महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकी संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु आहे. “दोन दिवसांपासून राजकीय पक्षांशी चर्चा झाली. सण, उत्सव पाहून निवडणुका घोषित करा, असं राजकीय पक्षांचं म्हणणं आहे. आम्ही 11 राजकीय पक्षांशी चर्चा केली” असं निवडणूक आयोगाने सांगितलं. “पैशांची ताकद रोखण्याची विनंती काही पक्षांनी केली. पोलिंग स्टेशन दूर आहेत. वृद्धांना येण्याजाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्याची मागणी केली” असं निवडणूक आयोगाने म्हटलं.
पोलिंग एजंट त्याच मतदारसंघाचा असावा अशी काही पक्षांनी विनंती केल्याच निवडणूक आयोगाने सांगितलं. मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास मनाई करण्याची मागणीही पक्षांनी केली. फेक न्यूज रोखण्याची मागणी त्यांनी केली. फेक न्यूज कसे रोखणार याची माहिती आम्ही दिली असं निवडणूक आयोगाने सांगितलं.
महाराष्ट्रात मतदारांची एकूण संख्या किती आहे? SC, ST मतदारसंघ किती आहेत? पुरुष, महिला मतदारांची संख्या किती? 85 वर्षावरील मतदार किती आहेत? त्याची माहिती दिली.
विधानसभा निवडणूक महत्त्वाची माहिती
महाराष्ट्रात विधानसभेचे एकूण 288 मतदारसंघ आहेत.
SC 29 आणि ST 25 मतदारसंघ आहेत.
चालू विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्याआधी विधानसभा निवडणूक घ्यावी लागणार आहे.
महाराष्ट्रात एकूण नोंदणीकृत मतदारांची संख्या 9.59 कोटी आहे.
पुरुष मतदारांची संख्या 4.59 कोटी आणि महिला मतदारांची संख्या 4.64 कोटी आहे.
तृतीयपंथीय मतदारांची संख्या 6 हजार आहे.
वय वर्ष 85 च्या पुढे असलेल्या मतदारांची संख्या 12.48 लाख आहे.
पहिल्यांदाच मतदान करणारे 19.48 लाख मतदार आहेत.
1 लाख 186 पोलिंग स्टेशन महाराष्ट्रात आहे
9 लाख नवीन महिला मतदार आहेत.
महाराष्ट्रात महिला मतदार वाढवण्यात आम्ही यशस्वी ठरलो.
शहरी विभागात 100 टक्के बुथवर सीसीटीव्ही लावण्यात येणार
ग्रामीण भागात 50 टक्के बुथवर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे