North central mumbai lok sabha Election Final Result 2024 : मुंबईत धक्कादायक निकाल, उज्वल निकम पराभूत

| Updated on: Jun 04, 2024 | 5:00 PM

Mumbai north central Election Result 2024 News in Marathi : उत्तर मध्य मुंबईत भाजपा विरुद्ध काँग्रेस असा सामना आहे. भाजपाने उज्वल निकम यांना तिकीट दिलय तर काँग्रेसकडून वर्षा गायकवाड रिंगणात आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात आज बाजी कोण मारणार? याची उत्सुक्ता आहे.

North central mumbai lok sabha Election Final Result 2024 : मुंबईत धक्कादायक निकाल, उज्वल निकम पराभूत
ujwal nikam vs varsha gaikwad
Follow us on

उत्तर मध्य मुंबईत प्रसिद्ध वकिल उज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यात सामना आहे. भाजपाने या मतदारसंघातून पूनम महाजन यांचा पत्ता कापला व त्यांच्याजागी उज्वल निकम यांना उमेदवारी दिली. भाजपाने अखेरच्या क्षणी उज्वल निकम यांना उमेदवार बनवलं. महाविकास आघाडीत काँग्रेसकडे हा मतदारसंघ आला. काँग्रेसने इथून धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. मागच्या दोन टर्मपासून उत्तर मध्य मुंबईच्या मतदारांनी पूनम महाजन यांना साथ दिली होती. यावेळी उत्तर मध्य मुंबईत 51.98 टक्के मतदान झालं. 2019 मध्ये इथे 53 टक्के मतदान झालं होतं.

उत्तर मध्य मुंबईतून भाजपाचे उज्वल निकम हे पराभूत झाले आहेत. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाल्या आहेत. सुरुवातीला उज्वल निकम यांच्याकडे मोठी आघाडी होती. 

उत्तर मध्य मुंबईत वांद्रे पूर्वेचा मध्यमवर्गीय झोपडपट्टीधारक मतदार आहे. त्याचवेळी वांद्रे पश्चिमेचा हाय प्रोफाइल मतदार सुद्धा आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या भागात राहतात. 17 लाखापेक्षा जास्त मतदार या मतदारसंघात आहेत. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात मराठी मतदारांबरोबरच दलित आणि उत्तर भारतीय मतदार मोठ्या संख्येने आहेत. मुस्लिम मतदारांचही प्राबल्य आहे. उत्तर भारतीय मतदार कोणाच्या बाजूने जाणार? त्यावरही जय-पराजयाच गणित ठरणार आहे.

उमेदवाराचे नावआघाडी-पिछाडीनिकाल
वर्षा गायकवाड (काँग्रेस)- विजयी
उज्वल निकम (भाजपा)-पराभूत

सहा विधानसभा मतदारसंघात

विलेपार्ले, चांदीवली, कुर्ला, कलिना, वांद्र पूर्व आणि वांद्रे पश्चिम हे सहा विधानसभा मतदारसंघ उत्तर मध्य मुंबईत येतात. त्यात विलेपार्ल्यातून भाजपाचे पराग अळवणी, चांदीवलीतून शिवसेना शिंदे गटाचे दिलीप लांडे, कुर्ल्यातून शिवसेना शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर, कलिन्यामधून ठाकरे गटाचे संजय पोतनीस, वांद्रे पूर्वमधून झिशान सिद्दीकी आणि वांद्रे पश्चिममधून भाजपाचे आशिष शेलार आमदार आहेत. म्हणजे भाजपा-शिवसेनेचे प्रत्येकी दोन तर ठाकरे गट आणि काँग्रेसचा एक आमदार आहे. पक्षीय स्थिती लक्षात घेता महायुती बळकट दिसत आहे.