महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे यांसह मुंबईतील 6 मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडलं. मुंबईत मतदारांनी उत्सपूर्त प्रतिसाद दिला. काही ठिकाणी मतदारांना मतदानासाठी जास्त वेळ रांगेत उभं राहावं लागलं. काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्याही घटना घडल्या. या घटनांवरुन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. या सर्व घडामोडींनंतर आता येत्या 4 जूनला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे मोदी सरकारवर नागरीक खूश आहेत की नाही? याचा निकाल याचा 4 जूनलाच कळणार आहे.
नालासोपारा : सायंकाळी सहानंतर मतदान प्रक्रिया बंद झाली आहे. मतदान केंद्रात जेवढे मतदार असतील त्यांचे मतदान होणार आहे. पोलीस आता मतदान केंद्रावर कुणाही सोडत नाही. पाच वाजेपर्यंत पालघर लोकसभेत ५४ टक्के मतदान झालं आहे. सगळ्यात जास्त डहाणू मतदार संघात ६२ % झालं आहे, तर सर्वात कमी ४५ % नालासोपारा शहरात झालं आहे. सध्या या मतपेट्या बस मधून बोईसरला नेण्यात येणार आहेत. ६ वाजता पोहचलेले मतदाराना मतदान करायला मिळाले नसल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. आज सकाळी सात ते सायकाळी सहा वाजेपर्यंत वसई विरार नालासोपारा परिसरात पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्त मधते शांतते आणि सुरळीत मतदान पार पडले आहे.
मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज सकाळी 7 वाजेपासून सूरू झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण 13 मतदार संघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे सरासरी 48.66 टक्के मतदान झाले आहे.
पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :
निवडणूक आयोगाने मतदानासाठी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दिली होती. पण अनेक ठिकाणी मतादारांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाडून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना टोकन वाटप केलं जात आहे. टोकन मिळणाऱ्या मतदारांना मतदान करता येणार आहे.
ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात आज 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00वा.पासून सुरुवात झाली. 24 कल्याण मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात दुपारी 5.00 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 41.70 टक्के मतदान झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :
अंबरनाथ – 40.01 टक्के
उल्हासनगर – 42.68 टक्के
कल्याण पूर्व – 42.58 टक्के
डोंबिवली – 42.51 टक्के
कल्याण ग्रामीण – 42.73 टक्के
मुंब्रा कळवा – 40.35 टक्के
नालासोपारा : पालघर लोकसभा मतदारसंघात सकाळपासून शांततेत आणि सुरळीत मतदान सुरु आहे. उन्हामुळे दुपारी तुरळक झालेली गर्दी सायंकाळी पाच वाजेच्या नंतर मतदान केंद्रावर वाढली आहे. वसई, विरार, नालासोपारा, बोईसर मतदारसंघात प्रत्येक मतदान केंद्रावर मोठमोठ्या रांगा लावून मतदार उत्स्फूर्तपणे मतदान करत आहेत.
नाशिक : भद्रकाली रोड परिसरात हेमंत गोडसेंना पाहून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा केल्या. हेमंत गोडसे मतदान केंद्राला भेट देण्यासाठी आले असता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना बघून 50 खोके आणि एकदम ओके अशा घोषणा दिल्या. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर म्हणून महायुतीच्या कार्यकर्त्यांकडूनही जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर यावेळी एकमेकांच्या विरुद्ध घोषणाबाजी झाली.
लाहौल-स्पिती जिल्ह्यातील मंडीमधून भाजप उमेदवार कंगना राणौत यांच्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज निदर्शने केली. त्यांनी कंगनाला काळे झेंडे दाखवले आणि तिच्या विरोधात घोषणाबाजी केली. कंगना रणौतने आज माजी मुख्यमंत्री आणि एलओपी जयराम ठाकूर यांच्यासमवेत काझा येथे जाहीर सभेला संबोधित केले.
