कोलकाता: पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच टीएमसी आणि भाजपमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. एवढेच नव्हे तर टीएमसीने थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 2024ची लोकसभा निवडणूक वाराणासीतून लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात ममता बॅनर्जी असा तगडा सामना पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Mamata as Modi challenger in Varanasi in 2024 loksabha election?)
काय म्हटलंय टीएमसीच्या ट्विटमध्ये?
टीएमसीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हे ट्विट करण्यात आले आहे. त्यात त्यांनी ममता बॅनर्जी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. दीदी नंदीग्राममधून विजयी होत आहे. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा प्रश्नच येत नाही. मोदीजी, पश्चिम बंगालमधील नामांकन अर्ज दाखल करण्याची तारीख कधीच निघून गेलीय. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नका. 2024च्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही सुरक्षित मतदारसंघाचा शोध घ्या. कारण आता वाराणासीत आव्हान दिलं जाईल, असं ट्विट टीएमसीच्या अधिकृत हँडलवरून करण्यात आलं आहे. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
Didi is winning Nandigram. The question of her fighting from another seat doesn’t arise. @narendramodi Ji, retract from your efforts to mislead people before they see your lies with the end of nomination in WB. Look for a safer seat in 2024, as you will be challenged in Varanasi.
— All India Trinamool Congress (@AITCofficial) April 1, 2021
मोईत्रा काय म्हणाल्या?
त्यानंतर टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी तर थेट भाष्य करून भाजपच्या तंबूत खळबळ उडवून दिली आहे. दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढत आहे? पंतप्रधानजी, त्या निवडणूक लढणार आहेत. पण ती निवडणूक वाराणासीत होईल. त्यामुळे जा आणि कामाला लागा, असा चिमटा मोईत्रा यांनी काढला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी या वाराणासीतून लढणार असल्याच्या चर्चांना हवा मिळाली आहे.
‘Contesting from second seat?’
PM Modi jabs Mamata BanerjeeYes Mr. Prime Minister, she will.
And it will be Varanasi!So go get your armour on.
— Mahua Moitra (@MahuaMoitra) April 1, 2021
मोदी काय म्हणाले होते?
गुरुवारी मोदींची बंगालमध्ये रॅली होती. त्यावेळी त्यांनी निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी ममता बॅनर्जी दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत अशी अफवा आहे. त्यात किती तथ्य आहे हे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट करावं, असं मोदी म्हणाले होते. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा पराभव अटळ असल्याचं मोदींना म्हणायचं होतं. मोदींच्या वक्तव्यानंतर टीएमसीनेही हे ट्विट करून थेट मोदींनाच आव्हान दिलं आहे.
भाजपचं उत्तर
टीएमसीच्या ट्विटला भाजपनंही उत्तर दिलं आहे. ममतादीदींचं आम्ही वाराणासीत स्वागतच करू. तुमच्याविरोधात आम्ही लोकशाही पद्धतीने लढू. तुम्हाला बाहेरील व्यक्ती म्हणून हिणवलं जाणार नाही. तुमच्या कोणत्याही कार्यकर्त्याची हत्या केली जाणार नाही. फाशी दिली जाणार नाही. तुम्ही बंगालमध्ये भाजपच्या 140 कार्यकर्त्यांसोबत हे सर्व केलं. पण आम्ही तसं करणार नाही, असा टोला भाजपचे राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष यांनी लगावला आहे.
तर राजकीय संन्यास घेणार असल्याचं जाहीर करा
तर, वाराणासीत मोदींना आव्हान देणं हे ममता दीदींच्या क्षमतेपलिकडचं आहे. समगोत्री असल्याने एकवेळ माझ्याविरोधात लढा, असं सांगतानाच दीदी, तुमच्यात हिंमत असेल तर नंदीग्राममध्ये पराभव झाल्यास राजकारणातून संन्यास घेणार असल्याचं जाहीर करा, असं आव्हानच केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते गिरीराज सिंह यांनी ममता दीदींना दिलं आहे. (Mamata as Modi challenger in Varanasi in 2024 loksabha election?)
संबंधित बातम्या:
West Bengal Elections 2021 : शुभेंदु अधिकारी यांच्या ताफ्यावर दगडफेक, बंगालमध्ये राडेबाजी सुरुच
(Mamata as Modi challenger in Varanasi in 2024 loksabha election?)