शरद पवार आणि अजित पवार यांचा फोटो
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
लोकसभा निवडणुकीचे मतदानाचे सात टप्पे पूर्ण झाले. त्यानंतर शनिवारी एग्झिट पोल समोर आला. ‘टीव्ही ९ मराठी’ने महाराष्ट्राचा एग्झिट पोल जाहीर केला आहे. त्या पोलमध्ये महायुतीला मोठा फटका बसत असल्याचे दिसत आहे. तसेच महाविकास आघाडीला फायदा झाल्याचे दिसत आहे. असली, नकलीची निवड जनतेने एग्झिट पोलमध्ये केली आहे. एग्झिट पोल हा अंदाज असून प्रत्यक्षात निकाल ४ जून रोजी येणार आहे. या सर्व्हेमध्ये सर्वाधिक फटका अजित पवार यांना बसला आहे. त्यांना एकही जागा मिळत नाही. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पराभूत होत आहे. त्या ठिकाणी सुप्रिया सुळे यांच्या विजयाचा अंदाज आहे.
शिंदेंना धक्का, ठाकरेंची बाजी
राज्यातील राजकारणात दोन वर्षांत मोठे बदल झाले. शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० पेक्षा जास्त आमदार एकत्र आले. उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला होता. परंतु लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या गटाला फटाका बसल्याचे एग्झिट पोलमध्ये दिसत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना फायदा झाल्याचे दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागत आहे. परंतु उद्धव ठाकरे यांना १४ जागा मिळाल्या आहेत.
अजित पवार यांना धक्का
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत बंडखोरी केली. शरद पवार यांना धक्का देत अजित पवार यांनी महायुतीसोबत सत्ता स्थापन केली. काका-पुतण्यामधील या वर्चस्व वादात शरद पवार यांना बाप बाप होता है…हे एग्झिट पोलमध्ये दाखवून दिले आहे. या एग्झिटपोलमध्ये शरद पवार गटाला सहा जागांवर विजय मिळाला आहे. सर्वाधिक प्रतिष्ठेची ठरलेल्या बारामती येथील जागेवर शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पराभूत होताना एग्झिट पोलमध्ये दिसत आहे.
पक्ष |
जागा |
भाजप |
१८ |
शिवसेना |
४ |
राष्ट्रवादी |
०० |
काँग्रेस |
५ |
ठाकरे गट |
१४ |
शरद पवार गट |
६ |
इतर |
१ |
एग्झिटपोलमध्ये राज्यात भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरल्याचे दिसत आहे. भाजपला १८ जागांवर विजय मिळत असल्याचे दिसत आहे. सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी होताना दिसत आहे.
48 मतदारसंघांमध्ये विजयाची शक्यता असलेले संभाव्य उमेदवार
- 1) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध यामिनी जाधव – शिंदे गट
- 2) दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे – शिंदे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध अनिल देसाई – ठाकरे गट
- 3) उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तिकर – ठाकरे (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध रविंद्र वायकर – शिंदे गट
- 4) बुलढाणा – नरेंद्र खेडेकर – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध प्रतापराव जाधव – शिंदे गट
- 5) ठाणे – राजन विचारे – ठाकरे (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध नरेश म्हस्के – शिंदे गट
- 6) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध वैशाली दरेकर – ठाकरे गट
- 7) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध हेमंत गोडसे – शिंदे गट
- 8) औरंगाबाद – चंद्रकांत खैरे – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध संदीपान भुमरे – शिंदे गट
- 9) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध बाबूराव कदम – शिंदे गट
- 10) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता ) विरुद्ध राजश्री पाटील – शिंदे गट
- 11) हातकणंगले – सत्यजीत पाटील – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता ) विरुद्ध धैर्यशील माने – शिंदे गट
- 12) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध संजोग वाघेरे-पाटील – ठाकरे गट
- 13) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध सदााशिव लोखंडे – शिंदे गट
- 14) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट (जिंकण्याची शक्यता), सुनेत्रा पवार – राष्ट्रवादी
- 15) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट (जिंकण्याची शक्यता), शिवाजी आढळराव – राष्ट्रवादी
- 16) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध भूषण पाटील – काँग्रेस
- 17) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध उज्वल निकम – भाजप
- 18) नंदुरबार – डॉ. हिना गावित – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध गोपाल पाडवी – काँग्रेस
- 19) धुळे – सुभाष भामरे – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध डॉ. शोभा बच्छाव – काँग्रेस
- 20) जालना – रावसाहेब दानवे – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध डॉ. कल्याण काळे – काँग्रेस
- 21) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध सुधाकर श्रृंगारे – भाजप
- 22) नांदेड – प्रताप चिखलीकर – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध वसंतराव चव्हाण – काँग्रेस
- 23) अकोला – अनुप धोत्रे – भाजप विरुद्ध अभय पाटील – काँग्रेस (अंदाज येणे अजून बाकी)
- 24) अमरावती – नवनीत राणा – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध बळवंत वानखेडे – काँग्रेस
- 25) नागपूर – नितीन गडकरी – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध विकास ठाकरे – काँग्रेस
- 26) भंडारा-गोंदिया – सुनील मेंढे – भाजप विरुद्ध डॉ. प्रशांत पडोळे – काँग्रेस (अंदाज येणे अजून बाकी)
- 27) गडचिरोली – अशोक नेते – भाजप विरुद्ध डॉ. नामदेव किरसान – काँग्रेस (अंदाज येणे अजून बाकी)
- 28) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध सुधीर मुनगंटीवार – भाजप
- 29) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध रविंद्र धंगेकर – काँग्रेस
- 30) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध राम सातपुते – भाजप
- 31) भिवंडी – कपिल पाटील – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध सुरेश म्हात्रे – शरद पवार गट
- 32) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध डॉ. भारती पवार – भाजप
- 33) रावेर – रक्षा खडसे – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध श्रीराम पाटील – शरद पवार गट
- 34) बीड – पंकजा मुंडे – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध बजरंग सोनवणे – शरद पवार गट
- 35) वर्धा – रामदास तडस – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध अमर काळे – पवार
- 36) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर – भाजप
- 37) सातारा – शशिकांत शिंदे – शरद पवार गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध उदयनराजे भोसले – भाजप
- 38) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट (जिंकण्याची शक्यता), सुजय विखे पाटील – भाजप
- 39) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध मिहीर कोटेचा – भाजप
- 40) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध भारती कामडी – ठाकरे
- 41) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध विनायक राऊत – ठाकरे गट
- 42) जळगाव – स्मिता वाघ – भाजप (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध करण पवार – ठाकरे गट
- 43) सांगली – संजयकाका पाटील – भाजप विरुद्ध चंद्रहार पाटील – ठाकरे विरुद्ध अपक्ष विशाल पाटील (जिंकण्याची शक्यता)
- 44) रायगड – अनंत गीते – ठाकरे (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध सुनील तटकरे – राष्ट्रवादी
- 45) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध अर्चना पाटील – राष्ट्रवादी
- 46) परभणी – संजय जाधव – ठाकरे (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध महादेव जानकर – राष्ट्रवादी
- 47) रामटेक – राजू पारवे – शिवसेना (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध श्यामकुमार बर्वे – काँग्रेस
- 48) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस (जिंकण्याची शक्यता) विरुद्ध संजय मंडलिक – शिवेसना