Ayodhya Lok Sabha Result 2024: हे लज्जास्पद… अयोध्याकरांवर सोनू निगम भडकला… रामाच्या भूमीत भाजपचा पराभव

| Updated on: Jun 04, 2024 | 5:37 PM

Ayodhya Lok Sabha Result 2024: उत्तर प्रदेशात विद्यामान योगी आदित्यनाथ सरकारने चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी राज्यातील माफिया गिरी मोडून काढली. अयोध्येत भव्य राम मंदिर पूर्ण झाले. परंतु भाजपला स्वबळावर सत्तेपर्यंत जाण्यापासून उत्तर प्रदेशने रोखले आहे. 

Ayodhya Lok Sabha Result 2024: हे लज्जास्पद... अयोध्याकरांवर सोनू निगम भडकला... रामाच्या भूमीत भाजपचा पराभव
sonu nigam
Follow us on

Ayodhya Chunav Result 2024: भारतीय जनता पक्षासाठी लोकसभा निवडणुकीचा निकाल धक्कादायक राहिला. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या आलेल्या वादळात भाजपची विकास कामे उडली. ज्या अयोध्याच्या काही महिन्यांपूर्वी जगभर गवगवा झाला, अयोध्यामधील विकासाचे कौतूक झाले, भव्य श्रीराम मंदिर उभारले गेले, त्याच ठिकाणी भाजपचा पराभव झाला. फैजाबाद लोकसभा मतदार संघात समाजवादी पक्षाचा विजय झाला. रामाच्या भूमीत रामाच्या नावामुळे वाढलेल्या भाजपचा पराभव झाला. फैजाबाद भाजपचे अनेक वर्ष खासदार असलेले लल्लू सिंह पराभूत यांचा पराभव झाला. त्या ठिकाणी समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद यांचा विजय झाला. त्यानंतर प्रसिद्ध गायक सोनू निगम चांगलेच भडकले. हे लज्जास्पद… या शब्दांत सोनू निगम यांने आपल्या भावाना व्यक्त केल्या.

काय म्हणाले सोनू निगम

सोने निगम यांनी अयोध्यातील जनतेला चांगलेच फटकारले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ज्या सरकारने संपूर्ण अयोध्याला बदलून दिले. विकासाची गंगा त्या ठिकाणी आणली. अयोध्येला चमकवले. नवीन विमानतळ दिले. जागतिक दर्जाचे रेल्वे स्टेशन दिले. इकोनॉमी झोन बनवले. त्या ठिकाणी भाजपचा उमेदवाराचा पराभव झाला. हे लज्जास्पद आहे अयोध्यावासियो…

भाजपचे सात मंत्री पराभवाच्या छायेत

उत्तर प्रदेशात भाजप केवळ ३४ जागांवर विजयी होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात निवडणूक लढवणारे भाजपचे सात मंत्रीही पराभवाच्या छायेत आहे. भाजप वरिष्ठ नेत्या स्मृती इराणी यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते किशोरी लाल यांनी त्यांचा एक लाख मतांनी पराभव केला. भाजपचे मंत्री संजीव बालियान, साध्वी निरंजन ज्योती, कौशल किशोर, अजय मिश्र टेनी, अनुप्रिया पटेल आणि महेंद्रनाथ पिछाडीवर आहेत.

हे सुद्धा वाचा

उत्तर प्रदेशात विद्यामान योगी आदित्यनाथ सरकारने चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी राज्यातील माफिया गिरी मोडून काढली. अयोध्येत भव्य राम मंदिर पूर्ण झाले. परंतु भाजपला स्वबळावर सत्तेपर्यंत जाण्यापासून उत्तर प्रदेशने रोखले आहे.