लोकसभा निवडणुकीच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. शरद पवार यांनी महाराष्ट्रातील आणि देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालावर समाधान व्यक्त केलं आहे. “हा निकाल झाल्यानंतर मी काही सहकाऱ्यांशी चर्चा केली. विशेषत: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि इतर प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. कदाचित दिल्लीत आज संध्याकाळी आमची बैठक पार पडेल. या बैठकीत आम्ही सामंजस्याने निर्णय घेऊ. आज अनेक चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रात 10 पैकी 7 जागांवर आघाडीवर आहोत. हे यश फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचं यश आहे, असं मी मानत नाही. काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि आमचे सर्व सहकाऱ्यांनी मेहनत केली त्यामुळे हे यश सगळ्यांना मिळालं. महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेचे खबरदारी घेऊ. मी चंद्राबाबू यांच्याशी बोलले किंवा इतर कुणाशी बोललो यात काही तथ्य नाही. अशा चर्चा आमच्या राष्ट्रीय पातळीवर चर्चा करुन केल्या जातील”, असं शरद पवार म्हणाले.
“महाराष्ट्रातील जनतेचे आभार. राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय कष्ट घेतले. त्याबद्दल मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. निवडणुकीचा निकाल आला आहे. हा निकाल इतर परिवर्तनाला पोषक असा आहे. आमचा प्रयत्न हा राहणार आहे की, देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली, सुदैवाने इतर ठिकाणीही चित्र आशायदायक आहे. उत्तर प्रदेशात साधारणपणे तुम्हा लोकांचं आणि आमच्या सहकाऱ्यांचे जे अंदाज होते. त्यापेक्षा वेगळा निकाल लागला आहे”, असं शरद पवार म्हणाले.
“या पूर्वी भाजपला उत्तर प्रदेश आणि या भागात जे यश मिळायचं त्याचं मार्जिन मोठं असायचं. आता त्यांना मिळालेल्या जागा त्यांना मर्यादित मार्जिनच्या आहेत. आम्ही राष्ट्रीय पातळीवर काम करतो. आमच्या सहकाऱ्यांनी सर्वाधिक लक्ष दिलं. त्यामुळे उत्तरेतील चेहरा बदलण्याचं काम करू. आम्ही काळजी घेऊ”, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं.
“निकाल लागल्यावर काही सहकाऱ्यांशी चर्चा केली. खर्गे, सीताराम येच्युरी आणि इतरांशी चर्चा केली. अजून नक्की नाही. उद्या दिल्लीत बैठकीत होणार असल्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत आम्हाला निरोप मिळेल. उद्याच्या बैठकीला तातडीने जाऊ. पुढची नीती आणि सामूहिकपणे घेऊ”, असं शरद पवार म्हणाले.
“या निवडणुकीत अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. राष्ट्रवादीने जयंत पाटील यांच्या नेतृत्वात जागा मर्यादित लढवल्या. १० जागा लढवल्या. आम्हाला सात जागेवर आघाडी आहे. याचा अर्थ १० जागा लढून ७मध्ये विजय मिळवण्याचं चित्र स्ट्राइकिंग रेट चांगला झाला आहे. यश मिळालं ते राष्ट्रवादीचं यश आहे असं मानत नाही. ही महाविकास आघाडी केली, त्या आघाडीच्या वतीने काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि आमच्या सहकाऱ्यांनी जीवाभावाने एकत्रित काम केलं. त्यामुळे आम्हाला यश मिळालं. परिवर्तनाचं वातावरण आहे. आम्ही तिघेही एकत्रित राहून. आमची धोरणं ठरवू. आणि जनतेची सेवा करू”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.