मुंबई उत्तर पश्चिम म्हणजे वायव्य मुंबईच्या निकालाकडे सगळ्यांच लक्ष आहे. मुंबईत उत्तर पश्चिममध्ये सुद्धा सेना विरुद्ध सेना असाच सामना आहे. उत्तर पश्चि मुंबईतून शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र वायकर मैदानात आहेत. त्यांच्यासमोर ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांचं आव्हान आहे. दोन्ही उमेदवार नवीन असून पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. सध्या उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकर यांचे वडील गजनान किर्तीकर खासदार आहेत. पण गजानान किर्तीकर शिवसेना शिंदे गटात आहेत. अमोल किर्तीकर ठाकरे गटासोबतच राहीले. त्यांना ठाकरेंनी तिकीट दिलं. रवींद्र वायकर मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. त्यानंतर ते आमदार झाले. त्यांच्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. त्या तुलनेत अमोल किर्तीकर नवीन आहेत.
उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकर 4 हजार 755 मतांनी आघाडीवर, रवींद्र वायकर पिछाडीवर.
रवींद्र वायकर आणि अमोल किर्तीकर या दोघांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला होता. रवींद्र वायकर यांनी लोकसभा निवडणूक निकालाच्या काही दिवस आधी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. अमोल किर्तीकर यांच्यावर कोविड काळात खिचडी घोटाळ्याचे आरोप झालेत. दोघेही ईडीच्या रडारवर आहेत. त्यामुळे उत्तर पश्चिम मुंबईचा हा मतदारसंघ सुरुवातीपासून चर्चेत आहे. या मतदारसंघात 54.84 टक्के मतदान झालय. 9 लाख 51 हजार 580 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
उमेदवाराचे नाव | आघाडी-पिछाडी | निकाल |
---|---|---|
अमोल किर्तीकर (ठाकरे गट) | आघाडी | |
रवींद्र वायकर (शिवसेना शिंद गट) | पिछाडी |
रवींद्र वायकर यांची विजयासाठी सर्व मदार भाजपावर
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात जोगेश्वरी पूर्वमधून रविंद्र वायकर शिवसेना (शिंदे गट), दिंडोशी सुनील प्रभू (ठाकरे गट), गोरेगाव विद्या ठाकूर (भाजप), वर्सोवा भारती लव्हेकर (भाजप), अंधेरी पश्चिम अमित साटम (भाजप), अंधेरी पूर्व ऋतुजा लटके (ठाकरे गट) आमदार आहेत. तीन भाजपाचे आमदार आहेत. त्यामुळे रवींद्र वायकर यांची विजयासाठी सर्व मदार भाजपावर आहे.