प्रसिद्ध ज्योतिष अनिल थत्ते यांनी लोकसभा निवडणुकीआधी अनेक भाकीतं वर्तवली आहे. महाराष्ट्रात महायुतीच्या सर्वाधिक जागा जिंकून येतील, असं भाकीत अनिल थत्ते यांनी वर्तवलं आहे. विशेष म्हणजे अनिल थत्ते यांनी बारामती, कल्याण, ठाणे लोकसभा मतदारसंघात कोण जिंकून येणार? याबाबत भविष्यवाणी केली आहे. “सुप्रिया सुळे यांना बॅकग्राऊंड आहे. अजित पवारांनी कोणालातरी कार्यकर्त्याला उभे केले असते तर बात वेगळी होती. मात्र स्वतःच्या पत्नीला त्यांनी उभे केले. त्यामुळे मला तरी वाटतं की सुप्रिया सुळे तिकडे निवडून येतील. मुंबई वायव्य मतदारसंघात ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर हे शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यावर मात करतील”, असा दावा अनिल थत्ते यांनी केला.
“केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वतःची पुण्याई पणाला लावली आहे. मात्र त्यांच्या दोन मुलांमुळे कोकणात प्रचंड अस्वस्थता आहे. ते निवडून आले तर त्यांची पुण्याई ही कामी आली असे म्हणता येईल. तर ते पडले तर त्याला कारणीभूत त्यांची दोन्ही मुले असतील”, असं भाकीत अनिल थत्ते यांनी वर्तवलं आहे.
“शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे एकनाथ शिंदे हे शिष्य आहेत. आनंदी दिघे यांच्यावर ठाकरेंनी अन्याय केला हे धर्मवीर पिक्चरच्या निमित्ताने सेट झाले. एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे आहेत. ते साम, दाम, दंड भेद वापरून निवडणुकीत उतरले. श्रीकांत शिंदे दोन अडीच लाखांनी निवडून येतील तर नरेश म्हस्के एक-दीड लाखांनी निवडून येतील. राजन विचारे यांनी ठाण्यामध्ये काही खासदार झाल्यानंतर कामगिरी दाखवली नाही. त्यामुळे त्यांचे फारसे अस्तित्व नव्हते”, असं भाकीत अनिल थत्ते यांनी वर्तवलं.
“प्रकाश परांजपे हे पहिले नगरसेवक होते. नंतर खासदार झाले. त्यामुळे ठाण्याला नगरसेवक ते खासदार अशी परंपरा आहे. त्यामुळे यात नरेश मस्के खासदार झाले तर काही विशेष नाही. लोकांमध्ये मिसळण्याबाबत नरेश जास्त सक्रीय आहेत. एकनाथ शिंदे यांचा हुकूमाचा एक्का नरेश म्हस्के आहेत. तो त्यांनी बाहेर काढला आहे”, असा दावा अनिल थत्ते यांनी केला.
“एकनाथ शिंदे यांचे मुस्लिमांबरोबर अत्यंत चांगले संबंध आहेत. जर मशिदीतून फतवा मिळाला तर एकनाथ शिंदे यांना मत द्या असाच फतवा निघेल त्यांचा प्रॉब्लेम झाला. राज ठाकरेंनी कळव्यामध्ये येऊन जे भाषण केले त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम झाला. एकनाथ शिंदेंना देखील हे भाषण अपेक्षित नव्हते. त्यांची समजूत घालता घालता एकनाथ शिंदे यांची पंचायत झाली”, असा दावा अनिल थत्ते यांनी केला.
“संविधानाचा विषय हा मुसलमानांपेक्षा दलितांना जास्त भावनिक वाटतो. संविधानात मोदी बदल करणार त्यामध्ये काही गोष्टी मुसलमानांच्या विरोधात आहेत. हे अजून मुसलमानांच्या लक्षात आलेले नाही. पण श्रीकांतला याचा कोणताही फटका बसला नाही. बसणार नाही. त्याचं गुडवील चांगलं आहे”, असं अनिल थत्ते म्हणाले.