लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा आज पूर्ण होत आहे. त्यानंतर संध्याकाळी एग्झिट पोल येणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी येणार आहे. त्यापूर्वी विविध राजकीय निरीक्षक, भविष्यवेत्तांकडून भविष्यवाणी केली गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म कुंडलीनुसार प्रसिद्ध ज्योतिषी कृष्णा स्वामी यांनी भविष्य वर्तवले आहे. त्यामुळे ४ जून रोजी नेमके काय होणार? याचा अंदाज बांधला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी झाला. त्यांच्या जन्माप्रसंगी मंगळ त्यांच्या कुंडलीत वृश्चिक राशीत होता. तसेच अकरा घरात सूर्य बुध, केतु आणि नेप्चयून होते. गुरु चौथ्या घरात तर शुक्र आणि शनी समोरासमोर होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुंडलीत असलेल्या ग्रहांच्या या परिस्थितीमुळे अनेक शुभ योग बनले आहे. या ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भविष्य उज्ज्वल आहे. राजकारणात सर्वोच्च स्थानावर ते पोहचू शकले आहे. आपला आत्मबल, दृढता आणि धाडसामुळे ते सतत पुढे जात राहिले.
कृष्णा स्वामी यांच्यानुसार नरेंद्र मोदी यांच्या कुंडलीत शनी अस्त मध्ये आहे अन् 29 डिग्रीवर आहे. तसेच भाजपच्या कुंडलीत वृषभ आणि वृश्चिक राशी आहे. वर्तमान काळात चंद्रमा शनिबरोबर आहे. यामुळे शुभ योग जुळून येत आहे. ग्रहांच्या या परिस्थितीचा लाभ भाजपला मिळणार आहे. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहे.
ज्योतिष शास्त्री कृष्णा स्वामी म्हणतात, नरेंद्र मोदी यांची सरकार पूर्ण बहुमताने येणार आहे. परंतु 400 पार होऊ शकणार नाही. भाजपला आपल्या सहयोगी पक्षांसोबत 352 जागा मिळणार आहे.
भविष्यासंदर्भात बोलताना कृष्णा स्वामी म्हणतात, कारगिलसारखे ग्रहयोग फेब्रुवारी 2026 मध्ये होऊ शकतात. त्यामुळे पीओकेमध्ये युद्ध होईल. भारताचे पाकिस्तान आणि चीनसोबत युद्ध होऊ शकते. यामध्ये भारताचे नुकसान होणार असले तरी विजय भारताचाच होईल.