लोकसभा निवडणूक 2024 च्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात येत आहेत. नाशिक आणि कल्याण येथे जनसभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत रोड शो होणार आहे. राज्यात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार जोरात सुरु आहे. येत्या 20 मे रोजी मुंबईसह ठाणे आणि महाराष्ट्रातील अन्य मतदारसंघात मतदान होणार आहे. दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा पार्श्वभूमीवर शेतकरी संघटेनच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस देत त्रास दिला जातोय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप यांचे आरोप. “शेतकऱ्यांना सभेला जाऊ देत नसेल तर मग सभा कशाला?. मोदी पाकिस्तान आणि चीनला घाबरत नाहीत, मग मग शेतकऱ्यांची भीती का?शेतकऱ्यांना विनाकारण पोलिसांकडून त्रास दिला जातोय” असा आरोप संदीप जगताप यांनी केला.
कर्नाटकच्या चिकोडीमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. एकमेकाला धक्काबुक्की आणि चप्पलने मारहाण. कोण उमेदवार निवडून येणार यावर दोन्ही पक्षाच्या समर्थकांमध्ये आधी चर्चा नंतर शाब्दिक वाद आणि मग सुरू झाली हाणामारी. भर रस्त्यात घडला प्रकार, ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
निवडणूकीत भाजप आधीचे सर्व रेकॉर्ड तोडेल. जनता भाजपाला भरभरून मते देईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी घाटकोपर येथील रोड शोमध्ये टीव्ही नाईन प्रतिनिधीशी बोलताना केला.
नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी पाठीत वार केला आहे. महाराष्ट्र पाठीत वार केल्यावर वाघ नखं बाहेर काढल्याशिवाय राहत नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांचे नाशिक सभेत भाजपावर हल्लाबोल केला.
अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या पतींनी इलेक्ट्रोल बॉंड घोटाळा जगातला सर्वात मोठा घोटाळा असल्याचे म्हटले आहे. तुम्ही खा..खा खायचे. आणि कोरोनाकाळात आम्ही जनतेला वाचविले, मला एक क्रमांकाचा मुख्यमंत्री केले. आमच्यावर खिचडी घोटाळ्याचा आरोप करता अशा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी नाशिक सभेत केला.
मोदींनी आपली वंशावळ दाखवावी, मी माझी वंशावळ दाखवितो. माझ्या आजोबांनी काय काम केले ते पाहूयात आणि मोदींच्या वंशजांनी काय सामाजिक काम केले ते पाहूयात असे आव्हान शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना नाशिक येथील सभेत दिला.
मोदींच्या रोड शोला मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद बघायला मिळत आहे. हजारो मुंबईकर मोदींना पाहण्यासाठी आले आहेत.
नरेंद्र मोदींचा रोड शो सर्वोदय नगरपासून पुढे सरकला आहे. मोदींच्या स्वागतासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड-शो श्रेयस टॉकीजपासून पुढे सरकला आहे. मुंबईकरांनी रस्त्यावर प्रचंड गर्दी केली आहे.
कोळी बांधवांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यात आलंय. कोळी नृत्याच्या माध्यमातून मोदींचं स्वागत करण्यात आलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शोला सुरुवात झाली आहे. अशोक सिल्क मिल परिसराहून मोदींचा रोड-शो पुढे सरकत आहे. मोदींच्या रोड-शोला रस्सत्याच्या दुर्तफा मोठी गर्दी जमलेली आहे. मोदींकडून सर्व नागरिकांना हात जोडून नमस्कार केला जातोय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशोक मिल्क मिल परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं.
नरेंद्र मोदी अशोक सिल्क मिल परिसरात पोहोचले आहेत. इथून मोदींच्या रोड-शोला सुरुवात होणार आहे. मोदींच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा एलबीएस मार्गावर पोहोचला आहे. पुढच्या पाच ते सात मिनिटात ते अशोक सिल्क मिल परिसरात पोहचतील. नरेंद्र मोदी यांचं हेलिकॉप्टर गोदरेज मैदानावर उतरलं आणि नंतर ते अशोक मिलच्या दिशेला रवाना झाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ओडिशातील गंजम येथे एका सभेला संबोधित करताना सांगितले की, काँग्रेस 70 वर्षांपासून राम मंदिर रोखत आहे. ते म्हणाले की, रामाचा उत्सव थांबवणाऱ्या नवीन बाबूंना ओडिशातील जनता कधीच माफ करणार नाही. पंतप्रधान मोदींनी नक्षलवाद आणि दहशतवाद संपवण्याचे काम केले आहे, असेही अमित शाह म्हणाले.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरा श्री कृष्ण जन्मभूमी आणि शाही इदगाह मशीद वादाशी संबंधित याचिकांवर सुनावणी पूर्ण केली आहे. गुरुवारी 16 मे रोजीही या प्रकरणाची सुनावणी सुरू राहणार आहे. न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांच्या एकल खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. उद्याच्या सुनावणीत हिंदू बाजूने उर्वरित युक्तिवाद सादर केला जाणार आहे.
नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA लागू केल्यानंतर प्रथमच केंद्र सरकारने 300 निर्वासितांना भारतीय नागरिकत्व दिले आहे. हे शेजारील देशांतील गैर-मुस्लिम निर्वासित आहेत जे अनेक वर्षांपासून भारतात राहत होते आणि येथील नागरिकत्व मिळविण्यासाठी धडपडत होते.
पीएम मोदी आता दिल्लीत निवडणूक प्रचाराची सुरुवात करणार आहेत. पहिली जाहीर सभा 18 मे रोजी ईशान्य दिल्लीत होणार आहे. तिसऱ्या पुलासमोर यमुना खादरमध्ये पंतप्रधान मोदींची जाहीर सभा आयोजित केली जाणार आहे. त्यात चांदणी चौक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार व नेतेही सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याणमधील जाहीर सभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसने फक्त गरीबी हटावचा नारा दिला. काँग्रेसने हिंदू-मुस्लिम असं धर्माचं राजकारण केलं. तसेच धर्माच्या आधारावर बजेट, असं करत काँग्रेस पाप करत आहे, असंही मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाआधी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मोदी सध्या कल्याणमध्ये जाहीर सभेला संबोधित करत आहेत. मोदींनी आपल्या भाषणाला मराठीत सुरुवात केली. तसेच तुमचा आशिर्वाद घेण्यासाठी येथे आल्याचं म्हटलं. तसेच तुमची स्वप्न पूर्ण करणं हा माझा संकल्प असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.
उद्धव ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या सभेचे आज नाशिकमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे संध्याकाळी सभा पार पडणार आहे.
महाराष्ट्रात होणाऱ्या पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मोदींचा मुंबईतील घाटकोपरमध्ये रोड शो होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी ठीक ठिकाणी 50 पेक्षा अधिक ढोल ताशा पथक असणार आहे. तसेच एल बी एस रोडवर ठिकठिकाणी स्वागत होणार आहे. तसेच ठीक ठिकाणी कोळी बांधवांचे नृत्य;वारकरी संप्रदाय,पारंपरिक वेशभूषेत सादरीकरण करण्यात येणार आहे.
महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जाहीर सभा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज संध्याकाळी घाटकोपर इथल्या एलबीएस रोडवर होणार रोड शो. संपूर्ण घाटकोपर आज भगवंमय झालं आहे, साधू संत महात्मे रोडवर ऊतरले आहेत. तर काही वारकरी देखील मोदींचे स्वागत करण्यासाठी आले आहेत. या लोकांनी कैलास पर्वत हे मोदीच भारतात परत आणू शकतात अशी भावना व्यक्त केली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या रोड शोसाठी तैनात करण्यात आला आहे.
मी धर्माच्या आधारावर आरक्षण आणि बजेट होऊ होऊ देणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेत बोलताना म्हटले आहे.
नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होतेय. यावेळई त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. काँग्रेसने धर्माच्या आधारावर राजकारण केलं. नकली सेना काँग्रेसमध्ये विलिन होईल, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं.
नाशिकच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. गंगा पुत्र मोदीजी फाँर्म भरल्यानंतर दक्षिण काशीला गोदावरीच्या किना-यावर तुम्हाला भेटण्य़ासाठी आलेलं आहेत. गंगापुत्र मोदीजींना नाशिक, नगर , मराठवाड्यात पश्चिमी वाहिनीच्या पाणी आणायचं आहे. मोदीजीचा आशीर्वाद आपल्याला हवा आहे. मोदी है तो मुमकीन है, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या खानगावमध्ये वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. स्वतःच्या शेतात पीक आणि जनावर देखभालीसाठी गेला होता. 34 वर्षीय श्रावण खोब्रागडे, रात्री उशिरा शौचास गेला असताना नाल्यानजीक वाघाने घातली. झडप, सकाळी श्रावण घरी न परतल्याने ग्रामस्थांनी सुरू केला. शोध, वाघाच्या दहशतीने त्रस्त नागरिक झाले आहेत.
घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेनंतर कोल्हापूर शहरातील होर्डिंग देखील चर्चेत आले आहेत. कोल्हापूर शहरात 691 परवाना धारक होर्डिंग आहेत. यामध्ये 66 होर्डिंग हे महापालिकेच्या मालकीच्या जागेत तर इतर सर्व म्हणजेच बहुतांशी होर्डिंग हे खाजगी इमारतींवर लावण्यात आलेले आहेत. अशाच खाजगी इमारतींवर लावलेले शहरातील अनेक होर्डिंग धोकादायक बनले आहेत. वादळी वाऱ्यामुळे होर्डिंगवरील डिजिटल बोर्ड फाटून गेले आहेत. तर लोखंडी सांगाडे देखील धोकादायक अवस्थेत दिसत आहेत. घाटकोपर घटनेनंतर महापालिकेने होर्डिंग असोसिएशनची बैठक घेऊन मनचे कडक पालन करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.
नाशिक लोकसभा दिंडोरी लोकसभा आणि धुळे लोकसभा या तीनही लोकसभेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लाखोंच्या संख्येने 41 42 डिग्री तापमान गेलेला असताना लोकसभेसाठी येत आहे. याचा अर्थ पंतप्रधान म्हणून मोदी पुन्हा पाहिजे, अशी प्रतिक्रिया हेमंत गोडसे यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच काम करणाऱ्या सर्व बीएलओंनी विविध मागण्यासाठी आंदोलन केले. लोकसभा निवडणुकीच्या कामाचे वार्षिक मानधन वाढवून मिळण्यासह विविध मागण्यांचे निवेदन बीएलओंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. घोडबंदर वर्सोवा ब्रिज पासून वसई हद्दीत नायगाव पर्यंत तर ठाणे हद्दीत चेना पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.मागच्या एक ते दोन तासापासून गुजरात वरून मुंबई कडे जाणाऱ्या लेनवर ही वाहतूक कोंडी झाली असून वाहनधारक हैराण झाले आहेत.महामार्गावर सिमेंट काँक्रीट चे काम सुरू असून एक मार्गिकेच्या रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.
जल जीवन मिशन योजनेचा बोदवड तालुक्यात खेळखंडोबा झाला आहे. कॉन्टॅक्टरना काम कसं देता येतील आणि पैसा कसा कमवून घेता येतील यावरच मंत्री गुलाबराव पाटलांचा भर असतो अशी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सडकून टीका केली.
महाराष्ट्रातील शेवटच्या आणि पाचव्या टप्प्यासाठी नरेंद्र मोदी आज नाशिक अन् मुंबईत असतील. नरेंद्र मोदी यांची कल्याणसह नाशिकमध्ये सभा होईल. घाटकोपरमध्ये रोड शो होणार आहे. मोदी यांची दुपारी 3.15 वाजता नाशिकमधील दिंडोरीत सभा होणार आहे. त्यानंतर कल्याणमध्ये संध्याकाळी 5.15 वाजता सभा होईल. मुंबईत संध्याकाळी ते 6.45 वाजता रोड शो करतील.
नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांचा बैलगाडीतून प्रचार सुरु आहे. ग्रामीण भागात शांतिगिरी महाराजांचा बैलगाडीतून रॅली काढत प्रचार सुरु आहे. एकीकडे आज नाशिकमध्ये दिग्गज नेत्यांची सभा असताना दुसरीकडे शांतिगिरी महाराज मात्र ग्रामीण भागात प्रचार करत आहेत.
बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली. यापूर्वी जे खासदार निवडून आले, त्या जागांवर आधी उमेदवार निवडून आणा, असा टोला त्यांनी लगावला. महाराष्ट्रात आम्ही निश्चितपणे 45 चा आकडा पार करू. देशातही 400 पारचा जाऊन एक मजबूत सरकार नरेंद्र मोदी यांच्या रूपाने पाहायला मिळेल.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोदींच्या सभेसाठी नाशिकच्या पिंपळगावमध्ये दाखल. देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री दादा भुसे , छगन भुजबळ ही उपस्थित आहेत.
लोकांमधे प्रचंड उत्साह आहे. उत्तर महाराष्ट्रातील सगळ्या जागा जिंकणार. आजची सभा एतिहासिक ठरणार. लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे. 400 पार करायचं आणि मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं लोकांनी ठरवलं आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
जनतेने ठरवलं देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी. माझ्या दिंडोरी मतदार संघाने सुद्धा ठरवलं पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हवे. विरोधकांच्या पोटात दुखत आहे म्हणून उपप्रचाराला सुरुवात केली आहे, असे भारती पवार यांनी म्हटले.
नियोजन आपण बघत आहात आजच्या सभेसाठी एक लाख लोक येतील मोदींनी दिलेला संदेश हा गावागावापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा काम जनता करेल, असे कपिल पाटील यांनी म्हटले आहे.
सांगली जिल्ह्यातील टंचाईची परिस्थिती पाहता तांत्रिक कारणे न दाखवता पाणीपुरवठा करावा, अशा सक्त सूचना पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पूलकुंडवार यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती आढावा बैठकीदरम्यान ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चंद्रकांत पुलकुंडवार यांनी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.
शिवसेना शिंदे गटाचे कल्याण-मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी राजीनामा दिला. पंतप्रधान मोदींच्या सभेला अरविंद मोरे यांना आमंत्रण आहे. परंतु स्टेजवर स्थान न दिल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे. मोदींच्या आगमनापूर्वी भाजप शिवसेनेत नाराजी दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अरविंद मोरे यांनी राजीनामा पाठवला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. 17 तारखेला मोदी आणि राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर आहेत. या सभेचं निमंत्रण, हिंदूत्वाचा अजेंडा आणि मराठी मतांचा टक्का यावर दोन्ही नेत्यांमधे चर्चा सुरू आहे. मुंबईत शिवसेना ठाकरे गटांची मतं मनसेच्या माध्यमातून महायुतीकडे कशा पद्धतीने वळवता येतील यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. …
पुण्याच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन यांचं निधन झालं. त्यांचं हृदयविकारच्या झटक्याने निधन झालं. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. 1999 मध्ये त्या पुण्याच्या महापौर होत्या.
नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी बैलगाडीतून प्रचार केला. ग्रामीण भागात शांतिगिरी महाराजांनी बैलगाडीतून रॅली काढत प्रचार केला. एकीकडे आज नाशिकमध्ये दिग्गज नेत्यांची सभा असताना दुसरीकडे शांतिगिरी महाराज मात्र ग्रामीण भागात प्रचार करत आहेत. शेवटचे तीन दिवस उरल्याने रॅलीवर उमेदवारांचा भर आहे.
परदेशासह देशातील इतर राज्यातल्या छापेमारी नंतर महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपची पायामुळं पुण्याच्या नारायणगावमध्ये होती सुरु… नारायणगाव शहरातील एका इमारतीत सुरु होते काम… संपुर्ण इमारत महादेव अॅपसाठी वापरत असल्याची माहिती… 70 ते 80 जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती… नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये तपास सुरु
पुण्यातील पी एम पी एम एल रोडवर पीएमपीएल चालक व कारचालक यांच्यामध्ये वाद… कार ड्रायव्हरने पीएमपीएल चालकाला गाडी आडवी मारल्याने पी एम टी ड्रायव्हर संतापला… दोघांचाही रस्त्यात वाद सुरू… दोघांच्या वादामुळे वाहतूक कोंडी
पुण्यातील महाविकास आघाडीच्या बॅनरवर तीन उमेदवारांचे फोटो… मावळच्या सांजोग वाघेरे यांचा फोटो मात्र गायब… मावळबद्दल महाविकास आघाडीच्या मनात शंका ?… बारामती , शिरूर , पुणे लोकसभा उमेदवारांचे अभिनंदनाचे बॅनर… मात्र सांजोग वाघेरे यांचा फोटो मात्र नाही !
खानगाव येथे वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकऱ्याचा मृत्यू… स्वतःच्या शेतात पीक आणि प्राण्यांच्या देखभालीसाठी गेलेल्या 34 वर्षीय श्रावण खोब्रागडे याचं निधन… सकाळी श्रावण घरी न परतल्याने ग्रामस्थांनी सुरू केला शोध… वाघाच्या दहशतीने नागरिक झाले आहेत संतप्त… वन आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल
छत्रपती शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. महायुतीच्या प्रचारासाठी मोदींची भव्यदिव्य सभा होणार.
भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार. या सभेसाठी मनसैनिकही महायुतीच्या प्रचाराला लागल्याचं चित्र दिसत आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी गेले काही दिवस महाराष्ट्रात विविध ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीही प्रचारसभा घेत आहेत, याचा थेट परिणाम मतदानावर होणार का ? मुंबई मोदीमय होणार का पाहणं महत्वाचे ठरेल.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण – पोलिसांच्या 7 टीम आरोपीच्या मागावर आहेत. आरोपी भावेश भिंडे सध्या फरार आहे मात्र मुंबई पोलिसांच्या 7 टीम वेगवेगळ्या भागात त्याचा शोध घेत आहेत. आरोपी महाराष्ट्राच्या बाहेर पळाल्याचा संशय आहे.
वारंगवाडी मावळ येथे विहिरीत पडलेल्या कोल्हाची सुटका करण्यात आली आहे. वन्यजीव रक्षक मावळ रेस्क्यू टीम आणि मावळ वन विभाग यांनी खोल विहिरीत चार दिवसांपासून पडलेल्या कोल्ह्याला जाळीच्या साहाय्याने बाहेर काढून जीवदान देण्यात आले.या कोल्ह्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली. कोल्हा जखमी नसला तरी चार दिवसांपासून उपाशी होता त्यामुळे थोडा अशक्त झाला होता. प्राथमिक उपचार करून या वन्यप्राण्याला जंगलात सोडण्यात आले.
अंबरनाथ मध्ये शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर. जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा रसाळ पाटील यांची अध्यक्षपदी निवड. लोकसभा निवडणूक मध्ये ताकतीने महाविकास आघाडीला जिंकून देणार, व्यक्त केला विश्वास.
जळगावच्या जामनेर येथील सीआरपीएफच्या जवानाची स्वतःच्या सर्व्हिस रिवाल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. प्रकाश गोविंदा कापडे (वय ३७) असे आत्महत्या करणाऱ्या जवानाचे नाव आहे.
अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील काही भागात काल वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटात जोरदार अवकाळी पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरावरील पत्रे उडाली. नैसर्गिक संकटामुळे अनेकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूचे नुकसान झाले आहे.
कल्याण पश्चिमेत महायुतीकडून बॅनरबाजीतून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी येणाऱ्या मार्गावर महायुतीतील सर्वच पक्षाचे बॅनर लावले आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे कर्तबगार विकास पुरुष असे स्लोगन लिहिले आहे.
मुंबईतल्या घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर आता सांगली महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे. महापालिका क्षेत्रातल्या 297 होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश पालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी होर्डिंग ठेकेदार आणि प्रशासन दिल्या आहेत.
मुंबईतल्या घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर आता सांगली महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे. महापालिका क्षेत्रातल्या 297 होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश पालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी होर्डिंग ठेकेदार आणि प्रशासनाला दिले आहेत.
जळगावच्या जामनेर येथील सीआरपीएफच्या जवानाची स्वतःच्या. सर्विस रिवॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या. प्रकाश गोविंदा कापडे वय 37 असं आत्महत्या करणाऱ्या सीआरपीएफच्या जवानाचे नाव. जामनेर येथील स्वतःच्या राहत्या घरी मध्यरात्री दोन वाजता स्वतः कडे असलेल्या सर्विस रिवॉल्वरमधून गोळी झाडून केली आत्महत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिकच्या पिंपळगाव येथे सभा. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींच्या सभेचे आयोजन. दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी मोदी घेणार सभा. दिंडोरीतून भाजपाच्या भारती पवार तर नाशिक मधून शिवसेनेचे हेमंत गोडसे महायुतीचे उमेदवार. सभेतून नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत रोड शो होणार आहे. साडे सहा वाजता मोदी यांचे विक्रोळी येथे आगमन होईल. रोड शो हा 6.45 मिनिटांनी सुरू होऊन तो 7.45 ला संपेल. घाटकोपर पश्चिम येथे एलबीएस मार्गावरील दामोदर पार्क जवळील अशोक सिल्क मिल येथून हा रोड शो सुरू होऊन तो एम जी रोड वरून श्रेयस टॉकीज, सर्वोदय सिग्नल, संघवी स्केवर करत तो घाटकोपर पूर्व मध्ये रामजी असर शाळेजवळील पार्श्वनाथ मंदिर चौक येथे समाप्त होईल.