बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत यांनी त्यांच्या पहिल्या निवडणुकीतच विजय मिळवला आहे. भाजपच्या वतीने अभिनेत्री हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. मंडी मतदार संघात कंगना यांच्या विरोधात काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह होते. कंगना रनौत यांनी मंडी लोकसभा जागेवर जोरदार प्रचार केला आणि विजय मिळवला. अभिनेत्रीची ही पहिलीच निवडणूक असून कंगनाने पहिली निवडणूक जिंकली आहे.
पहिल्यांदा निवडूण आल्यामुळे कंगना यांनी पंतप्रधान मोदी आणि जनतेचे आभार मानले आहेत. कंगना म्हणाल्या, ‘आमचे नेता नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडणूक लढवली आहे. मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आम्हाला हवे आहेत. मंडीचं भाविष्य आता उज्वल असणार आहे…. असं म्हणत कंगना यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकल्यानंतर भावना व्यक्त केल्या आहेत.’
सांगायचं झालं तर, कंगना यांनी विक्रमादित्य सिंह यांच्यावर 73 हजार मतांनी मात केली आहे. कंगना रनौत यांना 503790 जनतेनं मत दिलं. विक्रमादित्य सिंह यांना 430534 मतं मिळाली आहेत. कंगना यांच्या विजयानंतर मंडी मतदार संघात आनंदाचं वातावरण आहे.
सोशल मीडियावर कंगना यांनी आईसोबत काही फोटो पोस्ट केले आहे. फोटोंमध्ये कंगना आईचे आशीर्वाद घेताना दिसत आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर, कंगना यांनी आता स्वतःचा मोर्चा राजकारणाकडे वळवळा आहे. सध्या सर्वत्र कंगन यांच्या विजयाच्या चर्चा रंगल्या आहे.
कंगना रनौत यांच्या विजयानंतर अभिनेत्री बॉलिवूड सोडणार का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण निवडणूक प्रचारादरम्यान कंगना यांनी निवडणूक जिंकली तर बॉलिवूड सोडेन, असं वक्तव्य केलं होते. आता कंगना रनौत यांची पुढील वाटचाल आणि घोषणा काय असेल हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.