Mandi Loksabha Election Final Result 2024: मंडीमधून कंगना राणौतचा विजय

| Updated on: Jun 04, 2024 | 3:13 PM

Mandi Loksabha Election Final Result 2024: हिमाचल प्रदेशमधील मंडी या लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचं विशेष लक्ष लागून होतं. कारण यावेळी अभिनेत्री कंगना राणौत निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. तिच्याविरोधात काँग्रेसकडून विक्रमादित्य सिंह यांनी निवडणूक लढवली. यात कंगनाचा विजय झाला.

Mandi Loksabha Election Final Result 2024: मंडीमधून कंगना राणौतचा विजय
Kangana Ranaut vs Vikramaditya Singh
Image Credit source: Instagram
Follow us on

हिमाचल प्रदेशच्या चार लोकसभा जागांपैकी मंडी (Mandi Lok Sabha Constituency) लोकसभा मतदारसंघ अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut BJP Candidate) उतरली आहे. तिच्या विरोधात काँग्रेसकडून विक्रमादित्य सिंह (Vikramaditya Singh Congress Candidate) यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत कंगनाचा दमदार विजय झाला असून ती मंडीमधून खासदान बनली आहे. विजयानंतर कंगनाने देवीचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर तिच्या आईने दही-साखर भरवून कंगनाचं तोंड गोड केलं.

छोटी काशी म्हणून ओळखलं जाणार मंडी हे आधी मांडव्य या नावाने प्रसिद्ध होतं. सुमारे 10 लाख लोकसंख्येचा हा जिल्हा व्यापार आणि वाणिज्यच्या सर्वांत व्यस्त केंद्रांपैकी एक आहे. इथली सर्वांत मोठी अर्थव्यवस्था ही शेती आहे. मंडी जिल्ह्यातील सुमारे 80 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. इथे तांदूळ, कडधान्य, बाजरी, चहा, तीळ, शेंगदाणे, सूर्यफुलाचं तेल आणि वनौषधींचं उत्पादन केलं होतं. मंडी जिल्ह्यातील खालच्या डोंगराळ भागात शेतकरी रेशीम पिकवतात. मंडीतील शेतकरीच बाजारात सर्वांत कमी किंमतीत कच्ची रेशीम उपलब्ध करून देतात. याठिकाणी सफरचंदाचंही सर्वाधिक उत्पादन होतं. याशिवाय इथली लोकं पर्यटनावरही अवलंबून आहेत.

मंडी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. 2014 पर्यंत झालेल्या 15 निवडणुकांपैकी काँग्रेसच्या उमेदवारांनी 10 वेळा या जागेवर विजय मिळवला आहे. या मतदारसंघात 17 विधानसभेच्या जागा आहेत. यामध्ये भरमौर, लाहौल आणि स्पीती, मनाली, कुल्लू, बंजार, अनी, कारसोग, सुंदरनगर, नाचन, सिराज, दरांग, जोगिंदरनगर, मंडी, बाल्ह, सरकाघाट, रामपूर आणि किन्नौर यांचा समावेश आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या 2014 च्या अहवालानुसार या लोकसभा मतदारसंघात 11.50 लाख मतदार आहेत.

हे सुद्धा वाचा

2019 चा निकाल

2019 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे राम स्वरुप शर्मा जिंकून आले होते. त्यांना 647,189 मतं मिळाली होती. तर काँग्रेसचे आश्रय शर्मा 2,41,730 मतांसह दुसऱ्या स्थानी आणि सीपीआय(एम)चे दिलीप सिंग कायथ हे 14,838 मतांसह तिसऱ्या स्थानावर होते.

2014 चा निकाल

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या राम स्वरुप शर्मा यांनी काँग्रेसच्या प्रतिभा सिंह यांचा 39 हजार मतांनी पराभव केला होता. रामस्वरुप शर्मा यांना 3.62 लाख आणि प्रतिभा सिंह यांना 3.22 लाख मतं मिळाली होती. माकपचे कुशल भारद्वाज तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना सुमारे 14 हजार मतं मिळाली होती.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर