Karnataka Election Results 2023 : कर्नाटकात भाजपा पिछाडीवर, पण दुसऱ्या राज्यात बंपर आघाडी

| Updated on: May 13, 2023 | 10:17 AM

Karnataka Election Results 2023 : कर्नाटकात भाजपाची हार झाली, तरी दुसऱ्या राज्यातून समाधानकारक बतमी. कर्नाटकात सत्ता बदलाचा जनतेचा कौल दिसतोय. एक्झिट पोलमधून जे अंदाज वर्तवण्यात आले होते, निकालाचा कल सुद्धा तसाच दिसतोय.

Karnataka Election Results 2023 : कर्नाटकात भाजपा पिछाडीवर, पण दुसऱ्या राज्यात बंपर आघाडी
Karnataka Assembly election result 2023
Image Credit source: ANI
Follow us on

लखनौ : आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतायत. कर्नाटकात मतमोजणी सुरु आहे. कर्नाटकात प्रारंभीचे जे कल आहेत, त्यानुसार काँग्रेसकडे आघाडी आहे. कर्नाटकात काँग्रेस 100 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. तेच भाजपा 75 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. जेडीएस 25-30 मतदारंसघात आघाडीवर आहे. कर्नाटकात कोण सरकार बनवणार? ते आताच ठामपणे सांगता येणार नाही. पण काँग्रेसकडे संधी जास्त आहे.

कर्नाटकात जनता आलटून-पालटून कौल देत असते. आताही तोच ट्रेंड कायम आहे. कर्नाटकाच चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल. पण त्याचवेळी दुसऱ्या एका राज्यात भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. ही त्यातल्या त्यात भाजपासाठी समाधानाची बाब आहे.

भाजपाकडे कुठे बंपर आघाडी?

उत्तर प्रदेशात 760 महापालिकांसाठी मतमोजणी सुरु आहे. या महापालिका निवडणुकीत 17 महापौर पदांच्या जागा आहेत. भाजपाने मोठी आघाडी घेतली आहे. भाजपाचे 14 उमेदवार आघाडीवर आहेत. समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि बहुजन समाज पार्टीचे उमेदवार प्रत्येकी एक-एक सीटवर आघाडीवर आहेत.

कुठे होतेय निवडणूक?

उत्तर प्रदेशात आगरा, झांसी, शाहजहांपुर, फिरोजाबाद, सहारनपुर, मेरठ, लखनऊ, कानपूर, गाजियाबाद, वाराणसी, प्रयागराज, अलीगढ़, बरेली, मुरादाबाद, गोरखपुर, अयोध्या, मथुरा-वृंदावन या ठिकाणी महापौर पदासाठी निवडणूक झाली.

कुठल्या पदांसाठी झालं मतदान

उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 17 महापौर, 1420 नगरसेवक, नगर परिषदांचे 199 अध्यक्ष, नगर पालिका परिषदांचे 5327 सदस्य, नगर पंचायतीचे 544 अध्यक्ष आणि नगर पंचायतीच्या 7178 सदस्यांच्या निवडीसाठी दोन टप्प्यात मतदान झालं होतं. निवडणुकीत 17 महापौर, 1401 नगरसेवक निवडीसाठी मतदान झालं. 19 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली. उत्तर प्रदेशातील 75 जिल्ह्यांमध्ये दोन टप्प्यात 4 मे आणि 11 मे रोजी मतदान झालं होतं.