Maharashtra Loksabha Election Result Live: महाराष्ट्रातील 48 मतदार संघात काय आहे परिस्थिती, कोणत्या मतदार संघात कोणाची विजयाकडे वाटचाल, वाचा एका क्लिकवर

| Updated on: Jun 04, 2024 | 5:45 PM

Maharashtra Loksabha Election Result Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेसने 5 जागांवर तर काँग्रेस आणि एमआयएमचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांची जोरदार कामगिरी झालेली दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला राज्यात 30 जागा मिळत आहेत.

Maharashtra Loksabha Election Result Live: महाराष्ट्रातील 48 मतदार संघात काय आहे परिस्थिती, कोणत्या मतदार संघात कोणाची विजयाकडे वाटचाल, वाचा एका क्लिकवर
devendra fadnavis vs uddhav thackeray
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात सर्वात जास्त फटका बसताना दिसत आहे. महाराष्ट्रात 45+ ची घोषणा करणाऱ्या महायुतीला केवळ 17 जागा मिळताना दिसत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला 30 जागांवर विजय मिळत असल्याचे कलावरुन स्पष्ट होत आहे. या निवडणुकीत कलावरुन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. 2019 मध्ये भाजपने 23 जागांवर आणि शिवसेनेने 18 (शिवसेना एकत्र होती) जागांवर विजय मिळवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने 5 जागांवर तर काँग्रेस आणि एमआयएमचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांची जोरदार कामगिरी झालेली दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला राज्यात 30 जागा मिळत आहेत. या निवडणुकीत सर्वाधिक फटका भाजपला बसताना दिसत आहे.

निवडणूक आयोगाच्या बेबसाईटनुसार दुपारी १२. ३० पर्यंत उमेदवाराने घेतलेली आघाडी

लोकसभा मतदार संघ विजयी/ आघाडी पक्ष
1) दक्षिण मुंबई अरविंद सावंत (विजयी) शिवसेना ठाकरे
2) दक्षिण मध्य अनिल देसाई (विजयी) शिवसेना ठाकरे
3) उत्तर पश्चिम अमोल कीर्तीकर (विजयी) शिवसेना ठाकरे
4) उत्तर मुंबई पीयूष गोयल (विजयी) भाजप
5) उत्तर मध्य मुंबई वर्षा गायकवाड (विजयी) काँग्रेस
6) मुंबई उत्तर पूर्व संजय दिना पाटील (विजयी) शिवसेना ठाकरे
7) ठाणे नरेश म्हस्के (विजयी) ठाणे
8) कल्याण श्रीकांत शिंदे शिवसेना
9) भिवंडी सुरेश म्हात्रे
शरद पवार राष्ट्रवादी
10) पालघर डॉ. हिेमंत सावरा भाजप
11) रायगड सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस
12) सिंधुदुर्ग नारायण राणे (विजयी) भाजप
13) धुळे सुभाष भामरे भाजप
14) नंदुरबार गोपाल पाडवी काँग्रेस
15) नाशिक राजाभाऊ वजे (विजयी) शिवसेना ठाकरेे गट
16) दिंडोरी भास्करराव भगरे (विजयी)
शरद पवार राष्ट्रवादी
17) जळगाव स्मिता वाघ (विजयी) भाजप
18) रावेर रक्षा खडसे भाजप
19) औरंगाबाद संदीपान भुमरे शिवसेना
20) जालना डॉ. कल्याण काळे काँग्रेस
21) लातूर शिवाजीराव काळगे काँँग्रेस
22) नांदेड वसंतराव चव्हाण काँग्रेस
23) हिंगोली नागेश पाटील शिवसेना ठाकरे गट
24) बीड पंकजा मुंडे भाजप
25) सोलापूर प्रणिती शिंदे (विजयी) काँग्रेस
26) धाराशिव ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गट
27) परभणी संजय जाधव
शिवसेना ठाकारे गट
28) बुलडाणा प्रतापराव जाधव (विजयी) शिवसेना
29) अकोला अभय पाटील काँग्रेस
30) अमरावती बळवंत वानखेडे (विजयी) काँग्रेस
31) वर्धा अमर काळे
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
32) रामटेक श्यामकुमार बर्वे काँँग्रेस
33) नागपूर नितीन गडकरी नागपूर
34) भंडारा-गोंदिया सुनील मेंढे भाजप
34) गडचिरोली डॉ. नामदेव किरसान काँग्रेस
36) चंद्रपूर प्रतिभा धानोरकर काँग्रेस
37) यवतमाळ संजय देशमुख शिवसेना ठाकरे गट
38) मावळ श्रीरंग बारणे (विजयी) शिवसेना
39) माढा धैर्यशील पाटील
शरद पवार राष्ट्रवादी
40) पुणे मुरलीधर मोहोळ (विजयी) भाजप
41) बारामती सुप्रिया सुळे (विजयी)
शरद पवार राष्ट्रवादी
42) शिरुर अमोल कोल्हे (विजयी)
शरद पवार राष्ट्रवादी
43) अहमदनगर सुजय विखे पाटील भाजप
44) शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे (विजयी) शिवसेना ठाकरे गट
45) सातारा उदयनराजे भोसले भाजप
46) सांगली विशाल पाटील अपक्ष
47) कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज काँग्रेस
48) हातकणंगले सत्यजीत पाटील शिवसेना ठाकरे गट