#WATCH | Himachal Pradesh | Congress workers showed black flags and raised slogans against BJP Mandi candidate Kangana Ranaut during her visit to Kaza of Lahaul & Spiti district today
Kangana Ranaut along with former CM & LoP Jairam Thakur addressed a public rally in Kaza today.… pic.twitter.com/XVOLNnZOAU
— ANI (@ANI) May 20, 2024
अहमदाबाद विमानतळावर आयएसआयएसआयच्या चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे श्रीलंकेचे नागरिक आहेत, असं गुजरात एटीएसने सांगितलं आहे.
Four ISIS terrorists, who are Sri Lankan nationals, arrested at Ahmedabad airport: Gujarat ATS pic.twitter.com/pTHwPlZfnM
— ANI (@ANI) May 20, 2024
लोकसभा 2024 निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं मतदान सुरु आहे. मुंबईत लोकसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान होत आहे. यासाठी अभिनेत्री रेखा यांनी मतदान केलं. अभिनेत्री जरीन खान हीनेही मतदानाचा हक्क बजावला.
#WATCH | Mumbai: After casting her vote for #LokSabhaElections2024, actress Zareen Khan says, "Everyone should be voting…They should come out of their homes & cast their vote." pic.twitter.com/DAnDir8eTC
— ANI (@ANI) May 20, 2024
#WATCH | Maharashtra: Actress Rekha leaves from a polling station in Mumbai after casting her vote for the fifth phase of #LokSabhaElections2024📷 pic.twitter.com/yjqlFO33L0
— ANI (@ANI) May 20, 2024
‘रामायण’ मालिकेत सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया टोपीवाला यांनी आवाहन करत सांगितलं की, “आज निवडणुकीचा पाचवा टप्पा आहे आणि खूप कमी लोक मतदान करत आहेत, म्हणून मी माझ्या सोशल मीडियावर एक रील पोस्ट केली होती ज्यात प्रत्येकाला मतदान करण्याचे आवाहन केले होते. मी आग्रह धरतो आणि सर्वांना विनंती करते की तुम्ही मत दिले नाही तर तुम्हाला काही फायदा होणार नाही.”
#WATCH | Mumbai: On #LokSabhaelections2024 'Ramayana' actress Dipika Chikhlia Topiwala says, "…Today is the fifth phase of elections and very few people are casting their votes, therefore I had posted a reel on my social media urging everyone to cast their vote. I insist &… pic.twitter.com/Fbpd1ea5bD
— ANI (@ANI) May 20, 2024
सरकारने आणलेल्या तीन नवीन कायद्यांविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाने वकील विशाल तिवारी यांना याचिका मागे घेण्याची परवानगी दिली. आम्ही दंड आकारत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात राष्ट्रीय सरचिटणीसांची बैठक घेतली.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात आज स. 7 वा.मतदानाला सुरुवात झाली. दु. 1.00 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 27.34 टक्के मतदान झाले आहे.
मुंबईतील अनेक भागात संथगतीने मतदान होत असून मतदार रांगात उभे राहून कातावले आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. पवईत देखील ईव्हीएम मशिन बंद पडल्याने शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनी संताप व्यक्त केला आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00 वाजल्यापासून सुरुवात झाली. 25 ठाणे मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात दुपारी 1.00 वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 26.05 टक्के मतदान झाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात कल्याण लोकसभा मतदारसंघात दुपारी एकवाजेपर्यंत अंदाजे 22.52 टक्के मतदान झालं आहे. सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. 24 कल्याण मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात दुपारी 1.00 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 22.52 टक्के मतदान झालं आहे.
बोरिवलीत राधे माँ यांनी पहिल्यांदाच कुटुंबासह मतदान केलं. मतदान करणे हा आपला हक्क आहे आणि आपण आपल्या आवडीच्या नेत्याला मतदान करू शकतो. तुमच्या आवडत्या उमेदवाराला मतदान करा, आम्ही त्यालाच मतदान करू जो देशाचा विकास करत आहे, असं राधे माँ म्हणाल्या.
