लोकसभा निवडणुकीचे देशातील सात टप्पे पूर्ण झाले. त्यानंतर १ जून रोजी एग्झिट पोलचे निकाल आले. एग्झिट पोलनुसार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे. परंतु निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी येणार आहे. या निवडणूक निकालाची तयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे. ४ जून रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निकालाचे प्रत्येक अपडेट ‘टीव्ही ९ मराठी’ आणि https://www.tv9marathi.com/ या वेबसाईटवर पाहता येणार आहे. महाराष्ट्रातील ४८ मतदार संघातील निकालाचे क्षणक्षणाचे अपडेट ‘टीव्ही ९ मराठी’ नेटवर्ककडून देण्यात येणार आहे. तसेच निवडणूक आयोगाची वेबसाईट https://elections24.eci.gov.in/ या ठिकाणी निकाल पाहता येणार आहे.
देशात सात टप्प्यात तर राज्यात पाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया झाली. १९ एप्रिल रोजी निवडणुकीचा पहिला टप्पा झाला. त्यानंतर २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे या पाच टप्प्यात महाराष्ट्रातील ४८ मतदार संघात मतदान झाले. त्यानंतर सहावा टप्पा २५ मे रोजी तर शेवटचा टप्पा १ जून रोजी झाला. देशात इंडिया आघाडी आणि एनडीए यामध्येच प्रमुख लढत होती. एनडीएचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले तर इंडिया आघाडीची बाजू राहुल गांधी यांनी सांभाळली.
चार जून रोजी लोकसभा निवडणुकांसोबत आंध्र प्रदेश आणि ओडिसा विधानसभेची मतमोजणी होणार आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश विधानसभेची मतमोजणी २ जून रोजी होत आहे.
देशातील सर्वच एग्झिटपोलनुसार पुन्हा एनडीएकडे सत्तेची सूत्र जात आहे. सलग दहा वर्षे सत्तेत राहून देशात भाजप विरोधी वातावरण झालेले नाही. विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीचा प्रभाव पडलेला दिसून येत नाही. सर्वच संस्थांनी ३५० पेक्षा जास्त जागा एनडीएला मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीला १२५ ते १५० पर्यंत जागा मिळण्याचा अंदाज आहे.
tv9 मराठी लोकसभा निवडणूक लाईव्ह टीव्हीसाठी येथे क्लिक करा.
tv9 मराठी लोकसभा निवडणूक YouTube साठी येथे क्लिक करा.
लोकसभा निवडणूक निकालाचे प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.