्यता आहे.
TV9 भारतवर्ष-POLSTRATच्या एक्झिट पोलनुसार, सीमा भागासह अन्य मतदारसंघांत भाजप मुसंडी मारण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला केवळ 3 ते 5 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे.
TV9 भारतवर्ष-POLSTRATच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, कल्याण कर्नाटक किंवा हैदराबाद कर्नाटक भागात काँग्रेसला 18 ते 20 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 8 ते 12 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तसेच जेडीएसला 1 आणि इतरांना 3 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
TV9 भारतवर्ष-POLSTRATच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, कर्नाटकच्या ओल्ड मैसूर येथील 55 जागांपैकी तब्बल 25 ते 27 जागांवर काँग्रेसला यश मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 6 ते 9 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे जेडीएसला 18 ते 20 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. तसेच अपक्षांना या भागात दोन जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, ओल्ड मैसूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरण्याचे संकेत मिळत आहेत.
TV9 भारतवर्ष-POLSTRATच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, बंगळुरुत काँग्रेस आणि भाजपात काँटे की टक्कर असणार आहे. ग्रेटर बंगळुरु भागात 32 जागांपैकी 15 ते 17 जागांवर भाजपला यश मिळण्याची शक्यात आहे. तर काँग्रेसला 13 ते 15 जागांवर काँग्रेसला यश मिळेल असा अंदाड आहे. तसेच जेडीएसला 0 ते 2 जागा मिळण्याची शक्यता आहे.
TV9 भारतवर्ष-POLSTRATच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, मुंबई कर्नाटक भागातही भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस असणार आहे. मुंबई कर्नाटकातील 50 जागांपैकी 24 ते 27 जागांवर भाजपला यश मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 23 ते 26 जागांवर यश मिळू शकचं. तर जेडीएसला एकाही जागेवर यश मिळणार नाही, असं एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे.