सर्वात मोठी बातमी… दणदणीत आणि खणखणीत, भाजपने गाठले बहुमत; कल काय सांगतात?

| Updated on: Jun 04, 2024 | 8:58 AM

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतमोजणीचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. या कलानुसार भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजप आतापर्यंत 311 जागांवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडी 157 जागांवर आघाडीवर आहे.

सर्वात मोठी बातमी... दणदणीत आणि खणखणीत, भाजपने गाठले बहुमत; कल काय सांगतात?
narendra modi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणी सुरू होऊन एक तास होत आला आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपच्या नेतृत्वातील एनडीएने बहुमताचा आकडा गाठला आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीनेही मोठी झेप घेतली आहे. इंडिया आघाडीने जवळपास 140 जागांवर आघाडी घेतली आहे. अर्थात हे सुरुवातीचे कल आहेत. अजून बऱ्याच फेऱ्या व्हायच्या आहेत. दुपारपर्यंत हे कल बदलतील. दुपारी 4 नंतर कुणाला किती जागा मिळणार हे स्पष्ट होणार आहे.

सुरुवातीच्या कलानुसार एनडीएने 311 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने 157जागांवर आघाडी घेतली आहे. इतरांनी 17 जागांवर आघाडी घेतली आहे. अद्याप कोणतीही जागा विजयी घोषित झालेली नाही. हे निकालाचे कल आहेत. त्यात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या मतमोजणीची पहिलीच फेरी सुरू आहे. साधारणपणे मतमोजणीच्या 20 ते 26 फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे या फेऱ्यांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

या राज्यात भाजप आघाडीवर

कर्नाटकात भाजप 21 जागांवर आघाडीवर आहे. तर दिल्लीत सहा जागांवर आघाडीवर आहे. गुजरातमध्ये भाजप 23 जागांवर आघाडीवर आहे. हरियाणआत भाजपला 4 जागा मिळताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशात भाजप 60 जागांवर आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप 25 जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्ये भाजप तीन जागांवर आघाडीवर आहे. तर दिल्लीत सहा जागांवर आघाडीवर आहे.

कोण मागे? कोण पुढे?

बीडमध्ये पंकजा मुंडे पिछाडीवर पडल्या आहेत. तर शिरूरमधून अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. बारामतीमधून सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. तर कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज हे आघाडीवर आहेत. नागपूरमध्ये नितीन गडकरी हे आघाडीवर आहेत. राजकोटमधून भाजपचे उमेदवार पुरुषोत्तम रुपाला आघाडीवर आहेत. सिंधुदुर्गातून केंद्रीय मंत्री नारायण राणे आघाडीवर आहेत. तिरुवनं तपुरमधून शशी थरूर पिछाडीवर आहे. तर बीजेपीचे राजीव चंद्रशेखर हे 23 मतांनी आघाडीवर आहेत. रायबरेलीतून राहुल गांधी आघाडीवर आहेत. दिंडोरीतून भाजपच्या भारती पवार आघाडीवर आहेत. गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून अमित शाह हे आघाडीवर आहेत.