Mumbra Voting : मुंब्र्यात मतदान केंद्रावर गोंधळ, नागरिक खवळले, जितेंद्र आव्हाड म्हणाले…Video

| Updated on: May 20, 2024 | 3:28 PM

Mumbra Voting : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'अधिकारी मुद्दामून हे करतायत, गप्पा मारतायत, हसतायत, खेळतायत' असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. मतदानासाठी वेळ लागतोय, त्यावरुन जितेंद्र आव्हाडांनी हे आरोप केलेत. 'रात्री 11 वाजून गेले तरी चालतील, मतदान करुनच जाईन' असं एका महिला मतदाराने सांगितलं.

Mumbra Voting : मुंब्र्यात मतदान केंद्रावर गोंधळ, नागरिक खवळले, जितेंद्र आव्हाड म्हणाले...Video
jitendra awhad Mumbra
Follow us on

मुंबई-ठाण्यात आज बहुतांश ठिकाणी नागरिकांमध्ये मतदानाचा मोठा उत्साह आहे. पण मतदानाच्या प्रक्रियेला बराच वेळ लागतोय. त्यामुळे मतदानासाठी गेलेले नागरिक तक्रारी करत आहेत. काही मिनिटांच्या मतदानासाठी काही तास लागतायत. काही मतदान केंद्रावर गोंधळ सुरु असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मुंब्र्यात मतदानासाठी मतदान केंद्रावर रांगा लागल्या आहेत. मुंब्र्यात नागरिकांमध्ये मतदानाचा मोठा उत्साह आहे. पण मतदान प्रक्रियेला वेळ लागत असल्याने नागरिक चिडले आहेत. मुंब्र्यात पोलीस ठाण्याजवळील बाबाजी सखाराम पाटील शाळेत मतदानासाठी गर्दी झाली आहे. एका महिला मतदाराने या ठिकाणी नाराजी व्यक्त केलीय.

“मतदान स्लो, स्लो होतय. तीन-चार तास झालेत. जो पर्यंत मतदान करायला मिळणार नाही, तो पर्यंत इथून जाणार नाही. रात्री 11 वाजून गेले तरी चालतील, मतदान करुनच जाईन” अस मतदानासाठी आलेल्या महिलेने ठणकावून सांगितलं. हे सर्व मुद्दामून सुरु आहे असं एक अन्य मतदार म्हणाला. “मी निवडणूक निरीक्षक मनोज जैनशी बोललो. काही अधिकारी मुद्दामून करतायत. खुसपट काढतायतय. हे इथेच नाही, कळव्यात सुद्धा चालू आहे. लोकांना परत पाठवल जातय” असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.

‘अधिकारी गप्पा मारतायत, हसतायत, खेळतायत’, जितेंद्र आव्हाडांचा आरोप

“सहावाजता जो मतदार मतदानासाठी रांगेत उभा राहिलं, त्याला कितीही उशीर लागला, रात्रीचे 11 वाजू दे तरी तो मतदान करणारच. मी या बद्दल लवकरच एक व्हिडिओ पोस्ट करीन” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. “कायदा आहे, तेच कायदा सांगतो. जेढा वेळ वाया जाईल, तेवढा मतदानाला द्यावाच लागेल. सहा वाजता जेवढी लोक इथे असतील तेवढ्या लोकांकडून मतदान करुन घ्यावच लागेल” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ‘अधिकारी मुद्दामून हे करतायत, गप्पा मारतायत, हसतायत, खेळतायत’ असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.