पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदार संघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण तसे पहिले तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच या ठिकाणी लढत आहे. परंतु अजित पवार यांनी बारामतीप्रमाणे शिरुर लोकसभा मतदार संघही प्रतिष्ठेचा बनवला होता. विद्यामान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी रणरण पछाडले. परंतु शेवटी कोल्हे यांचा विजय झाला. ऐनवेळी शिवसेनेतून राष्ट्रवादीत दाखल झालेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा पराभव झाला. यापूर्वी बारामती लोकसभा मतदार संघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्याठिकाणी शरद पवार यांच्या
महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील (ncp shivajirao adhalrao patil) रिंगणात आहे. परंतु आढळराव पाटील शिवसेनेकडून न लढता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढत आहे. त्यासाठी त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यामुळे शिरुरमध्ये अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील अशी दुरंगीच लढत झाली.
शिरूर लोकसभा मतदार संघ पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड भाग येतो. यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात. जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरुर, भोसरी आणि हडपसर आदी विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात. 2019 मध्ये अमोल कोल्हे विजयी झाले होते. त्यांना 6,35,830 मते मिळाली होती तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना 5,77,347 मते मिळाली होती. 2014 मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील 6,43,415 मते घेऊन विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी दत्तात्रय निकम यांना पराभूत केले होते. निकम यांना 3,41,601 मते मिळाली होती.
लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स