मुंबई लोकसभा निवडणूक निकाल 2024 Final Result and Highlights : मुंबईत कोणाची बाजी? जाणून घ्या सर्व निकाल

| Updated on: Jun 05, 2024 | 3:33 PM

Mumbai Region Lok Sabha Election Results 2024 LIVE Counting and Updates in Marathi : मुंबईत लोकसभेच्या सहाजागा आहेत. हा निकाल आज जाहीर होतोय. मुंबईत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. या निवडणुकीत शिंदे गट आणि ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मुंबई लोकसभा निवडणूक निकाल 2024 Final Result and Highlights : मुंबईत कोणाची बाजी? जाणून घ्या सर्व निकाल
Mumbai Loksabha election result 2024
Follow us on

मुंबईत लोकसभेच्या एकूण सहाजागा आहेत. मागच्या दोन टर्मपासून मुंबईतील सर्वच्या सर्व जागा मोदी सरकारने जिंकल्या आहेत. आता, मात्र अशी परिस्थिती नाहीय. काँटे की टक्कर पहायला मिळतेय. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ईशान्य मुंबई आणि उत्तर मुंबई या सहा लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. काही मतदारसंघात शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेना तर काही मतदारसंघात भाजपा विरुद्ध काँग्रेस असा सामना आहे. मुंबईत मराठी भाषिकांबरोबर अन्य भाषिक मतदारही मोठ्या संख्येने आहेत. उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी आणि मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. यात उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी मतदारांनी नेहमीच भाजपाला साथ दिलीय.

दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड झालं. शिवेसना शिंदे गट सत्तेत सहभागी झाला. उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीसोबत राहीला. मागच्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट महायुती सरकारमध्ये तर शरद पवार यांचा गट विरोधी पक्षात महाविकास आघाडीमध्ये राहीला. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक रंजक बनली. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून निवडणूक चिन्ह आणि पक्ष गेला. त्यामुळे या दोन्ही नेत्यांबद्दल सहानुभूती निर्माण झाली. त्याशिवाय मोडतोड करुन सरकार बनवण सुद्धा जनतेला आवडलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रात, मुंबईत यंदाची लोकसभा निवडणूक अटी-तटीची होणार यात शंका नाही.

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Jun 2024 04:55 PM (IST)

    North Central Mumbai Lok sabha Election Result 2024 : उज्वल निकम पराभूत

    उत्तर मध्य मुंबईत भाजपा उमेदवार उज्वल निकम यांचा पराभव झाला आहे. काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड विजयी झाल्या आहेत.

  • 04 Jun 2024 04:02 PM (IST)

    North Central Mumbai Lok sabha Election Result 2024 : उज्वल निकम फार कमी मतांनी आघाडीवर

    उत्तर मध्य मुंबईत भाजपा उमेदवार उज्वल निकम आणि काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांच्यात काँटे की टक्कर सुरु आहे. उज्वल निकम 176 मतांनी आघाडीवर आहेत.


  • 04 Jun 2024 03:45 PM (IST)

    North Central Mumbai Lok sabha Election Result 2024 : उज्वल निकम पिछाडीवर

    मोठी आघाडी घेऊन उत्तर मध्य मुंबईत भाजपा उमेदवार उज्वल निकम पिछाडीवर गेले आहेत. वर्षा गायकवाड आघाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 02:55 PM (IST)

    South Central Mumbai Lok sabha Election Result 2024 : अनिल देसाई दक्षिण मध्य मुंबईतून विजयी

    दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांचा पराभव केला.

  • 04 Jun 2024 02:53 PM (IST)

    South Mumbai Lok sabha Election Result 2024 : अरविंद सावंत दक्षिण मुंबईतून विजयी

    दक्षिण मुंबईत आणि ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी बाजी मारली आहे. त्यांच्याकडे 54 हजारपेक्षा जास्त मतांची आघाडी होती. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव केला.

  • 04 Jun 2024 02:33 PM (IST)

    उत्तर मुंबईतून पीयूष गोयल विजयी, फक्त घोषणा बाकी

    या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत ठाकरे गटाने खातं उघडलं आहे. अरविंद सांवत यांनी विजय मिळवला आहे. तर अनिल देसाई यांनीही बाजी मारली आहे. तर भाजपचे पीयूष गोयल यांचाही विजय झाला आहे.

  • 04 Jun 2024 02:08 PM (IST)

    North Mumbai Lok sabha Election Result 2024 : मुंबईतून पहिला निकाल जाहीर, उत्तर मुंबईत कोण जिंकलं?

    उत्तर मुंबईतून भाजपाचे उमेदवार पीयूष गोयल विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या भूषण पाटील यांचा पराभव केला आहे.

  • 04 Jun 2024 01:22 PM (IST)

    Mumbai Loksabha Election Result 2024 : नव्या आकड्यांनुसार मुंबईत कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर?

    उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकर 4 हजार 755 मतांनी आघीडवर, रवींद्र वायकर पिछाडीवर.

    दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई 36 हजार मतांनी आघाडीवर. राहुल शेवाळे पिछाडीवर आहेत.

    ईशान्य मुंबईतून ठाकरे गटाचे संजय दीना पाटील 22 हजार मतांनी आघाडीवर आहेत. भाजपाचे मिहिर कोटेचा पिछाडीवर आहेत.

    उत्तर मुंबईतून भाजपा उमेदवार पीयूष गोयल 1 लाख 33 हजार मतांनी आघाडीवर आहे. काँग्रेसचे भूषण पाटील पिछाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 12:56 PM (IST)

    Mumbai North West Loksabha Election Result 2024 : उत्तर पश्चिम मुंबईत वायकर पुन्हा आघाडीवर

    उत्तर पश्चिम मुंबईत काँटे की टक्कर सुरु आहे. शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर पुन्हा आघाडीवर आहेत. त्यांच्याकडे 3318 मतांची आघाडी आहे. अमोल किर्तीकर पिछाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 12:26 PM (IST)

    South Central Mumbai Lok sabha Election Result 2024 : राहुल शेवाळेंना मोठा झटका

    दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई 24 हजार 783 मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे पिछाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 11:51 AM (IST)

    Mumbai North West Loksabha Election Result 2024 : उत्तर पश्चिम मुंबईत अमोल किर्तीकर पुन्हा पुढे

    उत्तर पश्चिम मुंबईत काँटे की टक्कर सुरु आहे. अमोल किर्तीकर पुन्हा पुढे निघून गेले आहेत. त्यांच्याकडे 4 हजारपेक्षा जास्त मतांची आघाडी आहे. शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर पिछाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 11:16 AM (IST)

    Mumbai Lok sabha Election Result 2024 : मुंबईत 6 जागांवर कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? जाणून घ्या

    उत्तर मध्य मुंबईतून भाजपाचे उज्वल निकम हे 23 हजार मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यासाठी हा धक्का आहे.

    उत्तर मुंबईतून भाजपाचे उमेदवार पीयूष गोयल हे 49 हजार मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे भूषण पाटील हे पिछाडीवर आहेत.

    उत्तर पूर्व मुंबई म्हणजे ईशान्य मुंबईतून ठाकरे गटाचे संजय दीना पाटील हे 18 हजार मतांनी आघाडीवर आहेत. भाजपाचे मिहिर कोटेचा पिछाडीवर आहेत.

    दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे अरविंद सावंत 6 हजार मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव पिछाडीवर आहेत.

    दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाचे अनिल देसाई 10 हजार मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे पिछाडीवर आहेत.

    उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर 5 हजार मतांनी आघाडीवर आहेत. ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर पिछाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 10:42 AM (IST)

    Mumbai Lok sabha Election Result 2024 : संजय दिना पाटील, अनिल देसाई यांच्याकडे किती आघाडी?

    ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील 12 हजारपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर.

    दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई यांच्याकडे 6 हजारपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर.

     

  • 04 Jun 2024 10:28 AM (IST)

    North Central Mumbai Lok sabha Election Result 2024 : वर्ष गायकवाड यांच्यासाठी बॅड न्यूज

    उत्तर मध्य मुंबईत भाजपा विरुद्ध काँग्रेस असा सामना आहे. भाजपाच्या उज्वल निकम यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्यांच्याकडे 18 हजारपेक्षा जास्त मतांची आघाडी आहे. काँग्रेसकडून वर्षा गायकवाड रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी हा धक्का आहे.

  • 04 Jun 2024 10:12 AM (IST)

    North West Mumbai Lok sabha Election Result 2024 : रवींद्र वायकर किती हजार मतांनी आघाडीवर ?

