वडिलांचा वारसा चालवणारी कणखर लेक, पहिल्याच निवडणुकीत भाजपला दाखवला कात्रजचा घाट, कोण आहेत वर्षा गायकवाड?

| Updated on: Jun 05, 2024 | 11:22 AM

Lok Sabha Elections 2024 | घरातूनच मिळालेलं राजकारणाचं बाळकडू, वकील उज्ज्वल निकम यांच्यावर मत करणाऱ्या वर्षा गायकवाड कोण आहेत? . वर्षा गायकाड यांना 351756 मते मिळाली आहेत.... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त वर्षा गायकवाड यांच्या विडयाची चर्चा...

वडिलांचा वारसा चालवणारी कणखर लेक, पहिल्याच निवडणुकीत भाजपला दाखवला कात्रजचा घाट, कोण आहेत वर्षा गायकवाड?
वर्षा गायकवाड
Follow us on

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निडणूक 2024 चे निकाल समोर आले आहेत. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्यात लढत होती. वर्षा गायकाड यांना 351756 मते मिळाली आहेत. वर्षा गायकवाड यांनी भाजपचे उमेदवार उज्वल निकम यांचा पराभव करत संसदेत जाण्याचा स्वतःचा मार्ग मोकळा केला आहे. तर जाणून घेऊ वर्षा गायकवाड यांच्याबद्दल, कोण आहेत वर्षा गायकवाड?

वर्षा गायकवाड यांचे आई – वडील

वर्षा गायकवाड या काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत. त्यांच्या आईचं नाव ललिता गायकवाड असं आहे. 3 फेब्रुवारी 1975 रोजी त्यांचा जन्म झाला आहे. वडील एकनाथ गायकवाड माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे वर्षा यांना राजकारणाचं बाळकडू घरातूनच मिळालेलं आहे. राजकारणात येण्यासाठी त्यांना फारसा संघर्ष कारावा लागला नाही. मात्र, धारावीतून पहिल्यांदा निवडून आल्यानंतर मतदारसंघ टिकून ठेवण्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत करावी लागली आहे.

मतदारसंघात विकासाची कामे करतानाच लोकसंपर्क सातत्याने ठेवून त्यांनी मतदारसंघावरील पकड मजबूत केली आहे. त्यामुळेच त्या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून येऊ शकल्या आहेत. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्रीपद देण्यात आलं. शिक्षण मंत्री होणाऱ्या त्या राज्यातील पहिल्याच महिला ठरल्या.

सागायचं झालं तर, कोरोनाचं संकट निर्माण झाल्यानंतर मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. पण योग्य वेळी योग्य निर्णय घेत वर्षा गायकवाड यांनी ते शिवधनुष्य लिलया पेललं. त्यामुळे देखील वर्षा गायकवाड यांचं सर्वच स्तरातून कौतुक झालं.

स्वयंसेवी संस्थेत काम

वर्षा गायकवाड यांनी गणित या विषयात पदवी घेतली आहे. राजकारणात येण्यापूर्वी पाच वर्ष त्यांनी प्राध्यापिका म्हणून काम केलं. बालपणापासूनच घरातून राजकारण आणि समाजकारणाचं बाळकडू मिळाल्याने त्यांनी प्रथम आणि स्नेहा या स्वयंसेवी संस्थेत काम करून समाजकारणाला सुरुवात केली. 2015 मध्ये वर्षा गायकाड यांना यूएनडीपीने संयुक्त राष्ट्र राष्ट्र संमेलनात पाचारण करण्यात आलं होतं. एसजीबीटीआय समुदायाच्या प्रश्नावर ही परिषद आयोजित करण्यात आली होती.

विजय आणि मंत्रिपदे

आता वर्षा गायकवाड उत्तर मध्य मुंबईच्या खासदार झाल्या आहे. 2004 मध्ये त्यांनी राजकारणात पाऊल टाकलं. त्यांनी 2004ची विधानसभा निवडणूक लढवली. धारावीतूनच त्यांनी निवडणूक लढवली. कारण धारावी हा काँग्रेसचा आणि त्यांचे वडील एकनाथ गायकवाड यांचा बालेकिल्ला होता.

पहिल्याच निवडणुकीत त्यांना यश आलं. त्यानंतर 2009मध्ये त्या पुन्हा निवडून आल्या आणि थेट राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री झाल्या. 2010 ते 2014 या काळात त्यांनी महिला आणि बालकल्याण मंत्री म्हणूनही काम पाहिलं. त्यांनी हिंगोलीच्या पालकमंत्री म्हणूनही काम केलं आहे. तसेच मुंबई काँग्रेसच्या उपाध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.

प्रेम विवाह

वर्षा गायकवाड यांचा प्रेमविवाह झालेला आहे. त्यांच्या पतीचं नाव राजू गोडसे असं आहे. राजू गोडसे यांनी आयसीडब्ल्यूएमधून एमबीएची पदवी घेतली आहे. . त्यांनी काही काळ बहुराष्ट्रीय कंपन्या आणि खासगी बँकांमध्ये नोकरी केली.