तिरुवनंतपूरम: केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने पिपल्स मेनिफेस्टो जारी केला आहे. तिरुवनंतपूरममध्ये आघाडीच्या नेत्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन हा जाहीरनामा जाहीर केला आहे. (Kerala: Congress-led UDF releases manifesto, promises 500,000 homes to poor)
आघाडीच्या या जाहीनाम्यामध्ये केरळच्या जनतेवर आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला आहे. केरळमधील सफेद रेशनाकार्ड धारकांना पाच किलो तांदूळ मोफत देण्याबरोबरच गरीबांसाठी पाच लाख घरे बांधण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
सबरीमाला मंदिरासाठी विशेष कायदा
सत्तेतल आल्यानंतर सबरीमाला येथील भगवान अयप्पाच्या मंदिराच्या सुरक्षेसाठी विशेष कायदा तयार करण्यात येणार आहे. राजस्थानच्या धर्तीवर हा कायदा तयार करून राज्यात शांतात आणि सौहार्दाचं वातावरण कायम ठेवण्यात येणार असल्याचं या पिपल्स मेनिफेस्टोमध्ये म्हटलं आहे.
गृहणींना पेन्शन
त्याशिवाय सरकारी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या महिलांच्या वयोमर्यादेत दोन वर्षांची सवलत देण्यात येणार आहे. तसेच 40 ते 60 वर्षां दरम्यानच्या गृहणींना दोन हजार रुपये पेन्शन म्हणून देण्यात येणार आहे. दर महिन्याला ही पेन्शन देण्यात येणार आहे, असंही या जाहीरनाम्यात म्हटलं आहे.
एकाच टप्प्यात मतदान
केरळमध्ये एका टप्प्यात मतदान होणार आहे. केरळात 6 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. 140 सदस्यांच्या या विधानसभेसाठी काँग्रेस 92 जागांवर निवडणूक लढणार आहे. 1982 पासून केरळमध्ये एलडीएफ आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ दर पाच वर्षानंतर आलटूनपालटून सत्तेत येत आहे. मात्र, ओपिनियन पोलनुसार केरळात पुन्हा डाव्यांचीच सत्ता येण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे केरळमध्ये सत्तेत येण्याचं काँग्रेसचं स्वप्न भंगताना दिसत आहे.
सीपीआय-एमचा डाव
दरम्यान, सीपीआय-एमच्या या निर्णयामुळे 25 आमदारांचं तिकिट कापलं जाणार आहे. यात केरळ विधानसभेच्या सभापतींसह 5 मंत्र्यांचाही समावेश आहे. हे 5 आमदार सलग सहा वेळा निवडून आलेले आहेत. या 25 आमदारांमध्ये सलग पाच वेळा निवडून आलेला 1 आमदार, चार वेळा निवडून आलेले 3 आमदार आणि तीन वेळा निवडून आलेल्या 3 आमदारांचा समावेश आहे. या सर्वांना यंदा तिकिट दिलं जाणार नाही. त्यामुळे यांच्या जागेवर कोणत्या नव्या तरुणांना संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सीपीआयएमला निवडणुकीत फायदा की तोटा?
सीपीआयएमच्या या निर्णयाने पक्षातील तरुणांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. मात्र, दुसरीकडे सलग दोन पेक्षा अधिक वेळा निवडून आलेल्या आमदार, मंत्र्यांसह त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. लोकप्रिय नेत्यांना तिकिट देण्यापासून डावललं जात असल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. राजकीय विश्लेषकांनीही सीपीआयएमला या निर्णयाचा फटका बसू शकतो असा अंदाज वर्तवला आहे. (Kerala: Congress-led UDF releases manifesto, promises 500,000 homes to poor)
VIDEO | SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 20 March 2021https://t.co/66mOzBZQG3
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 20, 2021
संबंधित बातम्या:
पेट्रोल पंपावरील मोदींचे बॅनर 72 तासांत हटवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश
भाजपच्या ‘या’ उमेदवारावर 10-20 नव्हे, तर तब्बल 242 गुन्हे
(Kerala: Congress-led UDF releases manifesto, promises 500,000 homes to poor)