लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत मतदान सुरु आहे. देशात आज पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. मुंबईत लोकसभेच्या सहाजागांसाठी मतदान सुरु आहे. देशात एकूण 49 मतदारसंघात मतदान होत आहे. महाराष्ट्रात हे अखेरच्या टप्प्याच मतदान आहे. आजच्या मतदानानंतर महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात मतदान पूर्ण होईल. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते सकाळपासून मतदानाचा हक्क बजावत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. शिवाजी पार्क येथील बालमोहन शाळेत राज ठाकरे यांचं मतदान केंद्र आहे. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला राज ठाकरेंनी खास आपल्या शैलीत उत्तर दिली.
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी म्हणावे तितके मुंबईकर उतरलेले नाहीत. अनेक मुंबईकर बाहेर गेलेत, या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, “उन्हाळ्याचे दिवस आहेत. सुरुवात आहे. 10.30 पावणे अकरा झालेत. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बघू किती मतदान होतं. मुंबईकर जास्तीत जास्त बाहेर पडून मतदान करतील ही अपेक्षा आहे” मतदान केंद्रावर काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते गोंधळ घालतायत या प्रश्नावर ‘मला त्याची कल्पना नाही’ असं उत्तर दिली.
महिला मतदार टर्निंग पॉइंट ठरतील का?
मुंबईकरांना काय आवाहन कराल? “तेच ते आपलं घीसापीटा वाक्य, मतदानाचा हक्क बजावा. तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात मतदान करतील. ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालाय, असा तरुण वर्ग मतदानाला येईल. काहींच्या आशा संपल्या आहेत, त्यांच्याकडून मतदानाची अपेक्षाच करु नका” महिला मतदार टर्निंग पॉइंट ठरतील का? तुम्हाला काय वाटतं? ‘मी काही ज्योतिषी, भविष्यवेत्ता नाही असं खास ठाकरी शैलीतल उत्तर दिलं’