मालेगावच्या मेहुणे ग्रामस्थ्यांचा मतदानावर बहिष्कार टाकला आहे. मेहुणे दिंडोरी मतदार संघातील गाव आहे. प्रशासनाकडून मध्यस्थी करण्यात आली. मात्र ग्रामस्थ आपल्या मतावर ठाम आहेत. अद्याप एकही मतदान झालेलं नाही.
ठाण्यात बोगस मतदानाचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ठाण्यात मतदान प्रशासनाकडून प्रक्रिया स्लो केलीय. 2 हजार मतदार बोगस मतदार आणलेत. महाराष्ट्र शाळेत 10 मत बोगस पडली आहेत, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड सहकुटुंबासोबत बजावणार मतदानाचा हक्क. महाराष्ट्र्र विद्यालयात मतदान केंद्र वर दाखल
ओशिवरामध्ये मतदान केंद्राबाहेर गोंधळ, भाजपा-ठाकरे गट आमनेसामने
अंबरनाथ- 11.26%, डोंबिवली- 7%, कल्याण पूर्व- 15.11%, कल्याण ग्रामीण- 10.60%,
मुंब्रा-कळवा- 13.03%, उल्हासनगर- 11.09% याप्रमाणे मतदान झाले आहे.
आज सकाळपासूनच मतदान केंद्राबाहेर लोकांची गर्दी दिसतंय. आता मिलिंद नार्वेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात सकाळी 11.00 वाजेपर्यंत अंदाजे 14.86 टक्के मतदान झालं आहे.
ठाणे जिल्ह्यातील 25 ठाणे मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय अंदाजे टक्केवारी पुढीलप्रमाणे:
मिरा भाईंदर – 16.64 टक्के
ओवळा माजिवडा – 11.70 टक्के
कोपरी पाचपाखडी – 16.87 टक्के
ठाणे – 15.39 टक्के
ऐरोली – 15.68 टक्के
बेलापूर – 13.76 टक्के
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत अंदाजे 11.46 टक्के मतदान झालं आहे. ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे:
140 अंबरनाथ – 11.24 टक्के
141 उल्हासनगर – 11.09 टक्के
142 कल्याण पूर्व – 15.11 टक्के
143 डोंबिवली – 7.00 टक्के
144 कल्याण ग्रामीण – 10.60 टक्के
149 मुंब्रा कळवा – 13.03 टक्के
नाशिक- दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 19.5 टक्के मतदान झालं आहे. तर नाशिक लोकसभा मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 16.30 टक्के मतदान झालं आहे.
अभिनेता इमरान हाश्मी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहोचला आहे. तर अभिनेता आमिर खानच्या आईने मतदानाचा हक्क बजावला आहे.
अभिनेता रणदीप हुडा म्हणाला, “लोकशाहीत मतदानाद्वारे तुम्हाला तुमचं आणि तुमच्या देशाचं भविष्य ठरवण्याचा अधिकार आहे. तुम्ही मतदान केलंच पाहिजे. लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हा आणि मतदान करा.”
अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर दुसरीकडे अभिनेते सुरेश ओबेरॉय हे मतदानासाठी जुहू इथल्या केंद्रावर पोहोचले आहेत.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Actress and BJP MP Hema Malini, her daughter and actress Esha Deol show indelible ink marks on their fingers after casting their votes at a polling booth in Mumbai #LokSabhaElections2024 pic.twitter.com/T3I2wmA0H0
— ANI (@ANI) May 20, 2024
कल्याण लोकसभेचे उमेदवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यात विविध मतदान केंद्र आणि मतदान बूथवर जाऊन नागरिकांची भेट घेत मतदान करण्याचं आवाहन केलं.
अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा मतदानासाठी जुहूमध्ये पोहोचल्या आहेत. सुनीता आहुजा यांनी जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
बॉलिवूड गायक कैलाश खेर मतदानासाठी जुहू येथे पोहोचले… कैलाश खेर म्हणाले की, जास्तीत जास्त मतदान करा… कैलाश खेर यांनी गाण्यांद्वारे लोकांना मतदानासाठी प्रोत्साहित केले….
काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद झालेली आहे मात्र आता ती सुरळीत सुरू आहे… माझं मतदारांना आव्हान आहे की मोठ्या संख्येने घराच्या बाहेर निघून मतदान करा… कल्याण लोकसभेत चांगल्या प्रकारचे मतदान सकाळी सहा वाजेपासून लोक रांगेत उभे आहेत… नवीन मतदारांनाही आमचं आव्हान आहे की घराच्या बाहेर निघून मतदान करा आणि लोकशाहीला बळकट करा… चांगल्या पद्धतीने मतदान सुरू आहे… असं वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केलं आहे.
कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत आक्रमक झाले आहेत. मतदारांना मार्गदर्शन करू नये असा नियम नाही… निवडणूक आयोग सध्या भाजपची शाखा म्हणून काम करतेय… भाजपचे लोक पोलिसांवर दबाव आणून शिवसैनिकांवर अटक करायला लावतात… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.
चित्रपट अभिनेते आणि शिवसेनेचा स्टार प्रचारक गोविंदा यांनी जुहू येथे मतदान केले आहे. मतदानानंतर गोविंदा म्हणाले की, जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे.
Lok sabha election 2024 : ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ज्यामुळे सुनील राऊत पोलिसांवर संतापले आहेत. त्यांना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोडण्याचा आग्रह धरला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे मतदानाचा अधिकार बजावला. संपूर्ण कुटुंबासह पाचपाखाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले.
मतदार यादी मध्ये नाव नसल्याने नागरिकांनी घातला गोंधळ. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रातील मतदान केंद्रावर नागरिकांनी घातला गोंधळ. नागरिकांच ठिय्या आंदोलन
महाराष्ट्रात सकाळी 9 पर्यंत 6.33 % टक्के मतदान झाले आहे. कल्याणमध्ये 5.39%, भिवंडीत 4.86%, धुळ्यात 6.92% तर दिंडोरीत 6.40%टक्के मतदान झाले. उत्तर मुंबईत 6.19% मतदान झाले.
ठाण्यातील नौपाडा भागात ईव्हीएम जवळपास 1 तास बंद होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यासोबत बोलून मतदानाची वेळ 1 तास वाढवून द्यावी असे सांगितले आहे.
लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावं, आपलं एक मत इतिहार घडवेल, राष्ट्र घडवेल असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं.
डोंबिवलीतील मंजुनाथ विद्यालय येथील मतदान केंद्रावरील एक ईव्हीएम मशीन बंद पडले होते. मात्र आता ते मशीन अखेर सुरू झाले आहे. मशीन बंद पडल्यामुळे अर्धा पाऊण तासापासून नागरिक रांगेत उभे होते. याच दरम्यान ठाकरे व शिंदे गटातील कार्यकर्ते आमने-सामने मतदान केंद्रावर गोंधळ घातला. मविआच्या उमेदावर वैशाली दरेकर यांनी पाहणी केली.
ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी मुंबईत मतदानाचा अधिकार बजावला. मी योग्य उमेदवारासाठी मतदान केलं आहे. घरी मतदान न करता मी मतदान केंद्रावर येऊन मतदान केलं आहे.
#WATCH | Mumbai: Veteran Actress Shobha Khote casts her vote at a polling station in Mumbai for #LokSabhaElections2024
She says, “I have voted for the right candidate. I did not opt for home-voting and voted here so that people get inspired and come out and vote…” pic.twitter.com/kRpUFOVpwo
— ANI (@ANI) May 20, 2024
लोकसभा निवडणूकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोक्कलिंगम यांनी सेंट ॲनिज हायस्कूल, मादाम कामा रोड, मुंबई येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.
