लोकसभेच्या निवडणुकीचे तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील 11 जागा आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कोल्हापूरचे शाहू महाराज, बारामतीमधील शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मतदार संघात आज मतदान होत आहे. देशातून एकूण 1,351 उमेदवार तर महाराष्ट्रातील 11 लोकसभा जागांतून 519 उमेदवारी आपले नशिब अजमवत आहेत. आज होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. बारामती मतदार संघात सीआरपीएफच्या 12 तुकड्या तैनात केल्या आहेत. तर राज्य पोलीस दलाचे देखील 8509 कर्मचारी देखील बारामतीत बोलवण्यात आले आहे. सकाळीच अजित पवार मातोश्रीसह मतदान करण्यासाठी दाखल झाल्या. त्यांनी मतदानाचा हक्का बजावला.
महाराष्ट्रातल्या 11 जागांसह देशभरात तिसऱ्या टप्प्यात एकूण 93 जागांवर मतदान पार पडलं. भारतात तिसऱ्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 60 टक्के मतदान झालंय, ज्यात सर्वाधिक मतदान पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये झालंय. बंगालमध्ये 73.93 टक्के इतकं मतदान झालंय. उत्तर प्रदेशात 55.13 टक्के, मध्य प्रदेशात 62.28 टक्के मतदान, छत्तीसगडमध्ये 66.87 टक्के, बिहारमध्ये 56.01 टक्के मतदान, आसाममध्ये 74.86 टक्के मतदान झालं. तर सर्वात कमी मतदान महाराष्ट्रातच झालंय. महाराष्ट्रात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.40 टक्के मतदान झालं.
सांगली : सांगली लोकसभेसाठी 6 वाजेपर्यंत सरासरी 58 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. उद्या दुपारपर्यंत अंतिम टक्केवारी स्पष्ट होईल. 20 केंद्रावर मतदान प्रक्रिया आद्यप सुरू आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघातील तालुकानिहाय सरासरी टक्केवारी
59 % – मिरज
57 %- सांगली
58 %- पलूस
51 % – खानापूर-आटपाडी
61 %- तासगाव -कवठेमहांकाळ
59 % जत
सोलापुरात पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते आमने-सामने आले. सोलापुरातल्या श्री सिद्धेश्वर शाळेसमोरील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. यावेळी भाजपचे उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे हे देखील होते उपस्थित होते. दोन्ही बाजूंच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकमेकांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलीस उपायुक्त विजय कबाडे घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मतदान केंद्रासमोर जमलेली गर्दी पांगवली.
धाराशिव लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून 6 वाजता मतदानाची वेळ संपली तरी काही मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52 टक्के मतदान झाले आहे. 6 वाजेपर्यंतपर्यंत अंदाजे 60 टक्केपेक्षा जास्त मतदान होईल. मतदानाची वेळ संपल्यावर नागरिकांना रांगेत थांबवून ठेवले असून त्यांचं मतदान करुन घेतले जाणार आहे.
सातारा : दुपारी 5 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी
सातारा लोकसभा एकूण मतदान 54.01%
वाई विधानसभा -51.09
कोरेगाव विधानसभा- 57.21
कराड उत्तर – 54.89
कराड दक्षिण- 56.99
पाटण – 50.03
सातारा- 53.55
सोलापूर : सांगोल्यातील जाळण्यात आलेल्या मशीनच्या बदल्यात नवीन ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन बसविण्यात आले. संबंधित मतदान केंद्रावर शांतता असून सुरळीत मतदान सुरू आहे. जे मशीन जळाले आहेत त्यावरील मतदान मोजता येणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा एकदा मतदान घेण्याची कोणतीही गरज नाही. सांगोल्यात ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिलीय. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात एका युवकाने ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न केला होता.
माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोल्या तालुक्यातील बागलवाडी येथे एका मतदार केंद्रावरती मतदारांनी ईव्हीएम मशीन पेटवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे. सोलापूर पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे यांनी मतदान केंद्राला भेट दिली संबंधित इसमावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सांगोला पोलीस ठाण्यात सुरू असून याबाबत जिल्हाधिकारी पत्रकार परिषद घेतील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
इंडिया आघाडीचे सर्वात मोठे नेते जेलमधून बाहेर आलेत. चारा घोटाळ्यात ज्यांना कोर्टाने शिक्षा सुनावली. ते म्हणतायत इंडिया आघाडीचं सरकार आले तर मुस्लिमांना पुर्ण आरक्षण देणार. पुर्ण आरक्षण कोणाकडे आहे. एससी , एसटी आणि ओबीसीकडे आहे. हे सर्व आरक्षण हिसकावून मुस्लिमांना देणार म्हणतायत. वोट बँक पक्की करण्याच काम करत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केलीय.
तुमचं एक मत थेट मोदींच्या खात्यात जाणार आहे. त्यामुळे विचार करून मतदान करा. देशात आणथीन विकास होणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आमचं सरकार अनेक योजना आणत आहे- नरेंद्र मोदी
आमच्या काळात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आल्या. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशहिताचा एकही मुद्दा नाही. काँग्रेसने 50 वर्षे फक्त गरिबी हटावचे नारे दिले. इंडिया आघाडीतील मोठे नेते नुकतेच बाहेर आलेत- नरेंद्र मोदी
देशात भाजप आणि एनडीएला मोठं समर्थन मिळत आहे. काँग्रेसजवळ बोलण्यासाठी काहीच नाही. गरिबी हटवण्यासाठी खोटी आश्वासने देत त्यांची फसवणूक केल्याचं म्हणत नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ मोदींची नगरमध्ये सभा सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शेरसिंग घुबया यांना फिरोजपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या नावाला मंजुरी दिली.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, अभिनेते शेखर सुमन म्हणतात, “मी येथे कोऱ्या पाटीसह आलो आहे.आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे, म्हणूनच मी येथे आलो आहे. बरोबर काय अयोग्य यावर आपण खूप चर्चा करतो पण आपल्याला या व्यवस्थेत सामील होण्याची गरज आहे.मी याच विचाराने आलो आहे.”
#WATCH | Delhi: After joining BJP, actor Shekhar Suman says, "…I have come here with a clean slate. You don't raise questions when you completely surrender. We all have a social responsibility, that's why I have come here… We discuss a lot about what's right and wrong but we… pic.twitter.com/VQoy7927dE
— ANI (@ANI) May 7, 2024
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बारपेटा लोकसभा मतदारसंघात मतदान केले. एनडीएने काँग्रेसच्या दीप बायन यांच्या विरोधात असम गण परिषदेचे (एजीपी) उमेदवार फणी भूषण चौधरी यांना उभे केले आहे.
#WATCH | Kamrup: Assam Chief Minister Himanta Biswa Sarma arrives to cast his vote in Barpeta Parliamentary Constituency.
NDA has fielded Asom Gana Parishad (AGP) candidate Phani Bhusan Choudhury against Congress' Deep Bayan.#LokSabhaElections2024 pic.twitter.com/OJFtpeIKdM
— ANI (@ANI) May 7, 2024
माजी केंद्रीय मंत्री आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एसएम कृष्णा यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “मी त्यांना भेटायला आलो आहे. त्यांची प्रकृती सुधारत आहे आणि मी त्यांना शुभेच्छा देतो की, ते लवकर बरे व्हावेत.”
#WATCH | After meeting Union Minister and former Karnataka CM SM Krishna, Congress president Mallikarjun Kharge says "I came to meet him. He is improving and I wish him all the best and he should speedily recover." pic.twitter.com/Jjw8TMaAu2
— ANI (@ANI) May 7, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी विमानतळाहून नगरकडे रवाना झाले आहेत. महायुतीच्या उमेदवारांसाठी नगर येथे मोदींची सभा होत आहे. नगर दक्षिण मधून सुजय विखे तर शिर्डीतून सदाशिव लोखंडे महायुतीचे उमेदवार आहेत.
रावेर लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी गिरीश महाजन मैदानात उतरले आहेत. गिरीश महाजनांच्या मतदारसंघात रक्षा खडसेंची भव्य प्रचार रॅली होत आहे.
महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील आणि सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ अहमदनगर येथे महाविजय संकल्प सभा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस या सभेला उपस्थित राहणार आहेत.
लातूर – ३२.७१ टक्के
सांगली – २९.६५ टक्के
बारामती – २७.५५ टक्के
हातकणंगले – ३६.१७ टक्के
कोल्हापूर – ३८.४२ टक्के
माढा – २६.६१ टक्के
उस्मानाबाद – ३०.५४ टक्के
रायगड – ३१.३४ टक्के
रत्नागिरी –सिंधुदूर्ग – ३३.९१ टक्के
सातारा – ३२.७८ टक्के
सोलापूर – २९.३२ टक्के
दुपारी 1 वाजेपर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण 32.78 टक्के मतदान
वाई विधानसभा -31.29
कोरेगाव विधानसभा- 33.93
कराड उत्तर – 31.97
कराड दक्षिण- 33.46
पाटण – 33.09
सातारा- 33.05
मतदानावर बहिष्कार टाकणाऱ्या एका महिलेने सांगितले की, “आमच्या भागाचा कोणताही विकास झालेला नाही. रस्ते, पूल बांधले गेले नाहीत. इथले खासदार, आमदार गायब आहेत. सरकार आमचे म्हणणे ऐकून घेईपर्यंत कारण आम्ही इथेच बसून मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत.”
#WATCH मालदा, पश्चिम बंगाल: मतदान का बहिष्कार कर रही एक महिला ने कहा, "हमारे क्षेत्र में विकास से जुड़ा कोई ताम नहीं हुआ है, सड़कें, ब्रिज नहीं बनाई गई। क्षेत्र के सांसद विधायक यहां से नदारद हैं। हमारी बातें सरकार को सुन्नी होंगी। जब तक यहां पर मतदान जारी रहेंगे हम तब यहां बैठे… https://t.co/GvGzgdwYWE pic.twitter.com/sNgN8hKegV
— ANI_HindiNews (@AHindinews) May 7, 2024
हातकणंगले मतदारसंघात सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत 36.17 टक्के मतदान झाले आहे.
हातकणंगले- 278 – 39.65 टक्के
इचलकरंजी 279 – 33.77 टक्के
इस्लामपूर- 283- 37.20 टक्के
शाहूवाडी- 277- 35.48 टक्के
शिराळा- 284- 34.98 टक्के
शिरोळ – 280- 35.71 टक्के
देशात तिसऱ्या टप्प्याचं मतदान सुरु आहे. यात दुपारी 1 वाजेपर्यंत 39.92 टक्के मतदान झालं आहे. राज्यात हा आकडा 31.55 टक्के इतका आहे.
#LokSabhaElections2024 के तीसरे चरण के लिए दोपहर 1 बजे तक 39.92% मतदान हुए।
असम 45.88%
बिहार 36.69%
छत्तीसगढ़ 46.14%
दादरा और नगर हवेली और दमन और दीव 39.94%
गोवा 49.04%
गुजरात 37.83%
कर्नाटक 41.59%
मध्य प्रदेश 44.67%
महाराष्ट्र 31.55%
उत्तर प्रदेश 38.12%
पश्चिम बंगाल 49.27% pic.twitter.com/ZXjagE2br6— ANI_HindiNews (@AHindinews) May 7, 2024
दिल्लीच्या एक्साईज पॉलिसी प्रकरणात दिल्ली कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीने कोठडी 20 मे पर्यंत वाढवली.
दिल्ली एक्साइज़ पॉलिसी मामले में दिल्ली की अदालत ने दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल की न्यायिक हिरासत 20 मई तक बढ़ाई।
(फाइल तस्वीर) pic.twitter.com/IfxEFsH1qc
— ANI_HindiNews (@AHindinews) May 7, 2024
महाड मधील खैरे गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे. आमच्या गावात दोन कंपन्या होत आहे. त्यांचा आम्ही आधीपासून विरोध करत होतो, मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आम्ही यावेळी मतदान करणार नाही, अशा भावना खैरे गावातील नागरिकांनी बोलून दाखवल्या.
सोलापूर मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी अशी आहे. सोलापूर लोकसभा 29.31 टक्के तर माढ्याचे मतदान 26.77 टक्के इतके मतदान झाले.
लोकसभा साठी सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेत 30.54 % मतदान
औसा 31.89
उमरगा 32
तुळजापूर 31.57
उस्मानाबाद 29.13
परंडा 30.6
बार्शी 28.24
सांगलीमध्ये जिवंत असलेला मतदाराला मतदार यादीत चक्क मयत दाखवलं आहे. वाळवा तालुक्यातील साखराळे गावातील मतदार केंद्रावर अजब प्रकार समोर आला आहे. दिनकर संकटे आणि ग्रामस्थांनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. इतकंच नाहीतर निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. मतदार सचिन दिनकर सकटे, वय 36 राहणार वाळवा तालुक्यातील साखराळे गाव असे जिवंत असताना मयत दाखवलेल्या नागरिकांचे नाव आहे.
काटेवाडीच्या माजी सरपंच यांचे विद्यमान सरपंच मंदाकिनी भिसे यांचा मुलगा सागर भिसे याला पैसे देतानाचे व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पैसे देतानाचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतंय. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ पोस्ट केला आहे.
बारामतीमध्ये पैसे वाटल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता, त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी महायुतीच्या सरकारवर निशाणा साधला आहे. जयंत पाटील म्हणाले, ‘पोलीस आणि सरकारी यंत्रणा सत्ताधारी सरकारला बळी पडत आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. तसेच पराभवाच्या भीतीने ज्यांचा पराभव होणार आहे, तो प्रचंड पैसे खर्च करत आहे, अशी देखील टीका जयंत पाटलांनी केली आहे.’
हातकणंगले मतदारसंघात वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर गोंधळ उडाला. महायुतीचे उमेदवार धीर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला. वाळवा तालुक्यातील साखराळे गावातील बूथ क्रमाक 62,63 वर हा प्रकार घडला. या दोन्ही गटात जोरात बाचाचची आणि जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. मतदान केंद्र क्रमांक 62 आणि 63 वर सत्यजित पाटील सरूडकर यांचे बोगस प्रतिनिधी याच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत धैर्यशील माने यांच्या गटाने मतदान केंद्र काही काळ बंद ठेवले होते.
दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घ्यायचं काम राजू शेट्टी करतात. त्यांच्या बुडक्या डोक्याला मीच फेटा बांधणार. इचलकरंजी शहराला पाणी कोण देणार हा येणारा काळच ठरवेल. त्यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये काय कामे केली हे जनतेला माहित आहे, असे धैर्यशील माने यांनी म्हटले.
भावनिक मुद्दे करून निवडणूक जिंगता येत नाही. रोहित पवारांना अजून शिकायचं आहे, लोकांचा तुमच्यावर विश्वास राहिला नाही. तुमचा पराभव निश्चित आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.
धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा…
उत्तर महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघातील ठाकरेंची पहिलीच सभा…
प्रत्येक तालुक्यातून सभेला येण्यासाठी लोकांची चढाओढ सुरू आहे. त्यामुळे ही सभा रेकॉर्डब्रेक होईल, राधाकृष्ण विखे यांचा विश्वास
लातूरच्या सुनेगावच्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याचा प्रकार पुढे आलाय.
काकी आशा पवारांच्या भेटीसाठी सुप्रिया सुळे या नुकताच अजित पवार यांच्या घरी पोहचल्या आहेत.
धाराशिवमध्ये तांत्रिक कारणांमुळे मशीन बदलल्या. 29 ठिकाणी vvpat, 22 evm मशीन व 9 कंट्रोल युनिट काही तांत्रिक कारणांमुळेल बदलल्या, हे प्रमाण 1 टक्का पेक्षा कमी असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले. 10 ठिकाणी मतदानावर बहिष्कार घालण्यात आला मात्र प्रशासनाने तो प्रश्न सोडवत मागे घ्यायला लावल्याची माहिती त्यांनी दिली.
बारामती लोकसभा मतदारसंघामधील भोर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या दहा वर्षात जे सरकार होतं, त्यांनी 10 वर्षात दिलेल्या आश्वासनबद्दल जनतेची नाराजी दिसत आहे, असे मतदानानंतर ते म्हणाले.
अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी मतदान केले. अहमदाबाद येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मतदानाचा हक्क बजावला. कर्नाटक मधल्या कलबुर्गी मतदार संघातल्या मतदान केंद्रावर खर्गे यांनी मतदान केलं.
सोलापुरात 101 वर्षांच्या आजोबांनी मतदानाचा अधिकार बजावला. 100 किलोमीटर अंतरावरून शहरात दाखल होत शिवलाल मछले यांनी मतदान केले. ह भ प शिवलाल महाराज मछले यांचे वय 101 वर्षांचे आहेत. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथून ते मतदानासाठी सोलापुरात दाखल झालेत.
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मतदानाचा हक्क बजावला.धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये बार्शी विधानसभेचा समावेश आहे. देशाची सुरक्षा अबाधित ठेवणाऱ्या नेत्याला मतदान करण्याचे आवाहन आमदार राजेंद्र राऊत यांनी केले.
…क्योंकि बात मुल्क को बचाने की है, क्योंकि बात संविधान बचाने की है, अशी समाज माध्यमावर पोस्ट करत सुषमा अंधारे यांनी मतदान केले. सुषमा अंधारे यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून मतदानाचा हक्क बजावला.
…क्योंकि बात मुल्क को बचाने की है
क्योंकि बात संविधान बचाने की है@ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @PTI_News @ANI #Loksabha2024 pic.twitter.com/8Jznxp5G4F— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) May 7, 2024
धाराशिव जिल्ह्यात पैसे आणि दारूच्या बाटल्या वाटणयाचा प्रकारात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महायुतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना मतदान करण्यासाठी 500 रुपये व दारू वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मतदान केंद्रापासून केवळ शंभर मीटर अंतरावर असताना दाभेकर कोंड गावातील रहिवासी प्रकाश चिनकटे यांचं दुःखद निधन. आज सकाळी 9 च्या दरम्यान घडली घटना. मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पायी जात होते. प्रकाश चिनकटे चक्कर येऊन रस्त्यावर जागीच कोसळले. महाड तालुक्यातील दाभेकर कोंड या मतदान केंद्रानजीक हे घडलं.
मेरे पास माँ है असं अजित पवार आज सकाळी मतदान करताना म्हणाले. त्यावर राजेंद्र पवार यांनी, ‘आई तर सर्वांकडे आहे’ अशी प्रतिक्रिया दिली. “शरद पवार यांच्या विचारांना जनता साथ देईल. महागाईमुळे जनता मोठ्या प्रमाणावर त्रस्त आहे. 4 जूनला सुप्रिया सुळेच विजयी झाल्याचे पाहवयास मिळेल” असं राजेंद्र पवार म्हणाले.
“विरोधी उमेदवाराला माझ्या समोर यायला तरी सांगा. गाडा बिडा हे तुमच्या स्वप्नात झालं. तुम्ही चालताय ते माझ्यासारखे शिवसैनिक शिवसेनेत होते म्हणून. शिवसेना नारायण राणेसारख्या शिवसैनिकांनी उभी केली. यांच्या बस की बात नाही” असं नारायण राणे म्हणाले.
काँग्रेसचे आमदार, माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी संपूर्ण कुटुंबासह केलं मतदान. कडेगाव तालुक्यातील सोनसळ या मूळ गावी बजावला मतदानाचा हक्क. विश्वजित कदम यांनी आई विजयमाला कदम आणि पत्नी स्वप्नाली कदम यांच्या बजावला मतदानाचा हक्क.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथे ईव्हीएम मशीन काही काळ बंद होते. मात्र, तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला असून मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. ईव्हीएम मशीनचे कनेक्शन लूज असल्याने बंद झाले होते ते तात्काळ सुरू करण्यात आले. मतदान करत असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे
बारामती लोकसभा मतदारसंघात सकाळपासून ५.७७ टक्के मतदान… बारामती विधानसभा मतदारसंघात ७.७५ टक्के मतदान… पुंरदर विधानसभा मतदारसंघात ४.९४ टक्के मतदान… दौंड विधानसभा मतदारसंघात ७.०० टक्के मतदान
मतदार यादीत नाव नसल्याने मतदार संतप्त… मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेले मात्र यादीत नावच नसल्याचा आरोप… मतदार यादीत मतदारांची नावच नसल्याचा प्रकार… महिला बूथ केंद्रावरच थांबून आहेत
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी बाजवला मतदानाचा हक्क… सहकुटुंब मतदान केंद्रावर जात हर्षवर्धन पाटील यांनी केलं मतदान… मूळगावी बावडा गावात जात बाजवला मतदानाचा हक्क…
लातूर येथील बाबळगाव मतदान केंद्रावर रितेश देशमुख यांनी कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावला आहे. आई वैशाली देशमुख आणि पत्नी जिनिलीया देशमुख यांच्यासोबत रितेश यांनी मतदान केलं आहे.
बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे बाजवणार मतदानाचा अधिकार… बारामती शहरातील मतदान केंद्रावर सुप्रिया सुळे करणार मतदान… आपल्या आईसोबत सुप्रिय सुळे करणार मतदान… प्रतिभा पवार देखील बजवणार मतदानाचा अधिकार
शरद पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. माळेगावातील श्रीमंत शंभूसिंह महाराज हायस्कूलमध्ये शरद पवार यांचं मतदान पार पडलं.
सुप्रिया सुळे आणि इतर कुटुंबियांसह शरद पवार हे मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत.
माळशिरसमध्ये भाजप उमेदवाराने बनावट नोटा वाटल्या असा आरोप उत्तम जानकर यांनी केला आहे.
अभिनेता रितेश देशमुख, त्याची पत्नी, अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबातील इतर सदस्यांनी लातूरमध्ये मतदान केलं.
#WATCH | Maharashtra: Actor Riteish Deshmukh and his wife Genelia Deshmukh cast votes at a polling booth in Latur.
NDA has fielded sitting MP Sudhakar Tukaram Shrangare against INDIA Alliance’s Kalge Shivaji Bandappa.#LokSabhaElections2024 pic.twitter.com/tP7DLeGjoJ
— ANI (@ANI) May 7, 2024
लातूरच्या सुनेगाव-सांगवीतील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. विविध मागण्यासांठी गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
लातूर-नांदेड मार्गावर कटऑफ पॉईंट देण्याची मागणी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादमध्ये बजावला मतदानाचा हक्क. निशान पब्लिक स्कूलमध्ये जाऊन मोदींनी केलं मतदान.
#WATCH | Prime Minister Narendra Modi casts his vote for #LokSabhaElections2024 at Nishan Higher Secondary School in Ahmedabad, Gujarat pic.twitter.com/i057pygTkJ
— ANI (@ANI) May 7, 2024
सोलापूर- गंगेवाडीतील केंद्रावर VVPAT मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे 15 ते 20 मिनिटांपासून या मतदान केंद्रावर मतदान थांबले आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू शेट्टी यांनी मतदानाचा हक्क बजावला. शिरोळ येथे प्राथमिक शाळेमध्ये जाऊन मतदान केंद्रावर त्यांनी कुटुंबियासह मतदान केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सकाळीच मतदान करण्यासाठी दाखल झाले. अमित शाह यांनी अहमदाबादमधील शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
Union Home Minister Amit Shah at Nishan Higher Secondary School in Ahmedabad, Gujarat
Prime Minister Narendra Modi will arrive here to cast his vote for #LokSabhaElections2024 pic.twitter.com/ED4WB6SyUp
— ANI (@ANI) May 7, 2024
धाराशिव लोकसभासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. गोवर्धनवाडी येथे नागरिकांनी मतदान केंद्रात पुजा करुन रांगोळी काढली आहे. जनजागृती करण्यासाठी रांगोळी काढण्यात आली. नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन केले.
सांगली लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकी साठी तब्बल 18 लाख 68 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
माझी आई माझ्यासोबत आहे. परंतु विरोधक भावनिक प्रचार करत आहेत. ही गावाची निवडणूक नाही. ही देशाची निवडणूक आहे, असे अजित पवार यांनी काटेवाडीत मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
सातारा लोकसभा मतदारसंघातील सातारा, कराड तालुक्यातील ग्रामीण भागात ही सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानासाठी सकाळीच नागरिकांनी रांगा लावल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उमेदवार सुनेत्रा पवार काटेवाडीत मतदान करण्यासाठी दाखल झाले. सकाळी सात वाजताच अजित पवार त्यांच्या मातोश्रीसह मतदान केंद्रावर पोहचल्या. काटेवडीत मतदान करण्यासाठी सकाळीच मतदान केंद्रावर गर्दी झाली.