    उत्तर पश्चिम मुंबईत ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर आणि शिंदे गट शिवसेनेचे रवींद्र वायकर यांच्यात काँटे की टक्कर आहे. रवींद्र वायकर 1 हजार 927 मतांनी आघाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 10:07 AM (IST)

    South Mumbai Lok sabha Election Result 2024 : अरविंद सावंत किती हजार मतांनी आघाडीवर?

    दक्षिण मुंबईत शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव आणि ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांच्यात काँटे की टक्कर सुरु आहे. आधी यामिनी जाधव 1 हजारपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर होत्या. आता अरविंद सावंत 2 हजारपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत.

     

  • 04 Jun 2024 09:49 AM (IST)

    North East Mumbai Lok sabha Election Result 2024 : ईशान्य मुंबईत पहिल्या फेरी अखेर कोण आघाडीवर?

    ईशान्य मुंबईतील पहिल्या फेरीच्या मतमोजणीचे आकडे समोर आले आहेत. संजय दिना पाटील यांना 24,377 मत मिळाली आहेत. त्याचवेळी मिहीर कोटेचा यांना 14033 मत मिळाली आहेत. ठाकरे गटाचे उमेदावार संजय दिना पाटील 10304 मतांनी आघाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 09:27 AM (IST)

    South Mumbai Lok sabha Election Result 2024 : यामिनी जाधव यांच्याकडे किती मतांची आघाड़ी?

    दक्षिण मुंबईत शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव आणि ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांच्यात काँटे की टक्कर सुरु आहे. दुसऱ्या फेरीच्या मतमोजणी अखेर यामिनी जाधव 1 हजारपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहे.

  • 04 Jun 2024 08:54 AM (IST)

    North Central Mumbai Lok sabha Election Result 2024 : ‘मुंबईमध्ये सहा जागा महाविकास आघाडी जिंकेल’

    “आज निकाल आहे, मी आघाडीवर आहे धन्यवाद. आम्ही मेहनत घेतली आहे. लोकशाहीचा अधिकार आहे सगळ्यांना वाटतं आपणच जिंकावं. मात्र देशामध्ये देखील आमची सत्ता येईल. मुंबईमध्ये सहा जागा महाविकासआघाडी जिंकेल. विजय आधीच कार्यकर्त्यांनी वर्षा गायकवाड यांना पेढे भरून वर्षाताई त्यांच्याच सायन निवासस्थानी जल्लोष साजरा केलाय.

  • 04 Jun 2024 08:31 AM (IST)

    North East Mumbai Lok sabha Election Result 2024 : ईशान्य मुंबईत स्थिती बदलली, आता कोण आघाडीवर?

    ईशान्य मुंबईत भाजपा विरुद्ध ठाकरे गट असा थेट सामना आहे. सुरुवातीला ठाकरे गटाचे संजय दीना पाटील आघाडीवर होते. आता भाजपाचे मिहिर कोटेचा आघाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 08:19 AM (IST)

    South Central Mumbai Lok sabha Election Result 2024 : राहुल शेवाळे Vs अनिल देसाई, कोण आघाडीवर?

    दक्षिण मध्य मुंबईतही यंदा सेना विरुद्ध सेना असा सामना आहे. शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शेवाळे रिंगणात आहेत, दुसऱ्याबाजूला ठाकरे गटाकडून अनिल देसाई निवडणूक मैदानात आहेत. राहुल शेवाळे आघाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 08:19 AM (IST)

    South Mumbai Lok sabha Election Result 2024 : यामिनी जाधव Vs अरविंद सावंत, कोण आघाडीवर

    दक्षिण मुंबईत यंदा सेना विरुद्ध सेना असा सामना आहे. शिवसेना शिंदे गटाकडून यामिनी जाधव रिंगणात आहेत, दुसऱ्याबाजूला ठाकरे गटाकडून अरविंद सावंत निवडणूक मैदानात आहेत. अरविंद सावंत यांनी आघाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 08:18 AM (IST)

    North East Mumbai Lok sabha Election Result 2024 : ईशान्य मुंबईतून कोण आघाडीवर?

    ईशान्य मुंबईत भाजपा विरुद्ध ठाकरे गट असा थेट सामना आहे. ठाकरे गटाचे संजय दीना पाटील आघाडीवर आहेत. भाजपाने मिहिर कोटेचा यांना तिकीट दिलय तर मविआकडून संजय दीना पाटील रिंगणात आहेत.

  • 04 Jun 2024 08:16 AM (IST)

    North West Mumbai Lok sabha Election Result 2024 : अमोल किर्तीकर आघाडीवर

    उत्तर पश्चिम मुंबईत ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर आणि शिंदे गट शिवसेनेचे रवींद्र वायकर यांच्यात सामना आहे. त्यात प्राथमिक मतमोजणीत अमोल किर्तीकर आघाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 08:10 AM (IST)

    North Mumbai Lok sabha Election Result 2024 : मुंबईतून पहिला कल आला समोर

    मुंबईतून पहिला कल आला समोर. उत्तर मुंबईतून भाजपाचे पीयूष गोयल आघाडीवर आहेत. काँग्रेसचे भूषण पाटील पिछाडीवर आहेत.

  • 04 Jun 2024 07:41 AM (IST)

    North Mumbai Lok sabha Election Result 2024 : पीयूष गोयल Vs भूषण पाटील, भाजपासाठी सोपी लढाई का?

    उत्तर मुंबईत भाजपा विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना आहे. भाजपाने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना तिकीट दिलय तर काँग्रेसकडून भूषण पाटील मैदानात आहेत. वाचा सविस्तर….

  • 04 Jun 2024 07:40 AM (IST)

    North East Mumbai Lok sabha Election Result 2024 : मिहिरी कोटेचा Vs संजय दीना पाटील कोण बाजी मारणार?

    ईशान्य मुंबईत भाजपा विरुद्ध ठाकरे गट असा थेट सामना आहे. भाजपाने मिहिर कोटेचा यांना तिकीट दिलय तर मविआकडून संजय दीना पाटील रिंगणात आहे. वाचा सविस्तर….

  • 04 Jun 2024 07:36 AM (IST)

    North West Mumbai Lok sabha Election Result 2024 : रवींद्र वायकर Vs अमोल किर्तीकर कोण बाजी मारणार?

    उत्तर पश्चिम मुंबईत सेना विरुद्ध सेना असा सामना आहे. शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र वायकर रिंगणात आहेत, दुसऱ्याबाजूला ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर निवडणूक मैदानात आहेत. आज बाजी कोण मारणार? वाचा सविस्तर….

  • 04 Jun 2024 07:33 AM (IST)

    North Central Mumbai Lok sabha Election Result 2024 : उज्वल निकम Vs वर्षा गायकवाड कोण बाजी मारणार?

    उत्तर मध्य मुंबईत भाजपा विरुद्ध काँग्रेस असा सामना आहे. भाजपाने उज्वल निकम यांना तिकीट दिलय तर काँग्रेसकडून वर्षा गायकवाड रिंगणात आहेत. वाचा सविस्तर….

  • 04 Jun 2024 07:30 AM (IST)

    South Central Mumbai Lok sabha Election Result 2024 : राहुल शेवाळे Vs अनिल देसाई, कोण जिंकणार?

    दक्षिण मध्य मुंबईतही यंदा सेना विरुद्ध सेना असा सामना आहे. शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शेवाळे रिंगणात आहेत, दुसऱ्याबाजूला ठाकरे गटाकडून अनिल देसाई निवडणूक मैदानात आहेत.वाचा सविस्तर….

  • 04 Jun 2024 07:26 AM (IST)

    South Mumbai Lok sabha Election Result 2024 : यामिनी जाधव Vs अरविंद सावंत, कोण बाजी मारणार?

    दक्षिण मुंबईत यंदा सेना विरुद्ध सेना असा सामना आहे. शिवसेना शिंदे गटाकडून यामिनी जाधव रिंगणात आहेत, दुसऱ्याबाजूला ठाकरे गटाकडून अरविंद सावंत निवडणूक मैदानात आहेत. वाचा सविस्तर….

  • 04 Jun 2024 07:08 AM (IST)

    Mumbai lok sabha Result 2024 : मतमोजणीला उरला फक्त एक तास

    मुंबईत लोकसभेच्या सहा जागा आहेत. मुंबईकर कोणाला कौल देणार महायुतीला की, महाविकास आघाडीला ते थोड्याचवेळात स्पष्ट होईल. 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.