डोंबिवलीतील मंजुनाथ विद्यालय येथील मतदान केंद्रावरील एक ईव्हीएम मशीन बंद पडली. त्यामुळे अर्धा पाऊण तासापासून नागरिक रांगेत उभे होते. याच दरम्यान ठाकरे व शिंदे गटातील कार्यकर्ते आमने-सामने मतदान केंद्रावर गोंधळ घातला.
फिल्म प्रोड्यूसर कुणाल कोहलीने बजावला मतदानाचा हक्क. बॉलीवुडला तुम्ही सगळे फॉलो करता तसंच तुम्ही मतदानात पण फॉलो करा. आरोग्य आणि शिक्षण हे मतदानाचे मुद्दे असले पाहिजेत.
वावी तालुका सिन्नर येथील केंद्र क्रमांक 168 चे मतदान यंत्र बंद पडले आहे. केवळ दोन मतदान झाल्यानंतर यंत्रात बिघाड निर्माण झाला. सकाळी साडेसात वाजल्यापासून यंत्र बंद आहे. तांत्रिक पथक बिघाड दुरुस्त करत आहे.
“मुंबईत ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्या ते पाहता मुंबईकर मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडतील आणि महायुतीसाठीच मतदान करतील. प्रचारादरम्यान खालच्या दर्जाची भाषा विरोधक विशेषता उद्धव ठाकरेंनी वापरली. त्यामुळे निवडणुकीच्या निकालातही उद्धव ठाकरे गटाचा नंबर खालचाच राहील. मुंबई ही आर्थिक राजधानी त्यामुळे महायुतीसाठी सहाही जागा महत्त्वाच्या आहेत. शाळेतला हुशार विद्यार्थी आपल्या अभ्यासावर भर देत असतो ढ विद्यार्थी मात्र अभ्यास करण्यापेक्षा हुशार विद्यार्थ्याला दोष देतात हीच परिस्थिती विरोधकांची झाली आहे” असं आशिष शेलार म्हणाले.
ठाणे लोकसभा मतदासंघाच्या 148 विधानसभा मतदारसंघातील 346 क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन काही तांत्रिक कारणामुळे बंद पडले होते. मात्र तेथील अधिकाऱ्यांनी पुढील पंधरा मिनिटात तातडीने कार्यवाही करून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू केली आहे.
उत्तर मध्य मुंबईमधील मतदान केंद्रांवर सकाळपासून रांगा लागल्या आहेत. यावेळी बोलताना मतदारांनी समस्या सोडवणारा खासदार हवा, अशा प्रतिक्रिया ‘टीव्ही 9 मराठी’कडे व्यक्त केल्या. काही जण मॉर्निंग वॉक करत थेट मतदान केंद्रावर आले.
मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार यामिनी यशवंत जाधव यांनी आपल्या कुटुंबासह ताडवाडी माझगाव येथील महापालिकेच्या शाळेत बजावला आहे. मतदानाचा अधिकार सर्वांनी बजवावा, असे आवाहन त्यांनी केले.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील पाचव्या टप्प्याचा मतदानासाठी सकाळपासून रांगा लागल्या. कल्याण मतदार संघातील उल्हासनगर शहरात आपला हक्क बजावण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या. चाकरमानी वर्ग देखील मतदान करून कामाला जात आहे.
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याने सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बोलताना अक्षय कुमार याने सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन केले.
मुंबईत भाजप नेते आशिष शेलार मतदानासाठी मतदान केंद्रावर आले आहेत. सकाळीच मतदान करण्याचा हक्क त्यांनी बजावला.
नाशिकमध्ये स्वामी शांतिगिरी महाराज यांनी मतदान केले. मतदान करण्यापूर्वी त्यांनी ईव्हीएम मशीनला हार घातला. मतदान करण्यापूर्वी महाराजांनी त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात पूजा विधी केला.