देशात 18 व्या लोकसभेच्या निवडीसाठी निवडणुका सुरु आहेत. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्याच मतदान पार पडलं. आज 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्याच मतदान होत आहे. मतदानाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात देशातील एकूण 13 राज्य आणि केंद्र शासित प्रदेश मिळून 89 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. आसाम, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, केरळ, मणिपूर, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या भागात मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात एकूण 8 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यात विदर्भातील 6 आणि मराठवाड्यातील 2 जागा आहेत. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, आणि परभणी या महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. देशात भाजपा प्रणीत NDA विरुद्ध काँग्रेस प्रणीत INDIA अशी लढत आहे. निवडणुकी संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडी पुढच्या दोन दिवसात पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे. याबाबत विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. विशाल पाटील यांच्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सांगलीमध्ये प्रचारसभा सुद्धा घेण्याची शक्यता आहे. सांगली लोकसभेचे राजकीय समीकरण वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंबामुळे बदलणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
परभणीच्या बलसा खुर्दमध्ये अखेर साडेनऊ वाजता मतदान संपन्न झालं. गावात 1295 मतदार आहेत. त्यापैकी 629 जणांचं मतदान झालं. सकाळी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी गावाला भेट देत ग्रामस्थांची मनधरणी केल्यानंतर दुपारून मतदानाला सुरुवात झाली होती. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतदान सुरुवात होतं. गावात एकूण 1295 मतदान आहे. त्यापैकी 629 मतदान झाले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल लोकसभा निवडणुकीचा प्रचार करणार आहेत. उद्यापासून आपसाठी प्रचार आणि रोड शो सुरू करणार आहे. पंजाब, गुजरात आणि हरियाणामध्येही प्रचार करणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, काँग्रेस पक्ष राम मंदिराचा मुद्दा 70 वर्षे रखडवला. जनतेने मोदीजींना विजयी केले आणि मग ते राम मंदिर प्रकरण जिंकले आणि मंदिरही बांधले. आम्ही सर्वांनी रामलल्लाला मंडपातून मंदिरात बसलेले पाहिले. राहुल गांधी आणि दिग्विजय सिंगही गेले नाहीत. त्यांना त्यांच्या व्होट बँकेची भीती वाटते.
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात गरिबांचे पैसेच हिसकावले आहेत. 70 कोटी भारतीयांइतके पैसे असलेले 22 लोक आहेत. भारतातील 1 टक्के लोक 40 टक्के संपत्तीवर नियंत्रण ठेवतात आणि त्यात मागासलेले, दलित, आदिवासी यांना स्थान नाही. ही एक साधी गोष्ट आहे. मी तुम्हाला एका ओळीत सांगतो, पंतप्रधान मोदींनी त्या अब्जाधीशांना जेवढे पैसे दिले तेवढेच पैसे आम्ही भारतातील गरीब लोकांना देणार आहोत.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, ‘पंतप्रधानांचे म्हणणे खरे ठरेल. आज वायनाड निवडणूक संपताच काँग्रेस अमेठीतून राहुल गांधी यांच्या नावाची घोषणा करणार आहे. जनतेची फसवणूक करण्याचा त्यांचा हेतू आहे.
सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे नाशिक लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. पक्षाने सांगितल्यास मी निवडणूक लढवणार असं वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलंय. नाशिकची जागा राष्ट्रवादीला याआधीच सुटली आहे. भुजबळांना तिकीट देण्यास दिल्लीतील नेत्यांनी सांगितल्यावर नाशिकची जागा राष्ट्रवादीला सुटली आहे. उबाठाचे उमेदवार राजाभाऊ वाजे देखील सिन्नरचे आहेत. सिन्नर ऐवजी दुसऱ्या भागातील उमेदवार दिल्यास सिन्नर मधून वाजेंना मोठ्या प्रमाणात लीड मिळेल.
“तेव्हा रावणाने हनुमानाला शेपटी पेटवतो म्हणून भीती दाखवली होती. तशीच आज सरकारकडून भल्या भल्या नेत्यांना कारवाईची भीती दाखवली जाते. तेव्हा हनुमंत रायाने रावणाची बाजू घेतली नाही, हनुमाची शेपटी रावणाने पेटवली आणि त्याच पेटत्या शेपटीची मशाल करून रावणाची संपूर्ण सोन्याची लंका जाळून टाकली. परंतु आज निष्ठा ठेवली जात नाही. जर निष्ठा ठेवली तर समोरून दबाव टाकणाऱ्यांची लंका दहन झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटणाऱ्या सरकारची लंका आता आपल्याला दहन करायची आहे,” असं अमोल कोल्हे म्हणाले.
उद्या पुण्यात शिवसंग्रामची महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीत ज्योती मेटे आपली भूमिका जाहीर करणार आहेत. ज्योती मेटे या शिवसंग्राम महायुती की महाविकास आघाडीला पाठिंबा देणार? की तटस्थ राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उद्या राज्यातील पदाधिकाऱ्यांना पुण्यात बोलावण्यात आलं आहे. उद्याच्या बैठकीत शिवसंग्रामचा निर्णय जाहीर होणार आहे. ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.
यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 11 वाजतापर्यंत 18.01 टक्के मतदान झालं.
सकाळी 7 ते 11 दरम्यान विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान-
दिग्रस : 20.22%
कारंजा : 27.22%
पुसद : 18.69%
राळेगाव : 20.85%
वाशिम : 20.26%
यवतमाळ : 11.56%
नवी दिल्ली- दिल्ली महापालिकेत प्रचंड गोंधळ झाला आहे. सभागृहात भाजप आणि आम आदमी पक्षाचे नगरसेवक आमने सामने झाले आहेत. दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हातात फलक घेऊन नगरसेवक टेबलवर चढल्याने प्रचंड गोंधळ झाला. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून आणि इतर मुद्द्यांवरून भाजप आणि आपच्या नगरसेवकांमध्ये जोरदार वादावादी झाली.
नांदेड लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत वाजेपर्यंत 20.85 % मतदान झाल्याची माहिती मिळत आहे.
बुलढाणा याठिकाणी मतदान केंद्रात मोबाईलला बंदी असताना मतदान करताना फोटो व्हायरल.. मतदान केंद्र अधिकारी करतात तरी काय?
वंचितचे उमेदवार अविनाश भोसीकर यांचे उपोषण… मतदान केंद्रावर पोलिंग एजंटला बसू न दिल्याचा आरोप… नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर वंचितचं उपोषण…
परभणीच्या बलसा खुर्दमध्ये मतदानावर बहिष्कार… बलसा खुर्दमध्ये सकाळपासून एकही मतदान नाही… गावातील अतिक्रमणाविरोधात निवेदन देऊनही कारवाई नाही… त्याविरोधात संतप्त ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार…
परभणीच्या बलसा खुर्द या गावांमध्ये मतदानावर मतदारांनी बहिष्कार घातला आहे. 1295 मतदान असलेल्या या केंद्रावरती सकाळपासून एकही नागरिकाने मतदानाचा अधिकार बजावला नाह. बलसा गाव काही वर्षांपूर्वी प्रशासनाकडून पुनर्वसन करण्यात आले होते. अतिक्रमणाच्या नाराजीतून हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे.
पहिल्या टप्प्यात मतदान कमी झाल्यावर भाजपने महत्त्वपूर्ण बैठक घेत मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले होते. याचाच परिणाम उत्तर भारतात दिसून येतोय, अशी चर्चा राजकिय वर्तुळात आहे. पण महाराष्ट्र राज्यात मतदारांमध्ये उत्साह दिसत नसल्याचे समोर येत हे. सकाळपासून सर्वात कमी टक्केवारी ही महारष्ट्र राज्यात आहे.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात 21 बॅलेट युनिट बदलले. तर 26 vvpat मशीन बदलविले आणि 11 कंट्रोल युनिट मॉक पोल वेळी बद्दलविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. या ठिकाणी मतदान आता सुरळीत सुरू आहे.
महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव मतदानासाठी मादनी मतदान केंद्रावर दाखल झाले होते. त्यांनी मतदानाचा अधिकार बजावला. ते परिवारासह मतदान केंद्रावर मतदानासाठी दाखल झाले होते.
भाजपचे प्रमुख आणि बालूरघाटातील लोकसभा उमेदवार सुकांता मजुमदार आणि तृणमूल काँगेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे समोर येत आहे. मतदान केंद्रावर तणाव आहे. मोठ्या संख्येने टीएमसी कार्यकर्ते मतदान केंद्रावर हजर आहेत.
पुणे जिल्ह्यातील बलसा खुर्द येथे मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. सकाळपासून एकही मतदान झालेले नाही. मतदान केंद्र ओस पडलेले आहे. गावातील अतिक्रमण विरोधात प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही काही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार टाकल्याचे समोर येत आहे.
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात सकाळी ९.०० वाजेपर्यंत सरासरी ७.४५ टक्के मतदान झाले आहे.
पहिल्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
वर्धा – ७.१८ टक्के
अकोला – ७.१७ टक्के
अमरावती -६.३४ टक्के
बुलढाणा – ६.६१ टक्के
हिंगोली – ७.२३ टक्के
नांदेड – ७.७३ टक्के
परभणी – ९.७२ टक्के
यवतमाळ – वाशिम – ७.२३ टक्के
महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या पत्नी अर्चना खेडेकर यांनी केले मतदान, विजय मिळणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी दाखवला.
नांदेड : अशोक चव्हाण हे त्यांच्या पत्नीसह मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत. त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात 39 मतदान केंद्रावर मतदानासाठी अडथळा येत आहे. 39 बॅलेट मशीन बदलल्या, तर 16 कंट्रोल युनिट बदलले. एकूण 39 हुन अधिक मतदान केंद्रावर पहिल्या दोन तासांमध्ये मतदानात अडथळा आला आहे.
महाराष्ट्रात सकाळी 9 वाजेपर्यंत 7.45 % झाले आहे. वर्ध्यात 7.18 %, अकोल्यात 7.17% तर अमरावतीमध्ये 6.34% मतदान झाले. परभणीमध्ये सर्वाधिक 9.72% टक्के मतदान झाले.
प्रसिद्ध क्रिकेटपटू राहुल द्रविड याने कर्नाटकमधील बंगळुरू येथे मतदानाचा हक्क बजावला.
#LokSabhaElections2024 | Rahul Dravid casts his vote in Karnataka’s Bengaluru and says, “Everyone must come out and vote. It is an opportunity we get in a democracy.” pic.twitter.com/VHPOMinNpb
— ANI (@ANI) April 26, 2024
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. पत्नीसह मतदान केंद्रावर जाऊन केले मतदान.
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार म्हणाले की, आम्ही गेल्या दोन वर्षांपासून निवडणुकीची तयारी करत आहोत. सर्व बूथवर व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. मतदारांसाठी पिण्याचे पाणी, पंखे यासह सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारांनी बाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
अकोला येथील भाजप आणि महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी मतदान केले. यंदा मतदानाची टक्केवारी वाढणार असल्याचा विश्वास अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला. पहिल्या टप्प्याच्या मतदान कमी झाले आहेत. पण त्याची भर आता निघणार आहे, असे त्यांनी म्हटले.
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील बीईएस मतदान केंद्रावर मतदान केले. दुसऱ्या टप्प्यात कर्नाटकातील 14 लोकसभा जागांवर मतदान होत आहे.
शिवसेना उमेदवार राजश्री पाटील मतदानाचा हक्का बजावला. यवतामाळ-वाशिममध्ये राजश्री पाटील यांचे पती हेमंत पाटील यांचे तिकीट कापून राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.
