लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, एनडीला देशात सर्वाधिक जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडीचा धुव्वा उडण्याची शक्यता आहे. देशात पुन्हा सरकार स्थापन करायचं असेल तर 272 जागांवर यश मिळवणं गरजेचं आहे. हा आकडा महायुती सहज पार करणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलची आकडेवारी सांगत आहे. देशभरात विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेनुसार, या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. आम्ही तुम्हाला देशातील विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेची आकडेवारी सांगणार आहोत. कोणत्या संस्थेने कोण किती जागा जिंकणार? याबाबतची आकडेवारी सांगितली आहे. अर्थात ही आकडेवारी अंतिम नसून केवळ अंदाज आहे.
रिपब्लिक-मॅट्रीझच्या आकडेरीनुसार, देशात एनडीएला सर्वाधिक जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. मॅट्रीझच्या पोलनुसार, एनडीला 353 ते 368 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडीला 118 ते 133 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर 43 ते 48 अपक्ष उमेदवारांना विजय मिळण्याची शक्यता आहे.
PMARQ च्या आकडेवारीनुसार, एनडीला देशात 359 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीला 154 जागा, तर 30 अपक्षांना विजय मिळण्याची शक्यता आहे.
डी-डायनामिक्सच्या आकडेवारीनुसार, देशात एनडीएला 371 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडीला 125 तर 47 अपक्षांना विजय मिळण्याची शक्यता आहे.
सीएनएक्सच्या आकडेवारीनुसार, एनडीला देशात 371 ते 401 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडीला 109 ते 139 आणि अपक्षांना 28 ते 38 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.
एबीपी सी-वोटरच्या आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एनडीएला 231 ते 275 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीला 121 ते 161 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर अपक्षांना 2 ते 10 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. भाजपला सर्वाधिक 18 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाला यश मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाला 14 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला 6 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 5 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला 4 जागांवर यश मिळण्याती शक्यता आहे. तर अजित पवार गटाला एकाही जागेवर यश मिळणार नाही, अंदाज वर्तवण्यात आला आहे.