South Central Mumbai lok sabha Election Final Result 2024 : राहुल शेवाळेंना मोठा झटका, ठाकरे गट विजयी

| Updated on: Jun 04, 2024 | 3:42 PM

South cetral Mumbai Election Result 2024 News in Marathi : दक्षिण मध्य मुंबईतही यंदा सेना विरुद्ध सेना असा सामना आहे. शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शेवाळे रिंगणात आहेत, दुसऱ्याबाजूला ठाकरे गटाकडून अनिल देसाई निवडणूक मैदानात आहेत. सलग दोन टर्मपासून राहुल शेवाळे इथून खासदार आहेत. आज बाजी कोण मारणार? याची उत्सुक्ता आहे.

South  Central Mumbai lok sabha Election Final Result 2024 : राहुल शेवाळेंना मोठा झटका, ठाकरे गट विजयी
rahul shewale vs anil desai
Follow us on

दक्षिण मध्य मुंबईतही सेना विरुद्ध सेना सामना आहे. शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर उद्धव ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांचं आव्हान आहे. दक्षिण मध्य मुंबईत अणुशक्तीनगर, चेंबूर, धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहीम हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. दक्षिण मध्य मुंबईतून मागच्या दोन टर्मपासून राहुल शेवाळे खासदार आहेत. मतदारसंघात त्यांचा तगडा जनसंपर्क आहे. राहुल शेवाळे यांच्यासाठी ही लढाई सोपी नाहीय. कारण शिवसेना ठाकरे गटाच वर्चस्व या भागात आहे. राहुल शेवाळे यांच्या तुलनेत अनिल देसाई यांचा मतदारसंघात तितका जनसंर्पक नाहीय. दक्षिण मध्य मुंबईत यावेळी 53.60% मतदान झालय.

दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांचा पराभव केला आहे. अनिल देसाई 53,384 मतांनी विजयी झाले.

राहुल शेवाळे यांनी नगरसेवकपदापासून खासदारकी पर्यंतचा टप्पा गाठला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं. त्यानंतर राहुल शेवाळे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत उभे राहिले. राहुल शेवाळे यांना तिकीट आधीपासूनच निश्चित मानल जात होतं. त्यांनी मतदारांशी थेट जनसंर्पकावर भर दिला होता. दक्षिण मध्य मुंबईत सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. अणुशक्ती नगरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आहेत. चेंबूरमध्ये ठाकरे गटाचे प्रकाश फातर्पेकर आमदार आहेत. धारावीमधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आमदार आहेत. सायन कोळीवाड्यातून भाजपाचे कॅप्टन तामिळ सेल्वन आमदार आहेत. वडाळ्यामधून भाजपाचे कालिदास कोळंबकर आणि माहिममधून शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर आमदार आहेत.

उमेदवाराचे नाव आघाडी-पिछाडीनिकाल
अनिल देसाई (ठाकरे सेना)-विजय
राहुल शेवाळे (शिंदे सेना)-पराभव

मतदारसंघात कुठल्या वर्गाच प्राबल्य

या लोकसभा मतदारसंघात महायुतीचे चार तर महाविकास आघाडीचे दोन आमदार आहेत. म्हणजे राहुल शेवाळे यांची बाजू वरचढ आहे. दक्षिण मध्य मुंबईत मध्यमवर्गीय, कष्टकरी आणि उच्चभ्रू असे सर्व वर्गाचे मतदार आहेत. झोपडपट्टीचा मोठा भागही याच मतदारसंघात आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी इथेच आहे.