लोकसभा निवडणुकीचा विजय समोर आला आहे. अमेठी येथून भापजच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या स्मृती ईराणी दणकून आपटल्या आहेत. ज्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. अमेठी लोकसभा मतदारसंघात स्मृती ईराणी यांनी 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी अपयशाचा सामना करावा लागला आहे. भारताच्या राजकारणात अमेठी (Amethi Election Result 2024 ) भागाला देखील महत्त्वाचं स्थान आहे. अमेठी हे उत्तर प्रदेशातील प्रमुख शहर आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे.
1 जुलै 2010 रोजी बसपा सरकारने अधिकृतपणे अमेठी मतदारसंघ अस्तित्वात आणलं. सुरुवातीला याचे नाव छत्रपती साहुजी महाराज नगर होते, नंतर नाव बदलून अमेठी करण्यात आलं. अमेठी मतदार संघ भारतातील गांधी कुटुंबाची कर्मभूमी आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, त्यांचे नातू संजय गांधी, राजीव गांधी आणि त्यांच्या पत्नी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे.
या मतदार संघात पहिली निवडणूक 1967 मध्ये झाली होती. ज्यामध्ये काँग्रेसच्या विद्या धर बाजपेयी या पहिल्या खासदार झाल्या. 1971 ते 1977 च्या निवडणुकीत जनता पक्षाचे रवींद्र प्रताप सिंह खासदार झाले. 1980 मध्ये संजय गांधी यांचा विजय झाला होता. पण विमान अपघातात संजय गांधी यांचं निधन झालं आणि 1981 मध्ये पुन्हा निवडणूक झाली, तेव्हा राजीव गांधी यांचा विजय झालं.
माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, त्यांचे नातू संजय गांधी, राजीव गांधी आणि त्यांच्या पत्नी सोनिया गांधी यांनी या प्रदेशाचे प्रतिनिधित्व केलं आहे. 2014 च्या निवडणुकीत राहुल गांधी येथून खासदार म्हणून निवडून आले होते परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या स्मृती ईराणी (Smriti Irani) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा पराभव केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, 2011 मध्ये झालेल्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार अमेठीमध्ये 72.16 टक्के जनता शिक्षित आहे. ज्यामध्ये 83.85 टक्के पुरुष आणि 60.64 टक्के महिला आहेत. आता अमेठीमध्ये कोणाची सत्ता येणार पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
2019 मध्ये भाजपच्या स्मृती ईराणी यांचा 4,68,514 मतांनी विजय झाला होता. तर काँग्रेसच्या राहुल गांधी यांना 4,13,394 लोकांनी मत दिलं होतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3,940 लोकांनी नोटाला मत दिलं होतं.
अमेठीमध्ये 2014 च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती ईराणी यांचा पराभव झाला होता. तेव्हाकाँग्रेसच्या राहुल गांधी यांचा 4,08,651 मतांनी विजय झाला होता. तर भाजपच्या स्मृती ईराणी यांना 3,00,748 लोकांनी मत दिलं होतं.
लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स