ईशान्य मुंबईत संजय दीना पाटील आणि मिहिर कोटेचा यांच्यात लढत आहे. ठाकरे गटाचे संजय दीना पाटील मविआचे उमेदवार आहेत. भाजपाचे मिहिर कोटेचा महायुतीचे उमेदवार आहेत. मुलुंड, विक्रोळी, भांडूप पश्चिम, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व आणि मानखुर्द शिवाजी नगर हे सहा विधानसभ मतदारसंघ या लोकसभा क्षेत्रात येतात. ईशान मुंबई हा संमिश्र लोकवस्तीचा मतदारसंघ आहे. मराठी मतदारांप्रमाणे उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. घाटकोपर, मुलुंडमध्ये गुजराती भाषिक मतदार जास्त आहेत.
उत्तर पूर्व मुंबई म्हणजे ईशान्य मुंबईतून ठाकरे गटाचे संजय दीना पाटील हे 18 हजार मतांनी आघाडीवर आहेत. भाजपाचे मिहिर कोटेचा पिछाडीवर आहेत.
विक्रोळी, भांडूप पश्चिम हे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार असलेल्या मतदारसंघात मराठी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. मानखुर्द-शिवाजी नगर झोपडपट्टीचा भाग असून इथे मराठी, उत्तर भारतीय आणि अल्पसंख्याक मतदारांची संख्या जास्त आहे. यात अल्पसंख्यांक आणि मराठी मतदारांची मत कुठल्याही उमेदवाराच्या विजयात निर्णायक ठरणार आहेत. 2014 आणि 2019 अशा दोन टर्म इथून भाजपाचा खासदार होता. 2014 मध्ये किरीट सोमय्या आणि 2019 मध्ये मनोज कोटक ईशान्य मुंबईतून खासदार झाले.
उमेदवाराचे नाव | आघाडी-पिछाडी | विजेता |
---|---|---|
संजय दीना पाटील (ठाकरे गट) | आघाडी | |
मिहिर कोटेचा (भाजपा) | पिछाडी |
….म्हणून भाजपाची स्थिती बळकट
मुलुंड विधानसभा मतदारसंघातून मिहीर कोटेचा आमदार आहेत. विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे सुनील राऊत आमदार आहेत. भांडूप पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे रमेश कोरगावकर आमदार आहेत. घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे राम कदम, घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे पराग शहा आणि मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे अबू आझमी आमदार आहेत. पक्षीय बलाबल पाहत तीन भाजपाचे आमदार आहेत. एक शिंदे गटाचा आमदार आहे. त्यामुळे भाजपाची स्थिती बळकट आहे.