मुंबई : पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका ( Loksabha Election 2024 ) होत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षा ही मागे नाही. भारतीय जनता पक्षाने 2 वर्षापासूनच यासाठी तयारी सुरु केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा अमित शहा हेच मोदींचे सर्वात मोठे स्ट्रॅटेजिस्ट असणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी दोन दिवसांच्या ईशान्येच्या दौऱ्यावर असताना आसाममध्ये एका सभेला संबोधित करताना मोठे वक्तव्य केले आहेत.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात सर्वात मोठा दावा केला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची नेत्रदीपक कामगिरी करेल. आसाममध्ये भाजप 14 पैकी 12 जागा जिंकेल. तर देशभरात भाजप 300 हून अधिक जागा जिंकेल आणि मोदी तिसर्यांदा पंतप्रधान होतील असं अमित शहा म्हणाले.
मेघालय, त्रिपुरा आणि नागालँडमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्रिपुरामध्ये भाजपने सरकार स्थापन केले आहे. तर इतर दोन राज्यांमध्ये युतीसोबत भाजप सत्तेत सहभागी झाले आहे.
राहुल गांधी यांनी युनायटेड किंग्डम दौऱ्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर देखील अमित शाह यांनी जोरदार निशाणा साधला आहे. ‘परदेशात भारताचा अपमान केला. पण त्यांनी हे असंच सुरु ठेवलं की काँग्रेस केवळ ईशान्येतूनच नाही तर संपूर्ण देशातून नष्ट होईल.’
अबकी बार, फिर 300 पार pic.twitter.com/kL0mRwJlhf
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) April 11, 2023
अमित शाह म्हणाले की, ‘वादग्रस्त सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा, 1958, किंवा AFSPA, आसामच्या 70 टक्के भागात रद्द करण्यात आला आहे आणि बोडोलँड आणि कार्बी आंगलाँगमध्ये शांतता पुनर्संचयित झाली आहे. राज्य आणि त्याच्या शेजारील प्रांतांमधील सीमा विवाद मिटला आहे.’
बिहूच्या निमित्ताने गुवाहाटी येथे १४ एप्रिल रोजी एक मोठा कार्यक्रम होणार आहे. येथे 11 हजार डान्सर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत परफॉर्म करणार आहेत.