हिंगोली आज दुसऱ्या टप्प्यात लोकसभेच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी निवडणूक होत आहे. जुने सहकारी असलेले महाविकास आघाडीकडून नागेश पाटील आष्टीकर तर महायुतीकडून बाबुराव कदम कोहळीकर एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहे.
येणारं सरकार काही अरबपतींचे असणार की 140 कोटी भारतीयांचे याचा फैसला आज तुमचं मत करणार आहे. त्यामुळे संविधानाचे शिपाई बनून लोकशाहीच्या रक्षणासाठी मतदान करा. राहुल गांधी यांचे ट्विटरवरून मतदारांना आवाहन.
मेरे प्यारे देशवासियों!
देश की तकदीर का फैसला करने जा रहे इस ऐतिहासिक चुनाव का आज दूसरा चरण है।
आपका वोट तय करेगा कि अगली सरकार ‘चंद अरबपतियों’ की होगी या ‘140 करोड़ हिंदुस्तानियों’ की।
इसलिए हर नागरिक का कर्तव्य है कि वह आज घर से बाहर निकले और ‘संविधान का सिपाही’ बन कर…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 26, 2024
“लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात, आज मतदान होत असलेल्या, मतदारसंघामधील सर्वांना विक्रमी संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करतो. मतदानाचे प्रमाण वाढल्याने आपली लोकशाही बळकट होते. विशेषतः आपल्या युवा आणि महिला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे माझे आवाहन आहे. तुमचे मत म्हणजे तुमचा आवाज!” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मराठीतून ट्विट.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात, आज मतदान होत असलेल्या, मतदारसंघामधील सर्वांना विक्रमी संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करतो. मतदानाचे प्रमाण वाढल्याने आपली लोकशाही बळकट होते. विशेषतः आपल्या युवा आणि महिला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे माझे आवाहन आहे. तुमचे मत…
— Narendra Modi (@narendramodi) April 26, 2024
दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात. 12 राज्यांमधील 89 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान. दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी तब्बल 1206 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. दुसऱ्या टप्प्यातील मतदानात अनेक हायप्रोफाईल उमेदवार. राहुल गांधी, एनी राजा, शशी थरूर, नवनीत राणा, ओम बिर्ला ,हेमामालिनी, अरुण गोविल, प्रल्हाद जोशी यांची प्रतिष्ठा पणाला. महाराष्ट्रात 8 मतदारसंघांमध्ये आज मतदान. तर कर्नाटक राज्यात बेळगावसह 14 मतदारसंघांमध्ये आज मतदान.
बुलढाणा लोकसभेसाठी आज मतदान. महायुतीकडून प्रतापराव जाधव, महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर तर अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर रिंगणात. 1,962 मतदान केंद्रावर होणार मतदान. 17 लाख 82 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क.
वर्धा जिल्ह्यातील देवरी येथील यशवंत प्राथमिक शाळा येथील ईव्हीएम मशीन बंद असल्यामुळे सात वाजल्यापासून रांगेत असलेले मतदार संभ्रमात आहेत. तांत्रिक कारणामुळे मशीन बंद पडल्याचे दिसून येत आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे. हिंगोलीमध्ये ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर विरुद्ध शिंदे गटाचे बाबुराव कदम कोहळीकर यांच्यात मुख्य लढत आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघातील हदगावमध्ये सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झालीय. दोन्ही उमेदवार पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरलेत. पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने आलेत
विदर्भातील 6 आणि मराठवाड्यातील 2 जागांवर मतदान होत आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, आणि परभणी या महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे.
आज 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्याच मतदान होत आहे. मतदानाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात देशातील एकूण 13 राज्य आणि केंद्र शासित प्रदेश मिळून 89 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. महाराष्ट्रात आज एकूण 8 लोकसभा मतदारसंघात मतदान सुरु आहे.