एक्झिट पोलचा कौल येण्यापूर्वीच दिल्लीत मोठ्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी इंडिया आघाडीचे सर्वच नेते जमले होते. निवडणुकीच्या निकालाबाबत या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला फक्त टीएमसीचे नेते नव्हते. इतर सर्वच पक्षाचे नेते उपस्थित होते. निवडणूक निकालानंतर काय करायचं? त्यावेळची रणनीती काय असेल? याचा विचार या बैठकीत करण्यात आला. तसेच सत्ता आली नाही तर काय करायचं? यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
बैठकीपूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोठं विधान केलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी थेट पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं आहे. इंडिया आघाडीचं सरकार बनल्यास राहुल गांधी हेच आमचे पंतप्रधानपदाचे पहिली पसंत असतील, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी यांनी निवडणूक लढावी म्हणून आम्ही भरपूर आग्रह धरला होता. पण प्रियंका गांधी यांनीच निवडणूक लढण्यास नकार दिला, असं खरगे यांनी सांगितलं.
इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आपचे खासदार संजय सिंह आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. तेजस्वी यादव यांच्यासोबत व्हीआयपी चीफ मुकेश साहनी हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. मुकेश साहनी हे इंडिया आघाडीच्या बैठकीला पहिल्यांदा हजर राहिले आहेत. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि झारखंडचे मुख्यमंत्री चपंई सोरेन यांनीही या बैठकीला हजेरी लावली होती.
इंडिया आघाडीच्या समन्वय समितीने महत्त्वाच्या नेत्यांना बैठकीला बोलावलं होतं. या बैठकीसाठी एकूण 15 पक्षाच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं.
INC- सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, केसी वेणुगोपाल
NCP (pawar)- शरद पवार, जितेंद्र आह्वाड
DMK- टी आर बालू
Shiv Sena (UBT)- अनिल देसाई
AAP-केजरीवाल, भगवंत मान, राघव चड्ढा
RJD-तेजस्वी यादव
TMC- गैरहजर
CPM- सीताराम येचुरी
JMM-चम्पई सोरेन, कल्पना सोरेन
NC-फारुख अब्दुल्ला
PDP- गैरहजर, पण पाठिंबा
SP-अखिलेश यादव
CPI- डी राजा
CPI(ML)- दीपंकर भट्टाचार्य
VIP (new entry)- मुकेश सहनी